सोन्या चांदीत विक्रमी वाढ ! सोन्यात सलग पाचव्यांदा चांदीत सलग चौथ्यांदा वाढ 'या' कारणांमुळे!

मोहित सोमण:आज युएस रशिया यांच्यातील द्वंद्व सुरूच असल्याने, गुंतवणूकदारांना सप्टेंबरमधील फेडरल व्याजदरात कपातीकडे आशावाद दिसल्याने, युएसमधील ढासळणारी अर्थव्यवस्था अशा एकत्रित कारणांमुळे सोन्यात सलग पाचव्यांदा वाढ झाली अ सून सोने नव्या उच्चांकावर पोहोचले आहे. 'गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार,२४ कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम दर ८८ रूपयांनी, २२ कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम दर ८० रूपयांनी, १८ कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम दर ६६ रूपयांनी वाढला आहे. त्यामुळे प्रति ग्रॅम सो न्याचा दर २४ कॅरेटसाठी १०६९७ रूपये, २२ कॅरेटसाठी ९८०५ रूपये, १८ कॅरेटसाठी ८०२३ रूपयांवर गेला आहे. २४ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा दरात ८८० रूपये, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा दरात ८०० रूपये, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा दरात ६६० रू पये वाढ झाली आहे. त्यामुळे प्रति तोळा दर २४ कॅरेटसाठी १०६९७० रूपये, २२ कॅरेटसाठी ९८०५० रूपये, १८ कॅरेटसाठी ८०२३० रूपयांवर पोहोचला आहे.


मुंबईसह देशातील प्रमुख शहरात सोन्याचा सरासरी प्रति ग्रॅम दर १०६९७ रूपये, २२ कॅरेटसाठी ९८०५० रूपयांवर गेला आहे. जागतिक पातळीवरील गोल्ड फ्युचर निर्देशांकात संध्याकाळपर्यंत ०.५१% वाढ झाली आहे. जागतिक पातळीवरील मानक म्हणून ओळ खल्या जाणाऱ्या युएस गोल्ड स्पॉट दरात ०.३३% वाढ झाल्याने सोन्याची दरपातळी प्रति डॉलर ३५४५.९९ औंसवर गेली आहे. भारतातील कमोडिटी बाजारातील एमसीएक्स (Multi Commodity Exchange MCX) ०.४६% वाढ झाल्याने एमसीएक्स दरपातळी १०६२८३ रूपयांवर पोहोचली आहे. आज डॉलरच्या तुलनेत रुपयाची वाढ झाल्यानं आणखी होणारी सोन्याची रॅली रोखली गेली आहे.


आजच्या सोन्याच्या हालचालींवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले आहेत की,'सोन्याचा भाव COMEX वर $3545 आणि एमसीएक्सवर (MCX) वर १०६३०० रूपयांच्या उच्चांकासह सकारात्मक व्यवहार क रत होता. डॉलरची कमकुवतपणा, टॅरिफ अनिश्चितता आणि अमेरिका, भारत, रशिया आणि चीनमधील भू-राजकीय स्थिती यामुळे किमती वाढत राहिल्याने त्याची तेजीची गती कायम राहिली आहे. या आठवड्याचे लक्ष अमेरिकेतील प्रमुख डेटा - ISM सेवा PMI, बेरोजगारीचे दावे आणि फेड अधिकाऱ्यांचे भाष्य - यावर आहे जे जवळच्या काळातील भावनांना चालना देईल. अल्पकालीन श्रेणी सकारात्मक राहते, $३४८० वर समर्थन आणि $३५६५ रूपयांवर प्रतिकार आहे, तर MCX गोल्डला १०५००० रूपयांच्या जवळ स मर्थन (Support) आणि १०७५०० रूपयांवर प्रतिकार (Resistance) आहे.'


चांदीतही सलग चौथ्यांदा वाढ !


