मुंबई भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी कुणाची लागणार वर्णी?

मुंबई : मुंबई भाजपाच्या अध्यक्षपदी आमदार अमित साटम यांची निवड झाल्यानंतर आता सर्वांच्या नजरा लागल्या त्या मुंबई भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी कोणत्या महिला पदाधिकाऱ्याची वर्णी लागते. सध्याच्या मुंबई भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा शीतल गंभीर देसाई यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने त्यांची नियुक्ती आता माहिम मंडळाच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई भाजपा महिला मोर्चाचे अध्यक्षपद रिक्त असून यासाठी चर्चेत असणारी बहुतांशी सर्वच नावे मागे पडली आहेत. त्यामुळे आता या पदावर माजी नगरसेविकांपैंकी कुणाला संधी दिली जाते की महिला पदाधिकाऱ्यांमधून नवीन चेहऱ्याला संधी दिली जाते याकडे सर्वांचे लक्ष आहे.


मुंबई भाजपमध्ये महिला मोर्चाच्या अध्यक्षपदाची निवड नेहमीच महत्त्वाची मानली जाते. सध्याच्या अध्यक्ष शीतल गंभीर देसाई यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे या रिक्त पदासाठी अनेक अनुभवी आणि नवीन चेहऱ्यांची नावे चर्चेत आहेत. सध्या या पदासाठी अनेक नावांची चर्चा आहे. यामध्ये अनेक विद्यमान नगरसेविका आणि अनुभवी महिला नेत्यांचा समावेश आहे. पक्षासाठी दीर्घकाळ काम केलेल्या आणि महिलांमध्ये चांगली पकड असलेल्या नेत्यांना प्राधान्य दिले जाण्याची शक्यता आहे. यात काही नवी नावे सुद्धा पुढे येत आहेत, जी नव्या विचारांनी आणि कार्यपद्धतीने पक्षाला नवी दिशा देऊ शकतात.


सुरुवातीला या पदासाठी शलाका साळवी, अक्षता तेंडुलकर, राजेश्री शिरवडकर, स्वप्ना म्हात्रे, रितु तावडे, योजना ठोकळे, आशा मराठे आणि प्रीती सातम यांची नार्वे चर्चेत होती. परंतु त्यांच्यावर अन्य जबाबदारी सोपवण्यात आल्या आहेत. त्यामुळे योजना ठोकळे, राजेश्री शिरवडकर यांची नावे शिल्लक असली तरी या नवनिर्वाचित मुंबई भाजपाचे अध्यक्ष अमित साटम यांच्यासोबत संघटनात्मक बांधणी करण्यासाठी तेवढ्याच तोडीची आणि अभ्यासू तथा आक्रमक महिला अध्यक्षाची निवड करणे आवश्यक असेल. त्यामुळे पक्षातील ज्येष्ठ नेत्यांमध्ये चर्चेतील नावांव्यतिरिक्त अन्य महिला पदाधिकाऱ्यांच्या नावाबाबत मंथन सुरू असून लवकरच नवीन अध्यक्षांची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Comments
Add Comment

मुंबईतल्या काँग्रेस आमदाराचे दोन मतदारयाद्यांमध्ये नाव, चोर कोण, दोष कुणाचा?

मुंबई: काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सध्या मतदारयाद्यांमधील घोळांचा पाढा वाचायला

सोन्याचे सफरचंद! किंमत १० कोटी, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

मुंबई: चक्क १० कोटींचे सफरचंद! हे ऐकून तुम्हाला पण धक्का बसला ना? मात्र हे खायचे सफरचंद नसून ते सोने आणि हिऱ्यांनी

Maharashtra Rain Update : पुढील २४ तास अतिधोक्याचे! ८ आणि ९ नोव्हेंबरला मोठे वादळ धडकणार; अनेक राज्यांमध्ये IMD कडून 'महा-अलर्ट' जारी!

मुंबई : राज्यात अखेर थंडीची चाहूल जाणवू लागली आहे. पहाटेच्या वेळी तापमानात घट होऊन गारवा वाढल्याचे चित्र अनेक

मुंबईतील इतर भागांमध्ये अनधिकृत फेरीवाल्यांवर कधी होणार कारवाई ?

आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर कुलाबा कॉजवेवरील अनधिकृत फेरीवाले हटवले मुंबई (खास प्रतिनिधी) : कुलाबा कॉजवेवरील

मेट्रोंना विविध सेवा देणारी आता एकच कंपनी

मुंबई (प्रतिनिधी): मुंबई महानगर प्रदेशातील विविध प्राधिकरण आणि कंपन्यांचे मेट्रो प्रकल्पांचे एकत्रिकरण

रविवारी मुख्य व हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

मुंबई (प्रतिनिधी) : मध्य रेल्वेवर विविध अभियांत्रिकी आणि देखभाल कामांसाठी रविवारी ९ नोव्हेंबर रोजी उपनगरी