धक्कादायक बातमी! बडतर्फ पोलिस अधिकारी सुनील नागरगोजे यांची आत्महत्या, काय आहे प्रकरण?

बीड: परभणीतील अधीक्षकांना शिवीगाळ प्रकरणी बडतर्फ केलेले पोलीस निरीक्षक सुनील नागरगोजे (Sunil Nagargoje) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना अंबाजोगाईत घडली आहे. बडतर्फीनंतर नागरगोजे हे नैराश्यात गेले होते. या नैराश्यातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे.

परभणीतील शिस्तभंग प्रकरणात एप्रिल 2025 मध्ये त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. यासंदर्भात त्यांची चौकशी देखील सुरू होती. बदलीनंतर बीड येथे त्यांना नियंत्रण कक्षात ठेवले गेले होते. दरम्यान, अंबाजोगाई येथे नवीन घराचे बांधकाम सुरू असल्याने, नागरगोजे हे भाड्याच्या घरात एकटेच राहत होते. त्यादरम्यान रविवार रात्री आठ वाजण्याच्या सुमारास त्यांनी अंबाजोगाई येथील निवासस्थानी आत्महत्या करून जीवन संपवले. सध्या त्यांची मुले पुण्यात शिक्षण घेत आहेत. त्यांच्या पत्नीही सध्या पुण्यात मुलांजवळ असल्याचे सांगितले जात आहे.

सुनील नागरगोजे यांचे मूळ गाव परळी तालुक्यातील नागदरा आहे. मात्र, ते अनेक वर्षांपासून कुटुंबियांसह अंबाजोगाई येथे वास्तव्यास होते. पोलीस खात्यात काम करताना त्यांनी परभणी, लातूर आणि बीड या ठिकाणी सेवा बजावली होती. लातूर येथे त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचा पदभार सांभाळला होता.

परभणीत पोलीस अधीक्षकांना शिवीगाळ केल्याचा आरोप


परभणी येथे कार्यरत असताना एका पोलीस अधीक्षकांना शिवीगाळ केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता. या प्रकरणाची चौकशी सुरू असतानाच, बीड येथे बदली झाल्यानंतर त्यांनी पुन्हा एका कर्मचाऱ्याला शिवीगाळ करत धमकी दिली होती. त्यामुळे त्यांना बीड येथे नियंत्रण कक्षातच सीमित ठेवण्यात आले होते.

दरम्यान, त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. सुनील नागरगोजे यांनी आत्महत्या नेमकी का केली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई शहर पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सुनील नागरगोजे यांचा मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी (शवविच्छेदनासाठी) अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात पाठवला आहे.या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.
Comments
Add Comment

वर्धा शहरातील रामनगर येथील भूखंड मालकी हक्काने देण्यास मंजुरी

मुंबई : वर्धा नगरपरिषदेच्या मालकीचे रामनगरमधील भाडेपट्ट्याने दिलेले भूखंड कायमस्वरूपी मालकी हक्काने करून

श्री गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहीदी शताब्दी समागम कार्यक्रमासाठी ९५.३५ कोटींची तरतूद

मुंबई : शिख धर्माचे नववे गुरू आणि ‘हिंद-की-चादर’ म्हणून ओळखले जाणारे श्री गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहीदी

मच्छिमारांना कर्जावर चार टक्के व्याज सवलत

मुंबई : राज्यातील मच्छिमार, मत्स्यकास्तकार, मत्स्यउत्पादकांसह किसान क्रेडिट कार्डधारक मत्स्यव्यावसायिकांना २

सोलापूरच्या असंघटित कामगारांच्या ३० हजार घरांचा मार्ग मोकळा

मुंबई : सोलापूर येथील असंघटित कामगारांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मौजे कुंभारी (ता. दक्षिण सोलापूर)

नागपूरच्या लक्ष्मी नारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठास सात कोटी रुपयांचा निधी

मुंबई : नागपूर येथील लक्ष्मी नारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेस जीव रसायनशास्त्र, सूक्ष्म जीवशास्त्र

Breaking News : राज्यात निवडणुकीचे बिगुल वाजले; २ डिसेंबरला होणार मतदान

राज्यात आचारसंहिता लागू २४६ नगरपरिषद, ४२ नगरपंचायतींसाठी होणार मतदान २ डिसेंबरला मतदान, ३