नेपाळमध्ये फेसबुक आणि यूट्यूबसह २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी

काठमांडू : नेपाळमध्ये फेसबुक,व्हॉट्सअॅप आणि एक्ससह २६ सोशल मीडिया साइट्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. नेपाळ सरकारने या संदर्भात दूरसंचार प्राधिकरणाला आदेश जारी केला. नेपाळने सर्व सोशल मीडिया कंपन्यांना नोंदणी करण्यासाठी अल्टिमेटम दिला होता. तरीही, कंपन्यांनी रस दाखवला नाही. त्यामुळे अंतिम मुदत संपल्यानंतर, सरकारने त्यांच्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.


दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री पृथ्वी सुब्बा गुरुंग, मंत्रालयाचे अधिकारी, नेपाळ दूरसंचार प्राधिकरणाचे प्रतिनिधी, दूरसंचार ऑपरेटर आणि इंटरनेट सेवा प्रदाते यांच्या उपस्थितीत बैठक झाली. सर्व नोंदणीकृत नसलेले प्लॅटफॉर्म तात्काळ बंदी घालण्यात येतील, असे बैठकीत ठरवण्यात आले. न्यायमूर्ती टेकप्रसाद ढुंगाना आणि न्यायमूर्ती शांती सिंग थापा यांच्या खंडपीठाने हा आदेश जारी करताना सांगितले की, परदेशी प्रसारण संस्था जर नेपाळमध्ये प्रसारण करू इच्छित असतील, तर त्यांना परवानगी घ्यावी लागेल. तसेच सरकारने यासाठी कायदे करणे आवश्यक आहे.


सध्या, नेपाळमध्ये व्हायबर, टिकटॉक, व्हीटॉक आणि निंबझ सारख्या प्लॅटफॉर्मची नोंदणी झाली आहे, तर टेलिग्राम आणि ग्लोबल डायरीची प्रकरणे प्रक्रियेत आहेत. फेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्सअॅप सारख्या मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या प्लॅटफॉर्मची नोंदणी अद्याप सुरू झालेली नाही. ही बंदी देशभर लागू असेल असे दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाने एका आदेशात देशी किंवा परदेशी मूळच्या ऑनलाइन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची अनिवार्य यादी तयार करण्यास आणि अवांछित सामग्रीचे मूल्यांकन आणि देखरेख करण्यास सांगितले होते. यानंतर, मंत्रिमंडळाने ७ दिवसांचा अल्टिमेटम जारी केला होता. ही बंदी फेसबुक, मेसेंजर, इंस्टाग्राम, यूट्यूब, व्हॉट्सअॅप, ट्विटर, लिंक्डइन, स्नॅपचॅट, रेडिट, डिस्कॉर्ड, पिंटरेस्ट, सिग्नल, थ्रेड्स, वीचॅट, क्वोरा, टंबलर यासारख्या इतर सर्व प्रमुख सोशल मीडिया आणि कम्युनिकेशन प्लॅटफॉर्मवर तसेच क्लबहाऊस, रंबल, एमआय व्हिडीओ, एमआय वायके, लाइन, इमो, झॅलो, सोल आणि हॅम्रो पॅट्रो सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लागू होईल.

Comments
Add Comment

पाकिस्तान–अफगाणिस्तान तणाव पुन्हा वाढला: तालिबानकडून इस्लामाबादवर हल्ल्याची तयारी

Pakistan Afghan War : पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील संबंध पुन्हा एकदा धोक्याच्या टप्प्यावर पोहोचले आहेत. काही दिवसांपूर्वी

पाकिस्तानमध्ये टोमॅटो ६०० रुपये किलो, मोफत मिळणारी कोथिंबीरही ५० रुपयांना

इस्लामाबाद : अफगाणिस्तान सोबतच्या संघर्षाचा फटका आता पाकिस्तानला बसू लागला आहे. देशात टोमॅटोच्या किंमती

‘मांजरांचे बेट’ अशी ओळख असलेलं अनोखं ठिकाणं

टोकियो : जगात अनेक रहस्यमय आणि अनोखी ठिकाणे आहेत; पण जपानमधील एका बेटाने आपल्या वैशिष्ट्यांमुळे पर्यटकांना

मेट्रोत झोपलात, तर भरावा लागेल हजारोंचा दंड!

दुबई : दररोज असंख्य लोक रेल्वेप्रमाणेच मेट्रोने प्रवास करतात आणि प्रवास म्हटलं की थोडी झोप आलीच. पण मेट्रो

ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य! युक्रेन विरूद्ध रशिया युद्धासंबंधी चीनसोबत करणार चर्चा

अमेरिका: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच चीनवर शंभर टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली

तब्बल ५ हजार ५०० किलो वजनाची सोन्याची बुद्ध मूर्ती!

थायलंड  : बुद्धांचे अनुयायी जगभरात अब्जावधींच्या संख्येने आहेत, जे अनेक देशांमध्ये पसरलेले आहेत. भगवान