छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून १०.३६ वाजेपासून १५.१० वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाउन जलद गाड्या माटुंगा स्थानकापासून मुलुंड दरम्यान डाउन धिम्या मार्गावर वळविण्यात येतील व त्यांच्या निर्धारित थांब्यांवर थांबून या गाड्या त्यांच्या गंतव्यस्थानावर अंदाजे १५ मिनिटे उशिरा पोहोचतील. ठाण्यानंतरच्या जलद गाड्या मुलुंड स्थानकापासून पुन्हा डाउन जलद मार्गावर वळविण्यात येतील.
ठाणे येथून ११.०३ वाजल्यापासून दुपारी १५.३८ वाजेपर्यंत सुटणाऱ्या अप जलद गाड्या मुलुंड स्थानकापासून माटुंगा दरम्यान अप धिम्या मार्गावर वळविण्यात येतील व त्यांच्या निर्धारित थांब्यांवर थांबून या गाड्या माटुंगा स्थानकापासून पुन्हा अप जलद मार्गावर वळविण्यात येऊन गंतव्यस्थानावर अंदाजे १५ मिनिटे उशिरा पोहोचतील.
पनवेल – वाशी अप व डाउन हार्बर मार्गावर ११.०५ वाजल्यापासून १६.०५ वाजेपर्यंत (पोर्ट लाईन वगळून)
पनवेल येथून १०.३३ वाजल्यापासून १५.४९ वाजेपर्यंत सुटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गवरील गाड्या तसेच
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ०९.४५ वाजल्यापासून १५.१२ वाजेपर्यंत सुटणाऱ्या पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील गाड्या रद्द राहतील.
पनवेल येथून ११.०२ वाजल्यापासून १५.५३ वाजेपर्यंत सुटणाऱ्या व ठाण्याकडे जाणाऱ्या अप ट्रान्स-हार्बर मार्गावरील गाड्या तसेच
ठाणे येथून १०.०१ वाजल्यापासून १५.२० वाजेपर्यंत सुटणाऱ्या पनवेलकडे जाणाऱ्या डाउन ट्रान्स-हार्बर मार्गावरील गाड्या रद्द राहतील.
ब्लॉकच्या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि वाशी दरम्यान विशेष लोकल गाड्या चालविण्यात येतील.
ब्लॉकच्या कालावधीत ठाणे – वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्स-हार्बर मार्गावर सेवा उपलब्ध राहील.
ब्लॉकच्या कालावधीत पोर्ट मार्गावर सेवा उपलब्ध राहील.