आशिया कपमध्ये कोण असणार भारताचा स्पॉन्सरर ?


मुंबई : आशिया कप स्पर्धेपूर्वी संसदेत एक बिल पास झाले आणि बीसीसीआयच्या जर्सी स्पॉन्सरला गाशा गुंडाळावा लागला. ऑनलाईन गेमिंग संदर्भातील बिल पास झाल्याने ड्रीम इलेव्हनचा बाजार उठला. त्यामुळे बीसीसीआय आणि ड्रीम ११ यांच्यातील करार रद्द झाला आहे. खरे तर हा करार २०२६ पर्यंत होता. पण एका वर्षाआधीच हा करार संपुष्टात आला आहे. आता बीसीसीआय नव्या स्पॉन्सरच्या शोधात आहे. आशिया कप स्पर्धेच्या तोंडावर बीसीसीआयची नव्या स्पॉन्सरसाठी शोधाशोध सुरु झाली आहे. मात्र बीसीसीआयला आपल्या मनासारखा स्पॉन्सर काही मिळालेला नाही. त्यामुळे भारतीय संघ आशिया कप स्पर्धेत जर्सीवर विना स्पॉन्सर उतरण्याची शक्यता आहे. अस असताना बीसीसीआयने एक मोठा निर्णय घेतला आहे. रिपोर्टनुसार, बीसीसीआयने भारतीय संघाला स्पॉन्सर करण्यासाठी बेस प्राईस वाढवली आहे. आता जे कोणती कंपनी भारतीय संघाची स्पॉन्सर असेल त्या कंपनीला द्विपक्षीय मालिकेतील प्रत्येक सामन्यासाटी ३.५ कोटी रुपये द्यावे लागतील. तर आशिया आणि आयसीसी स्पर्धेसाठी ही रक्कम १.५ कोटी असेल.


बीसीसीआय आणि ड्रीम इलेव्हनचा मागचा करार पाहता द्विपक्षीय सामन्यासाठी ३.१७ कोटी इतकी रक्कम होती. तर आयसीसी आणि आशिया कप स्पर्धेच्या प्रत्येक सामन्यासाठी १.१२ कोटी रक्कम निश्चित केली होती. म्हणजेच बीसीसीआयने नव्या करारात ही रक्कम ३० ते ४० लाख रुपयांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. तसे पाहिले तर सध्याच्या मार्केट रेटपेक्षा ही रक्कम अधिक आहे. बीसीसीआय द्विपक्षीय सामन्यासाठी जास्त पैसे घेण्याचे कारण म्हणजे कंपनीचे नाव असलेले जर्सीवरील ठिकाण… हे नाव खेळाडूने परिधान केलेल्या जर्सीच्या छातीवर असते. पण आयसीसी आणि आशिया कप स्पर्धेत तसे करता येत नाही. स्पॉन्सरचे नाव खेळाडूंच्या स्लीव्सवर असते.


बीसीसीआयने नव्या टायटल स्पॉन्सरच्या लिलावासाठी १६ सप्टेंबरची तारीख निश्चित केली आहे. त्यामुळे आशिया कप स्पर्धेत भारतीय संघाला कोणीही स्पॉन्सर नसेल. तसेच यावेळी गेमिंग, बेटिंग, क्रिप्टो आणि तंबाखू कंपन्यांना अर्ज करता येणार नाही. तर स्पोर्टवियर ब्रँड, इन्शुअरन्स, बँकिंग फायनान्स कंपनी देखील स्पॉन्सर करू शकत नाही, हे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. बीसीसीआय तीन वर्षांसाठी स्पॉन्सर शोधत आहे. यात एकूण १३० सामने असतील. यात टी २० वर्ल्डकप २०२६, वनडे वर्ल्डकप २०२७ या स्पर्धा असतील. बीसीसीआयला या १३० सामन्यातून एकूण ४०० कोटीहून अधिक रुपये मिळू शकतात.


Comments
Add Comment

टी-२० सामन्यात सोनम येशेचा ८ बळींचा जागतिक विक्रम

भूतानच्या फिरकीपटूने म्यानमारविरुद्ध रचला इतिहास; ४ षटकांत दिल्या ७ धावा भूतान : फिरकीपटू सोनम येशे याने इतिहास

न्यूझीलंडविरुद्ध वनडेतून ३ स्टार खेळाडूंचा पत्ता कट ? दिग्गजांचं कमबॅक ?

मुंबई : जानेवारीत न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी बीसीसीआय लवकरच संघाची घोषणा करणार

गौतम गंभीरच भारताचा कसोटी प्रशिक्षक

नवी दिल्ली : गौतम गंभीर भारताचा कसोटी प्रशिक्षक म्हणू्न कायम राहील. बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया यांनी स्पष्ट

भारतीय महिला हॉकीला सापडला नवा ‘हिरा’

प्रशिक्षिका हेलिना मेरीकडून बन्सुरी सोलंकीचे कौतुक नवी दिल्ली : भारतीय महिला हॉकीच्या भविष्यातील सुरक्षित

श्रेयस अय्यरच्या पुनरागमनाचा मार्ग मोकळा

न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी सज्ज नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघासाठी एक आनंदाची बाब समोर आली आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग चौथा विजय

तिरुवनंतपुरम : श्रीलंकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग चौथा विजय झाला. या