मुंबई : उद्या अनंत चतुर्दशीच्या दिवशी मुंबईत गणेश विसर्जनाचा भव्य सोहळा पार पडणार आहे. लाखो मुंबईकर या उत्सवात सहभागी होऊन आपल्या बाप्पाला निरोप देण्यासाठी रस्त्यावर उतरतील. गेल्या दहा दिवसांत मुंबई पोलिसांनी काटेकोर बंदोबस्त ठेवत सर्व मुंबईकरांना गणेशोत्सव निर्विघ्न आणि आनंदात साजरा करता आला. त्यांच्या सतर्कतेमुळे कुठलाही अप्रिय प्रकार घडला नाही. मात्र, आता पोलिसांसमोर आणखी एक मोठे आव्हान उभे ठाकले आहे. अनंत चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला मुंबईत बॉम्बस्फोटाची धमकी देणारा धक्कादायक मेसेज समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर उद्याचा दिवस मुंबई पोलिसांसाठी खरी कसोटी ठरणार आहे. दरवर्षीप्रमाणे पोलिसांना विसर्जनाची गर्दी सांभाळण्याचा अनुभव असला, तरी या नव्या धमकीमुळे सावधगिरीचा इशारा अधिक कडक करण्यात आला आहे.
मुंबई : राज्य सरकारने अनुकंपा (Anukampa Recruitment) तत्त्वावरील नोकरीसंदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या भरती ...
१४ पाकिस्तानी दहशतवादी भारतात शिरल्याची माहिती
धमकीच्या मेसेजमध्ये ‘लश्कर-ए-जिहादी’ या दहशतवादी संघटनेचे तब्बल १४ पाकिस्तानी दहशतवादी भारतात घुसल्याचा दावा करण्यात आला आहे. या माहितीमुळे मुंबई पोलिसांनी तातडीने सुरक्षेचे उपाय अधिक कडक केले असून, संपूर्ण शहरात पोलिस दल अलर्ट मोडवर ठेवण्यात आले आहे. गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत मोठ्या प्रमाणावर गर्दी जमते, त्यामुळे नेहमीच सुरक्षा यंत्रणा अतिरिक्त खबरदारी घेत असते. मात्र, अनंत चतुर्दशीच्या दिवशी ही जबाबदारी आणखी वाढणार आहे, कारण याच दिवशी मोठ्या मंडळांचे गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ होतात आणि शहरातील विविध ठिकाणी मिरवणुका निघतात. त्यामुळे पोलिस प्रशासन अधिक दक्षतेने हालचाली करत आहे.
परळ-लालबाग आणि गिरगाव चौपाटीत उसळणार भाविकांची प्रचंड गर्दी!
मुंबईत उद्या गणेश विसर्जनाच्या दिवशी दोन ठिकाणी सर्वाधिक गर्दी उसळण्याची शक्यता आहे. परळ-लालबाग परिसर आणि गिरगाव चौपाटी. सकाळपासूनच लालबागमध्ये भक्तांची प्रचंड रेलचेल असेल. जगभरातील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेला लालबागचा राजा, तसेच मुंबईचा राजा (गणेश गल्ली), चिंचपोकळीचा चिंतामणी, परळचा राजा (नरेपार्क), परळचा महाराजा, परळचा लंबोदर या प्रसिद्ध मंडळांच्या गणेशमूर्ती विसर्जनासाठी मार्गस्थ होतील. या वेळी आपल्या लाडक्या बाप्पाचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी लाखो मुंबईकर रस्त्यावर उतरणार असून, वातावरण भाविकांच्या जयघोषाने दुमदुमून जाणार आहे.