Ganeshotsav 2025: गणेशोत्सवातील ध्वनीप्रदूषण रोखण्यासाठी एमपीसीबी सज्ज

पुणे : गणेशोत्सवातील ध्वनिप्रदूषणाविरोधात दाखल झालेल्या याचिकेनंतर राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने एमपीसीबी, पोलिसांनी उत्सवात मंडळांच्या आवाजाची पातळी मोजावी. तसेच मांडवातील ध्वनीप्रदुषणाबाबत जनजागृती करावी असे आदेश दिले आहेत. गतवर्षी पुण्यासह उपनगरांतील २०० मंडळांच्या आवारात आवाजाची मोजणी आणि जनजागृती केली होती. पोलिसांनी ध्वनिमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या १२४ गणेश मंडळांवर गुन्हे दाखल केले होते.


शहराच्या कोणत्या भागात किती आवाजाची पातळी असावी याचे निकष महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (MPCB) निश्चित केलेले आहेत. त्यानुसार यावर्षी गणेशोत्सवातील ध्वनिप्रदुषण रोखण्यासाठी एमपीसीबीने कंबर कसली आहे. मध्यवर्ती शहरासह उपनगरांत निवडलेल्या दोनशे गणेश मंडळांचे अकरा दिवस, तर पंधरा महत्वाच्या वर्दळीच्या चौकांमध्ये चार दिवस एमपीसीबीतर्फे आवाजाची मोजणी होणार आहे.


यावर्षी एपीसीबीने स्वारगेट, शिवाजीनगर, मध्यवर्ती पेठा, एरंडवणे, कोथरूड, सिंहगड रस्ता, सहकारनगर, बिबवेवाडी, कात्रज, खडकी, येरवडा, विश्रांतवाडी यांसह विविध भागांत दोनशे गणेश मंडळे निश्चित केली आहेत. तसेच वर्दळीचे चौकही यामध्ये निवडण्यात आले असून, तेथे मोजणीसाठी एका खासगी संस्थेची नियुक्ती केली आहे. हे पथक दररोज सायंकाळनंतर आवाजाच्या पातळीची नोद घेणार आहेत.
ध्वनिप्रदुषण जनजागृतीसाठीएमपीसीबीने कॉलेजच्या तीनशे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले आहे. हे विद्यार्थी मंडळात ध्वनिप्रदूषाणामुळे मानवी आरोग्य, पर्यावरणावर होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती देतील. तसेच काही ठिकाणी ध्वनिमर्यादिचे फलकही लावले आहेत. यावर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने निश्चित केलेली आवाजाची पातळी आणि सद्यस्थितीतील आवाजाचा आलेख आहे.


“गणेशोत्सवातील ध्वनीप्रदूषण रोखण्यासाठी जनजागृती, प्रत्यक्ष आवाजाची मोजणी आणि उल्लंघन करणाऱ्या मंडळांची यादी तयार करणे अशा तीन पातळ्यांवर एमपीसीबी काम करणार आहे. पहिल्या दिवसापासून पथकांनी नोंदी घेण्यास सुरू केले आहे. मंडळांच्या परिसरातही जनजागृती आणि माहितीपर फलक लावले आहेत.” असे कार्तिकेय लंगोटे, उपप्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ यांनी म्हंटले आहे.

Comments
Add Comment

उदयनराजेंचा शाही सीमोल्लंघन सोहळा रद्द, राजांनी घेतलेल्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक

सातारा : राज्यातील महापूरामुळे निर्माण झालेल्या भीषण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर यंदाचा साताऱ्यातील

"हो, आम्ही लग्न केलं" - सारंग साठ्ये आणि पॉला विवाहबद्ध !

मुंबई : प्रसिद्ध विनोदी कलाकार, दिग्दर्शक आणि अभिनेता सारंग साठ्ये याने त्याची १२ वर्षांची साथीदार पॉला

तरुण दिसायचंय? आहारात 'या' फळांचा करा समावेश, त्वचा राहील चमकदार आणि निरोगी

मुंबई : आजच्या धावपळीच्या जीवनात चुकीची जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींमुळे अनेकांना अकाली वृद्धत्वाची लक्षणे

राजस्थानमध्ये लिथियमचा साठा सापडला

नवी दिल्ली : राजस्थानमधील नागौर येथील देगाना प्रदेशात लिथियमचा मोठा साठा सापडला आहे. या खनिजाला पांढरे सोने

लंडनमध्ये महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना, भारतीय उच्चायोगाने घेतला तीव्र आक्षेप

लंडन: ब्रिटनची राजधानी लंडनमधील टाविस्टॉक स्क्वेअर येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात

मेलोनींच्या आत्मचरित्राला पंतप्रधान मोदींची प्रस्तावना

नवी दिल्ली : इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या ‘आय एम जॉर्जिया - माय रूट्स, माय प्रिन्सिपल्स’ या