दशावतारी कला वाढली पाहिजे

टर्निंग पॉइंट : युवराज अवसरमल 


दशावतार’ हा नवीन चित्रपट येत आहे. त्यामध्ये आपल्या अभिनयाची झलक दाखविण्यास एक कलाकार येत आहे. त्याचे नाव आहे सिद्धार्थ मेनन. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर समोर त्याच्या अभिनयाचा कस लागलेला आहे.


सिद्धार्थची फॅमिली केरळची, त्याचा जन्म पुण्याचा. पुण्यातील गुरुकुल नावाच्या शाळेत त्याचे शिक्षण झाले. शाळेत असताना तो फुटबॉल खेळायचा, टेनिस खेळायचा. सांस्कृतिक कार्यक्रमात त्याचा सहभाग असायचा. शाळेत असताना तो आठ वर्षे भरतनाट्यम नृत्य शिकला. त्याने कार्यक्रम व स्पर्धेतदेखील त्याने भाग घेतला होता. पुढे दोन ते तीन वर्षे तो कर्नाटकी संगीत शिकला. त्याचे आई-वडील सिनेमाप्रेमी होते. ते सिद्धार्थला तेलगू, मल्याळी, कन्नड व इतर भाषेतील चित्रपट दाखविण्यास घेऊन जात असे. पुण्यात असल्यामुळे मराठी नाटक तो पाहायचा. बी. एम. सी. सी. नावाच्या पुण्याच्या कॉलेजमध्ये त्यांच्या वडिलांनी त्याला प्रवेश घ्यायला सांगितले. कारण तिथे सांस्कृतिक कार्यक्रम (अॅक्टिव्हिटी) भरपूर व्हायचे. तो तिथे गेला, हा त्याच्या जीवनातला टर्निंग पॉइंट होता. जेव्हापासून त्याच्या जीवनात नाटकाने प्रवेश केला होता. त्याच्या कॉलेजच्या बाजूला फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन अकादमी होती. तेथील विद्यार्थी त्याला भेटायचे. त्यांच्या फिल्म्समध्ये तो काम करायचा. २१ व्या वयापासून तो पृथ्वी थिएटर, एन सी. पी. एला नाटकासाठी जाऊ लागला.


वासनबाला दिग्दर्शकाच्या ‘पेडलर’ चित्रपटांमध्ये त्याला मुख्य भूमिका मिळाली. तो त्याच्या जीवनातला टर्निंग पॉइंट ठरला. त्या चित्रपटाचा प्रीमियर कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये झाला; परंतु तो पुढे रिलीज झाला नाही.


सचिन पिळगावकरांचा ‘एकुलती एक’ हा चित्रपट त्याने केला. श्रेया पिळगावकर व त्याचा हा पहिलाच मराठी चित्रपट होता. त्यानंतर काही वेबसीरिज त्याने केल्या. २०१९ साली त्यांनी ‘जून’ हा चित्रपट केला. या चित्रपटासाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. जून चित्रपट लॉकडाउनच्या काळात प्लॅनेट मराठीवर रिलीज झाला होता. भरपूर प्रेक्षकांनी तो चित्रपट पाहिला. न्यूयॉर्क फिल्म फेस्टिव्हलमध्ये इंडियन फिल्म विभागामध्ये त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. हा चित्रपट टर्निंग पॉइंट ठरला. या चित्रपटात प्रेक्षकांना तो चांगल्या प्रकारचा वेगळा अभिनेता असल्याचे जाणवले.


‘दशावतार’ हा त्याचा नवीन चित्रपट येतोय. या चित्रपटाचा लेखक व दिग्दर्शक सुबोध खानोलकर त्याचा कॉलेजचा मित्र आहे. ते तेव्हापासून नाटक करत होते. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर दशावतारी कलाकार आहेत. त्यांच्या मुलाची भूमिका तो साकारीत आहे. माधव मिस्त्री त्याच्या व्यक्तिरेखेचे नाव आहे. वडील व मुलाच्या नातेसंबंधात असणाऱ्या ओलाव्याची जाणीव यात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. दिग्दर्शक व सगळ्यांनी हा चित्रपट चांगला होण्यासाठी खूप प्रयत्न केले आहेत. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी या चित्रपटातील व्यक्तिरेखेसाठी दीड वर्ष तयारी केली. त्यांच्यासोबत काम करताना त्याला दडपण नव्हते; परंतु चांगला अभिनय करावा याची जाणीव त्याला होती. दिलीपजी अभिनयाबद्दल खूपच सिरीयस असायचे. त्यामुळे त्यांच्यासोबत आपली काही चूक होत कामा नये याची काळजी त्यांनी घेतली होती. जवळ जवळ पंचेचाळीस दिवस ते दोघे शूटिंगसाठी एकत्र होते. त्यांच्यात ऑनस्क्रीन व ऑफस्क्रीन चांगलीच केमिस्ट्री जुळली होती. दशावतारी ही खूप जुनी परंपरा आहे. या चित्रपटामध्ये खरेखुरे दशावतारी कलाकार प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.


दशावतारी कला ही खूप लोकांना ऐकून माहीत आहे, खूप जणांनी ती पाहिली नाही. या चित्रपटामुळे दशावतारी कला वाढेल. लोकांना ती कला पाहण्याचा मोह होईल. या चित्रपटानंतर दशावतारी कलाकारांना मुंबई, पुण्यात दशावतारी शो करण्यासाठी बोलावले जातील असा आशावाद त्याने व्यक्त केला. या चित्रपटामुळे दशावतारी कला लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल.

Comments
Add Comment

नाटकाच्या प्रयोगासाठी ‘उदकशांत’ करताना...

राजरंग : राज चिंचणकर नाटक हे नाटक असते आणि नाटकांच्या बाबतीत व्यावसायिक व प्रायोगिक असा भेदभाव केला जाऊ नये, अशी

‘गोदावरी’तील समावेश कलाटणी देणारा

टर्निंग पॉइंट : युवराज अवसरमल गौरी नलावडे या अभिनेत्रीचा ‘वडा पाव’ हा चित्रपट रिलीज झाला आहे. गौरीचे शालेय

कलात्मक दिग्दर्शक गुरुदत्त

गुरुदत्त हिंदी चित्रपटसृष्टीत जिवंतपणीच आख्यायिका बनलेले व्यक्तिमत्त्व. आजही गुरुदत्त यांचे नाव घेतले की

नाईलाजांच्या प्रदेशातील तीन डिसेबल्स

पाचवा वेद : भालचंद्र कुबल यालेखाचं शीर्षक मुद्दामहून हेच ठेवण्यामागचं कारण असं की परीक्षक म्हणून एकदा का तुम्ही

नाईलाजाच्या प्रदेशातील तीन डिसेबल्स

भालचंद्र कुबल यंदाच्या आय. एन. टी. आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेला पन्नास वर्षे पूर्ण झाली. मी या स्पर्धेत

मराठी रंगभूमीचा एकमेव ‘सूत्रधार’...

रंगभूमीवर नाटकांचे सूत्रधार अनेक असतात, पण मराठी रंगभूमीला एखादा सूत्रधार असू शकतो का; या प्रश्नाचे उत्तर आता