जीएसटीच्या करप्रणालीमध्ये बदल
२०१७ मध्ये लागू झालेल्या जीएसटीच्या करप्रणालीमध्ये अखेरीस बदल करण्यात आला आहे. १८ आणि २८ टक्के जीएसटी कर प्रणाली रद्द करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, 'मी दिलेलं वचन पूर्ण केलं आहे. आता याचा फायदा सामान्य माणूस, शेतकरी, एमएसएमई, मध्यमवर्गीय, महिला आणि तरुणांना होईल' अशी प्रतिक्रिया दिली.
पंतप्रधानांनी ट्विट करत दिली माहिती
जीएसटी परिषदेच्या ५६व्या मॅरेथॉन बैठकीमध्ये अखेरीस कर रचनेत मोठा बदल करण्यात आला आहे. आता केवळ ५ टक्के आणि १८ टक्के हे दोनच कर स्लॅब राहणार आहे. या निर्णयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून आपली प्रतिक्रिया दिली.
काय म्हंटले पंतप्रधान मोदी?
"'स्वातंत्र्यदिनाच्या माझ्या भाषणात, मी म्हटलं होतं की, आम्ही जीएसटीमध्ये पुढील पिढीसाठी सुधारणा आणण्याचा मानस करतो. केंद्र सरकारने एक सविस्तर प्रस्ताव तयार केला आहे, ज्यामध्ये व्यापक जीएसटी दरांचे तार्किक पुनर्रचना आणि प्रक्रिया सुधारणांचा समावेश आहे. त्याचे उद्दिष्ट सामान्य नागरिकांचे जीवन सोपे करणे आणि अर्थव्यवस्था मजबूत करणे आहे.' अशी प्रतिक्रिया पंतप्रधानांनी दिली.
तसंच, 'जीएसटी कौन्सिल, ज्यामध्ये केंद्र आणि राज्य दोन्ही समाविष्ट आहेत, मला हे कळवण्यास आनंद होत आहे की, केंद्र सरकारने सादर केलेल्या जीएसटी दरांमध्ये कपात आणि सुधारणांचे प्रस्ताव एकत्रितपणे मंजूर करण्यात आले आहेत. याचा फायदा सामान्य माणूस, शेतकरी, एमएसएमई, मध्यमवर्गीय, महिला आणि तरुणांना होईल. या व्यापक सुधारणांमुळे आपल्या नागरिकांचे जीवन सुधारेल आणि सर्वांसाठी, विशेषतः लहान व्यापारी आणि व्यवसायांसाठी व्यवसाय करण्याची सोय सुनिश्चित होईल' अशी आशाही पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केली आहे.