मेट्रो-४ मार्गिकेच्या कामाला गती, गर्डरचे काम पूर्ण


मुंबई : बहुप्रतीक्षित ठाणे मेट्रो प्रकल्पातील सहा स्थानकांसाठी आवश्यक असलेले गार्डर बसवण्याचे काम पूर्ण झाले. यामुळे ठाणे आणि परिसरातील प्रवाशांना लवकरच मेट्रोच्या माध्यमातून जलद प्रवासाचा अनुभव घेता येणार आहे. ठाणे मेट्रो प्रकल्पातील हा टप्पा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मेट्रो ४ च्या कामाला गती दिली आहे. पहिल्या टप्प्यात एकूण १३ किलोमीटरच्या मार्गापैकी ६.९० किलोमीटरवर गर्डरची कामे पूर्ण झाली आहेत. यामुळे प्रकल्पाच्या कामाला आणखी वेग आला आहे.


ठाणे-वडाळा-घाटकोपर-कसारवडवली या मार्गावर मेट्रोचे काम सुरू आहे. गर्डरची कामे पूर्ण झाल्याने आता स्थानके उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. पहिल्या टप्प्यात एकूण १३ किलोमीटरपैकी ६.९० किलोमीटरच्या मार्गावरील गार्डरची कामे पूर्ण झाली आहेत. पहिल्या टप्प्यातील काम जवळपास ५० टक्के पूर्ण झाले आहे आणि उर्वरित कामही लवकरच पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे.


या कामांमध्ये प्री-कास्ट यु-गार्डरचा वापर करण्यात आला आहे. यामुळे भविष्यातील प्रवाशांसाठी ही एक मोठी सोय ठरेल. मेट्रो ४ च्या मार्गात कापुरबावडी, मानपाडा, टिकुजिनीवाडी, डोंगरीपाडा, विजय गार्डन, कासारवडवली या महत्वाच्या सहा स्थानकांचा समावेश आहे. या भागांमध्ये काम पूर्ण झाल्यामुळे नागरिकांना प्रवासासाठी चांगला पर्याय उपलब्ध होईल.


ठाणे मेट्रो प्रकल्पामुळे ठाणे परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या कमी होण्यास मोठी मदत होणार आहे. सध्या रस्त्यांवर असलेल्या वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिकांना दररोज प्रवासात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मेट्रो सुरू झाल्यावर प्रवाशांचा वेळ वाचेल आणि प्रवास अधिक सुखकर होईल.


Comments
Add Comment

एसटी बसस्थानक स्वच्छतेसाठी दर १५ दिवसांनी विशेष मोहीम — प्रवाशांच्या सुरक्षित, आरोग्यदायी प्रवासासाठी एसटी महामंडळाचा पुढाकार

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व बसस्थानकांवर, बसस्थानक परिसरात तसेच प्रशासकीय

उमेदवारी अर्ज, प्रचार रथ, झेंडे आणि प्रचार साहित्यांची खरेदी आणि उबाठाने कापला पत्ता...

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : वडाळ्यातील माजी नगरसेवक अमेय घोले यांनी उबाठाला राम राम ठोकत शिवसेनेत प्रवेश

भांडुप बेस्ट अपघात प्रकरणी बेस्टतर्फे चौकशी

मृतांना बेस्ट तर्फे २ लाख,र मुख्यमंत्र्यांकडून ५ लाखांची मदत मुंबई : सोमवारी रात्री भांडुप पश्चिम या

आज मध्यरात्री उशिरापर्यंत धावणार 'मेट्रो १'

मुंबईकरांना इच्छितस्थळी जाणे सुकर होणार मुंबई : घाटकोपर,वर्सोवा,अंधेरी मेट्रो-१ मार्गिकेवरील सेवा उद्या

१ ते ३१ जानेवारी दरम्यान राज्यात ‘रस्ता सुरक्षा अभियान’

मुंबई : रस्ते अपघातांमध्ये होणारी जीवितहानी कमी करण्यासाठी आणि नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षेविषयी जनजागृती

मतदानाच्या दिवशी, १५ जानेवारी रोजी भरपगारी सुट्टी

मुंबई : राज्यातील सर्व सरकारी,निमसरकारी आणि खासगी आस्थापना मधील सर्व कर्मचाऱ्यांना यंदाची संक्रात पावली आहे. १५