Pratap Sarnaik Buy First Tesla Car : प्रताप सरनाईकांच सरप्राईज! देशातील पहिली टेस्ला कार थेट नातवाच्या नावावर

मुंबई : भारतात टेस्लाच्या एंट्रीची आतुरतेने वाट पाहिली जात होती आणि अखेर १५ जुलै रोजी हा ऐतिहासिक क्षण आला. मुंबईतील बीकेसी (BKC) परिसरात भव्य कार्यक्रमाद्वारे टेस्लाचे पहिले शोरूम सुरू करण्यात आले. या लॉन्चनंतर तब्बल दीड महिन्याच्या प्रतीक्षेनंतर आजपासून म्हणजेच ५ सप्टेंबरपासून टेस्लाच्या गाड्यांचे वितरण सुरू झाले आहे. विशेष म्हणजे, देशात विक्रीसाठी उपलब्ध झालेली सर्वात पहिली टेस्ला कार महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी खरेदी केली आहे. त्यांनी पूर्वीच जाहीरपणे सांगितले होते की, "देशातील पहिली टेस्ला मीच घेणार." आज त्यांनी आपला हा निर्धार पूर्ण करत टेस्लाची पहिली कार घरी आणली आहे. या घटनेनं महाराष्ट्राबरोबरच संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे.



"भारताची पहिली टेस्ला खरेदी केल्याचा अभिमान" – प्रताप सरनाईक


भारतामध्ये पहिली टेस्ला कार खरेदी करण्याचा मान मिळाल्याचा मला अभिमान आहे, अशी प्रतिक्रिया परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. विशेष म्हणजे, ही कार कोणत्याही सवलतीशिवाय त्यांनी पूर्ण पैसे भरून विकत घेतली आहे. त्यांनी सांगितले की, “ही टेस्ला मी माझ्या मुलाला नाही तर थेट माझ्या नातवाला देत आहे. तो जेव्हा शाळेत ही कार घेऊन जाईल, तेव्हा त्याच्या मित्रांना आणि इतरांना पर्यावरणपूरक कारचा संदेश मिळेल.” टेस्ला ही कार केवळ पर्यावरणस्नेहीच नाही, तर जगभरातील सर्वात सुरक्षित आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेली कार म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामुळे सरनाईकांच्या या खरेदीने पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाविषयी जनजागृती होण्यास मदत होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.



Tesla Y Model Car – टेस्लाच्या इलेक्ट्रिक कारची वैशिष्ट्य काय?


तुफानी वेग : टेस्ला कंपनीची Model ३ RWD कार केवळ ५.६ सेकंदांत शून्य ते १०० किमी/ता वेग पकडू शकते.


लाँग रेंज परफॉर्मन्स : Tesla ३ LR RWD हे मॉडेल एका चार्जवर तब्बल ६२२ किमी पर्यंत प्रवास करण्यास सक्षम आहे.


स्टँडर्ड रेंज : टेस्लाच्या Standard RWD व्हर्जनमध्ये एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ५०० किमी अंतर पार करता येते.


आधुनिक डिझाईन : नवीन Model Y मध्ये बाह्य आणि आतील डिझाइनमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, मागील सीटसाठी आता स्वतंत्र टचस्क्रीन आणि इलेक्ट्रिक ॲडजस्टेबल फिचर उपलब्ध आहे.


जगभरातील सर्वाधिक लोकप्रिय कार : Model Y ही केवळ टेस्लाचीच नव्हे, तर जगभरात सर्वाधिक विक्री होणाऱ्या इलेक्ट्रिक कार्सपैकी एक आहे.


कडवी स्पर्धा : या मॉडेलची स्पर्धा BMW X1 LWB, Volvo C40, BYD Sealion ७, आणि Mercedes-Benz EQA यांसारख्या प्रीमियम इलेक्ट्रिक SUV सोबत होणार आहे.


किंमतीत वाढीचे कारण : भारतात ही कार पूर्णपणे आयात (CBU) पद्धतीने आणली जात असल्यामुळे तिच्या किंमती तुलनेने जास्त आहेत.





Tesla Y Model LR RWD Car : टेस्ला कारच्या कोणत्या रंगासाठी किती जास्तीचे पैसे मोजावे लागणार?


भारतात टेस्लाच्या Model Y गाडीची किंमत अधिकृतपणे जाहीर झाली आहे. या गाडीच्या RWD व्हर्जनची किंमत ₹६१.०७ लाख इतकी ठेवण्यात आली असून, LR RWD व्हर्जनची किंमत ₹६९.१५ लाख आहे. याशिवाय, ग्राहकांना आपल्या आवडीनुसार गाडीचा रंग निवडायचा असल्यास त्यासाठी अतिरिक्त शुल्क आकारले जाणार आहे. त्यामुळे कारच्या फिचर्सप्रमाणेच तिच्या किंमतीही प्रीमियम श्रेणीत मोडतात.


स्टेल्थ ग्रे-


पर्ल व्हाइट मल्टी-कोट – ₹९५,०००अतिरिक्त


डायमंड ब्लॅक – ₹९५,०००अतिरिक्त


ग्लेशियर ब्लू – ₹१,२५,००० अतिरिक्त


क्विक सिल्व्हर – ₹१,८५,००० अतिरिक्त


अल्ट्रा रेड – ₹१,८५,००० अतिरिक्त

Comments
Add Comment

Andheri Marol Gas Leak.. अंधेरीतील रमाबाई नगरमध्ये गॅस गळतीमुळे स्फोट, लाईट सुरू करताच ठिणगी पेटली

अंधेरी : मुंबईतील अंधेरी पूर्वेच्या मरोळ येथील रमाबाई नगर परिसरात पहाटे गॅस लीकमुळे भीषण स्फोट झाल्याची घटना

महापालिका मुख्यालयाची दृष्टी सुधारणार; इमारतीत एआय आधारीत सीसी टिव्ही कॅमेरे बसवणार

मुंबई (सचिन धानजी): मुंबई महापालिकेच्यावतीने मुख्यालय इमारतीत बसवण्यात आलेल्या सी सी टिव्ही कॅमेरे जुने झाले

नरे पार्कच्या तुटलेल्या भिंती, पदपथांची होणार दुरुस्ती

मुख्य प्रवेशद्वारांसह होणार मैदानाची रंगरंगोटी मुंबई (विशेष प्रतिनिधी): परळमधील नरे पार्कचे मैदान या

निवडून येणाऱ्या जागांवरच भाजपाच्या इच्छुकांच्या उड्या

जिंकून येणाऱ्या जागांवर परस्पर होते घुसखोरी मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महापालिकेवर महायुतीचा झेंडा

विक्रोळी ते भांडुप मध्ये सोमवारपासून ८७ तासांचा पाणीब्लॉक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) च्‍या मेट्रो लाईन ७ अ प्रकल्पाच्या

BJP News : भाजपचा उबाठासह शरद पवारांना पुन्हा दणका! माजी आमदार सुरेश भोईर, संजोग वाघेरेंच्या हाती कमळ

शरद पवारांच्या आमदराचा मुलगा भाजपमध्ये दाखल मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर होताच,