चांदीच्या दरातही आज मोठी वाढ झाली आहे. वाढलेल्या डॉलर पातळीसह गुंतवणूकदारांकडून वाढलेल्या स्पॉट मागणीसह औद्योगिक मागणीत वाढ झाल्याने तसेच जागतिक अस्थिरतेत चांदीच्या गुंतवणूकीत वाढ झाल्याने चांदी आजही महागली होती. 'गुडरिट र्न्स ' संकेतस्थळावरील माहितीनुसार, चांदीच्या प्रति ग्रॅम दरात ०.९० रूपयांनी, प्रति किलो दरात ९०० रूपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे प्रति ग्रॅम दर १२७ रूपयांवर, प्रति किलो दर १२७००० रूपयांवर गेले आहेत. मुंबईसह भारतातील प्रमुख शहरातील चांदीचे सरासरी प्रति १० ग्रॅम दर १२७० रूपये, प्रति किलो दर १३७००० रूपयांवर गेले आहेत. भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये चांदीच्या निर्देशांकात ०.२१% वाढ झाल्याने दरपातळी १२४७८९ रूपयांवर गेली आहे. जागतिक पातळीवरील सिल्वर फ्युचर निर्देशांकात संध्याकाळपर्यंत ०.४०% वाढ झाली आहे.


औद्योगिक आघाडीवर मजबूत मागणी ही एक प्रमुख चालकता असली तरी विशेषतः चीनच्या सौर क्षेत्राकडून, जिथे २०२५ च्या पहिल्या सहामाहीत सौर पेशींच्या निर्यातीत ७०% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. ज्यामध्ये भारत प्रमुख खरेदीदार म्हणून आघाडीवर हो ता. चांदी-समर्थित एक्सचेंज-ट्रेडेड उत्पादनांमध्ये (ETPs) गुंतवणूकदारांनी प्राध्यान्य दिलेल्या २०२५ च्या पहिल्या सहामाहीत चांदीत ९५ दशलक्ष औंसचा निव्वळ प्रवाह नोंदवला गेला आहे. ज्यामुळे जागतिक होल्डिंग १.१३ अब्ज औंसवर पोहोचली, जी फेब्रुवारी २०२१ च्या विक्रमी शिखरापेक्षा फक्त ७% केवळ कमी आहे.

Comments
Add Comment

लाल किल्ला परिसरातील स्फोटानंतर केंद्र सरकारचा इशारा: भारतावर हल्ला करणाऱ्यांना कठोर शिक्षा करणार

नवी दिल्ली : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटानंतर देशभरात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली असून,

भारतातील टीबीविरोधी मोहिमेचा मोठा टप्पा: भारतातील टीबी रुग्णांच्या संख्येत २१ टक्क्यांची घट

पंतप्रधान मोदींची आरोग्य क्षेत्राला शाबासकी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी भारतात क्षयरोग

मुंबईतील २५२ कोटींच्या एमडी ड्रग्ज प्रकरणात मोठा खुलासा: सलीम शेखच्या कबुलीजबाबाने खळबळ

मुंबई : देशभरात खळबळ माजवणाऱ्या २५२ कोटी रुपयांच्या मेफेड्रोन (एमडी) प्रकरणात पोलिसांना आणखी एक मोठा धागा मिळाला

दिल्ली स्फोट प्रकरणी AIU ची अल फलाह विद्यापीठावर कारवाई

नवी दिल्ली : लाल किल्ला परिसरात आय ट्वेंटी कारमधील स्फोटकांचा स्फोट झाला. या अतिरेकी हल्ल्याप्रकरणी तपास पथकाने

सिंहस्थ कुंभमेळा जगाच्या अध्यात्मिक नकाशावर भारताला अधोरेखित करणार

५,७५७ कोटी ८९ लाख रुपयांच्या विकासकामांचे मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते

टेलिग्राम हे दहशतवाद्यांसाठी नवीन चॅट डेस्टिनेशन

नवी दिल्ली : दिल्लीत नुकत्याच झालेल्या कार बॉम्बस्फोटात सहभागी असलेले डॉ. उमर मोहम्मद आणि त्यांचे साथीदार