चालत्या ट्रॅव्हल बसमध्ये एकाने घेतले पेटवून! जागीच मृत्यू... अन्य प्रवाशांची धावपळ

  45

जालना: महाराष्ट्रातील जालना येथे चालत्या ट्रॅव्हल्स बसमध्ये एका ५० वर्षीय प्रवाशाने स्वतःवर पेट्रोल ओतून पेटवून घेतले, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. मात्र या घटनेमुळे  बसमध्ये आग लागली, त्यामुळे इतर प्रवाशांमध्ये प्रचंड गोंधळ उडाला.

महाराष्ट्रातील जालना येथून एक भयानक घटना समोर आली आहे. येथील बदनापूर येथे चालत्या ट्रॅव्हल्स बसमध्ये ५० वर्षीय प्रवाशाने स्वतःवर पेट्रोल ओटीन घेत पेटवून दिले, ज्यात त्याचा मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. मृत प्रवाशाचे नाव सुनील सज्जनराव टाले असे सांगण्यात येत आहे. तो बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तहसीलमधील आरेगाव गावचा रहिवासी होता.

नेमके काय आहे प्रकरण?


पुण्याहून पुसेदकडे जाणारी ट्रॅव्हल्स एमपी ०९ डीपी ९९२५ ही बस बदनापूर परिसरातून जात असताना अचानक बसमध्ये जळण्याचा वास येऊ लागला. प्रवाशांनी चौकशी केली असता, १२ क्रमांकाच्या सीटवर बसलेल्या प्रवाशाने स्वतःवर पेट्रोल ओतून पेटवून घेतले असल्याचे निदर्शनास आले. ज्यामुळे बसमध्ये प्रचंड गोंधळ उडाला. यादरम्यान, बदनापूरजवळील निरंकारी पेट्रोल पंपाजवळ चालकाने तात्काळ बस थांबवली. त्यानंतर प्रवाशांनी तात्काळ बदनापूर पोलिसांना या घटनेची माहिती दिली. मात्र तोपर्यंत सदर व्यक्ति चांगलीच जळाली होती. इतकेच नव्हे तर आगीमुळे बसचे देखील अतोनात नुकसान झाले.

पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठवला. त्याच्याजवळ सापडलेल्या सामानावरून मृताची ओळख पटली आणि कुटुंबाला घटनेची माहिती देण्यात आली. मात्र, सुनील ताले यांनी स्वतःला जाळून का घेतले याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. बदनापूर पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या दुःखद घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोक आणि दहशतीचे वातावरण आहे.
Comments
Add Comment

Ganeshotsav 2025 : लहानशा खोलीतलं मोठं मन! चाळीतल्या १०x१० खोलीतून २ बीएचके घरापर्यंतचा प्रवास!

जुन्या आठवणींना उजाळा देणारी अनोखी गणेश सजावट नायगाव बी.डी.डी. चाळ नंबर १७/१८, लहान चाळीच्या खोलीतून आजच्या

ग्रामीण भागातील प्रत्येक रस्त्याला विशिष्ट क्रमांक

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा महत्त्वाकांक्षी निर्णय ग्रामीण रस्ते होणार अतिक्रमणमुक्त ! मुंबई :

Vastu Tips : तुमच्या घरातही या पाच चुका होतात का? वास्तुशास्त्रानुसार लगेच बदला, नाहीतर घरात येईल दरिद्रता!

मुंबई : वास्तुशास्त्रानुसार, घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे खूप

Sleep : गाढ आणि शांत झोपेसाठी या ५ टिप्स नक्की फॉलो करा!

मुंबई : आजकालच्या धावपळीच्या जीवनात, ताणतणाव आणि इतर अनेक कारणांमुळे बऱ्याच लोकांना रात्री शांत झोप लागत नाही.

अभिनेता सलमान खानने घेतली राजनाथ सिंह यांची भेट

नवी दिल्ली : अभिनेता सलमान खानने आज, रविवारी दिल्लीत लखनौचे खासदार आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट

सावंतवाडीत पाच दिवसांच्या गणरायाला निरोप, भक्तिमय वातावरणात गणेशमूर्तींचे विसर्जन

सावंतवाडी: भाद्रपद शुद्ध चतुर्थीला मोठ्या उत्साहात घरोघरी विराजमान झालेल्या लाडक्या गणरायाला आज पाच