Laxman Hake: लक्ष्मण हाकेंवर मराठा आंदोलकांकडून मारहाणीचा प्रयत्न! कुठे घडली घटना? वाचा नेमके काय घडले

  71

पुरंदर: ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांच्या विरोधात पुरंदर येथे मराठा आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. हाके नीरा येथून लोणंदच्या दिशेने जात असताना हा प्रकार घडला आहे. यारम्यान पोलिसांनी तातडीने धाव घेत परिस्थिती आटोक्यात आणली.

हाके निरा येथे चहासाठी थांबले असता अचानक काही लोकांकडून हाके यांच्या विरोधात घोषणाबाजी देण्यात आली. यानंतर हाके यांनी घोषणाबाजी करणाऱ्या मराठा आंदोलकांसमोरच रस्त्यावर बैठक मांडली. यादरम्यान परिस्थिती आणखीन चिघळते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. मात्र सोबत बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलिसांनी परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न करत घोषणाबाजी करणाऱ्या तरुणांना ताब्यात घेतलं.

नेमके काय घडले?


लक्ष्मण हाके हे निरा येथे आले असता एका हॉटेलमध्ये ते थांबले होते. याबाबतची माहिती काही तरुणांना मिळतातच हॉटेलच्या बाहेर येऊन तरुणांनी हाके यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर पोलिसांनी तातडीने धाव घेत या तरुणांना ताब्यात घेतलं. मनोज जरांगे यांच मुंबईमध्ये मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर मराठा तरुण संतप्त आहेत. राज्य सरकारकडून जरांगेच्या आंदोलनाची दखल घेतली जात नाही त्यातच लक्ष्मण हाके हे मराठा आंदोलकांच्या विरोधात बोलत आहेत. यातूनच हाके यांच्या विरोधात ही घोषणाबाजी करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, या घटनेवर मराठा आंदोलकांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही कोणत्याही पद्धतीचा हल्ला केला नसल्याचे मत मराठा आंदोलकांनी व्यक्त केले आहे. हाकेंवर हल्ला केल्याचं बोलत जात आहे, पण आम्ही हल्ला केला नाही. आम्ही फक्त त्यांना जाब विचारण्यासाठी गेलो होतो. आम्हाला आरक्षणाची गरज आहे. आमच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. मलाच नाहीतर प्रत्येक गरजवंत मराठ्याला आरक्षणाची गरज असल्याचे मराठा आंदोलक म्हणाले. आम्ही तिथे फक्त एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी केल्याची माहिती आंदोलकांनी दिली आहे.

 
Comments
Add Comment

गणेशोत्सवात पुण्यात तीन दिवस मद्यविक्री बंद! कोणत्या तारखांना बंदी?

जुन्नर: गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक आणि धार्मिक उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा पुणे शहर

पुरामुळे पिकं झाले उद्ध्वस्त, वृद्ध शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, हृदयद्रावक Video Viral

लातूर: महाराष्ट्रातील लातूरमध्ये मुसळधार पाऊस आणि पुरामुळे शेत पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. कापणीला आलेली

"सरकारला प्रश्न सोडवायचा आहे, मात्र..." मराठा आरक्षणाच्या प्रश्नाबाबत विखे पाटील यांनी केलं स्पष्ट

मुंबई: जरांगे पाटील यांच्या उपोषणावर मार्ग काढण्यासाठी तसेच त्यांनी दिलेल्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी

'गोकुळ'ने दूध खरेदी किंमत आणि छोट्या डेअरींसाठीच्या अनुदानात केली वाढ

कोल्हापूर: गोकुळ डेअरी किंवा गोकुळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेडने

हरिहर किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या पर्यटकाचा दरीत कोसळून मृत्यू

इगतपुरी: जिल्ह्यातील हरिहर येथे ट्रेकिंगसाठी आलेल्या भंडारा जिल्ह्यातील पर्यटकांचा परत उतरताना पडून मृत्यू

वाल्मिक कराडचा जामीन अर्ज फेटाळला

बीड (प्रतिनिधी): जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या वाल्मिक