मुंबईत पाच दिवसांच्या गणरायाला निरोप, ढोल ताशाच्या निनादात गणेश मूर्तींचे विसर्जन

  52

मुंबई: दिनांक २७ ऑगस्टपासून (Ganesh Chaturthi 2025) सुरू झालेल्या गणेशोत्सवाची धामधूम आणखीन काही दिवस राज्यभरात पाहायला मिळणार आहे. दरम्यान, मोठ्या उत्साहात घरोघरी विराजमान झालेल्या पाच दिवसाच्या गणपतीचे आज विसर्जन करण्यात आले.  'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या'च्या जयघोषाने आणि जड अंतःकरणाने मुंबईकरांनी बाप्पाला निरोप दिला. दरम्यान, मुंबईतील सर्व चौपाट्या, तलाव परिसरात विसर्जनासाठी भाविकांनी दुपारपासून गर्दी केली होती.


अनेक ठिकाणी ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाच्या मिरवणुका काढण्यात आल्या, तर फटाक्यांच्या आतषबाजीने आसमंत उजळून निघाला.  मुंबईच्या चौपाट्यांवर तसेच घरगुती बाप्पाच्या मूर्तीसाठी उभारण्यात आलेल्या कृत्रिम तलावात  रात्री उशिरापर्यंत विसर्जन सुरू राहिले.


यादरम्यान, गणेशभक्तांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा मुंबईच्या प्रमुख चौपाट्यांवर आणि तलावावर उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.  ज्यात विद्युत रोषणाई, निर्माल्य संकलनासाठी कुंड आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने बॅरिकेड्सची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.


ज्येष्ठा गौरी पूजन


आज घरगुती पाच दिवसाच्या गणपतीचे विसर्जन झाले, पण आज अनेकांच्या घरी गौराईचे आगमन झाले आहे, त्यानुसार उद्या अनेक ठिकाणी ज्येष्ठा गौरी आवाहन साजरा केला जाणार असून, तिसऱ्या दिवशी   म्हणजे मंगळवारी सात दिवसांच्या गणपतींसोबत विसर्जन केले जाईल. त्यामुळे अजून दोन दिवस मुंबईच्या चौपाट्यांवर भाविकांची गर्दी असणार आहे.

Comments
Add Comment

मोदी सरकारचा मध्यमवर्गीयांना दिलासा, अनेक दैनंदिन वापराच्या वस्तू झाल्या स्वस्त

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरुन केलेल्या भाषणात जीएसटीत बदल करुन

'मराठा आरक्षणाच्या जीआरविरोधात न्यायालयात जाणार'

मुंबई : जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाने जारी

बापरे, 'झोमॅटो'वरुन ऑर्डर करणे होणार एवढे महाग

मुंबई : ऑनलाइन फूड डिलिव्हरी क्षेत्रातील आघाडीची कंपनी झोमॅटोने प्लॅटफॉर्म शुल्कात दोन रुपयांची वाढ केली आहे.

लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराज वैश्विक मराठी भाषा केंद्र उभारणार

मुंबई : महाराष्ट्र सरकारने लंडनमधील महाराष्ट्र मंडळाची इमारत ५ कोटी रुपयांना लिलावात जिंकली असून, तेथे छत्रपती

'या' अल्पसंख्यांकांना पासपोर्टशिवाय भारतात राहण्याची मुभा

नवी दिल्ली : पाकिस्तान, अफगानिस्तान आणि बांगलादेश येथून भारतात आलेल्या हिंदू, शीख, ख्रिस्ती, बौद्ध, जैन आणि पारशी

मराठ्यांपाठोपाठ ओबीसींसाठीही उपसमितीची स्थापना

मुंबई : मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा शासन आदेश मंगळवारी जारी करण्यात आला.