अखेर ठरलं ! 'या' वेळी नवे जीएसटी दर लागू होणार? मध्यमवर्गीयांसाठी कुठल्या गोष्टी स्वस्त व महाग होणार जाणून घ्या...

प्रतिनिधी: ठरलं ! जीएसटी २.० या जीएसटी परिवर्तनाची अंमलबजावणी लवकरच होणार आहे. सुत्रांनी यासंबंधीची माहिती प्रसारमाध्यमांना दिली आहे. ३ ते ४ सप्टेंबरला जीएसटी काऊन्सिलची बैठक होणार आहे. यावर बैठकीत निर्णय होऊ शकतो. सुत्रांच्या माहितीनुसार, साधारणतः गणपती विसर्जनाच्या दरम्यानच्या काळातच ही दर रचना लागू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात नागरिकांसाठी 'डबल दिवाळी' घोषित करत मूलभूत जीएसटी प्रणालीत बदल करुन मोठ्या प्रमाणात जीएसटीत कपात करणार असल्याचे संकेत दिले होते. त्यानंतर मंत्रीमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाले होते. आता उर्वरित अंतिम मोहोर जीएसटी काऊन्सिल बैठकीत घेतले जाऊ शकतात. या निमित्ताने विरोधी पक्षांच्या राज्यांनीही जीएसटी प्रक्रियेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने त्या समस्यांवरही निराकरण होण्याची शक्यता आहे.


नक्की कुठल्या वस्तू स्वस्त व कुठल्या गोष्टी महाग होणार?


जीएसटी २.० अंतर्गत एफएमसीजी, औषधे,हॉस्पिटल, कार, इलेक्ट्रॉनिक्स गुड्स, व्हाईट गुड्स, हेल्थ, लाईफ इन्शुरन्स, लक्झरी गुड्स या वस्तूंच्या किमतीत बदल अपेक्षित आहेत.


१) एफएमसीजी - दैनंदिन जीवनात लागत असलेल्या नूडल्स, इतर खाण्याच्या वस्तू, आयुवैदिक औषधे, पाकीटबंद वस्तू स्वस्त होण्याची शक्यता आहे. १२% वरून ५% जीएसटी स्लॅबमध्ये या वस्तू अंतर्भूत होतील ज्यामध्ये सामान्य माणसाच्या खिशाची मोठ्या प्रमाणात बचत अपेक्षित आहे.


२) औषधे - आवश्यक औषधे, बेवरेज (Non Alcoholic), काही डेअरी उत्पादन स्वस्त होणार आहेत. या देखील वस्तूत १२% वरून स्लॅब ५% वर येणार असल्याने मोठ्या प्रमाणात या वस्तू स्वस्त होण्याची शक्यता आहे.


३) कार - छोट्या चारचाकी (१२०० सीसी इंजिनपेक्षा लहान असलेली चारचाकी), ५०० सीसी पर्यंत असलेली दुचाकी यामध्ये थेट २८%वरून १८% कर लागू होणार आहे त्यामुळे या वस्तूही स्वस्त होतील.


४) इलेक्ट्रॉनिक्स गुड्स - इलेक्ट्रॉनिक्स वस्तूही स्वस्त होणार असून या वस्तूंच्या जीएसटीत मात्र बदल अपेक्षित नाही. या वस्तू १८% स्लॅबमध्ये अपरावर्तित (Unchanged) राहतील. त्यामुळे मध्यमवर्गीयांना यामध्ये दिलासा मिळणार नाही.


५) व्हाईट गुड्स - एसी, रेफ्रिजरेटर, इतर उत्पादने स्वस्त होऊ शकतात. २८% वरून १८% वर व्हाईट गुड्सवर कर कपात होणार आहे. त्यामुळे या उत्पादनांच्या किंमतीत घसरण होऊ शकते.


६) हेल्थकेअर - आयुर्विमा (Life Insurance), आरोग्य विमा (Health Insurance) प्रिमियममध्ये कपात होण्याची शक्यता आहे. अजून यामध्ये निश्चित निर्णय झालेला नाही. असे झाल्यास आवश्यक असलेल्या विमा खरेदीसाठी ग्राहकांना चालना मिळू शकते.


७) लक्झरी गुड्स - लक्झरी गुड्स मध्ये मात्र सवलत मिळणार नाही. त्यामुळे विलासी गोष्टींवर ४०% जीएसटी कर लागू होऊ शकतो. महागड्या गाड्या, अल्कोहोल, सॉफ्ट ड्रिंक्स, फास्ट फूड, तंबाखू, मद्य या उत्पादनावर ४०% कर लावण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे आहे.


सध्या ६५% जीएसटी महसूल १८% कर स्लॅब्स असलेल्या वस्तूतून येतो. त्या गोष्टी १८% वरून ५% कर स्लॅबमध्ये जाऊ शकतात. आवश्यक त्या गोष्टी ५% प्रवर्गात येणे अपेक्षित असून लक्झरी वस्तू मात्र ४०% वर जाऊ शकतात. इतर काही वस्तू १८% जीएसटी क र प्रवर्गात राहू शकतात. प्रस्तावित कर रचनेत केवळ ५%,१८% या दोन स्लॅब्सची विभागणी केली आहे. त्याशिवाय लक्झरी वस्तूवर ४०% पर्यंत कर लागू शकतो.

Comments
Add Comment

Khopoli News : मुलाला शाळेत सोडलं अन्...; नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीवर दिवसाढवळ्या सपासप वार

खोपोली : रायगड जिल्ह्यातील प्रमुख औद्योगिक केंद्र असलेल्या खोपोली शहरात आज सकाळच्या सुमारास रक्ताचा थरार

Stock Market Opening Bell: ख्रिसमोत्तर सत्रात बाजारात घसरण सेन्सेक्स १८३.६६ व निफ्टी ४७.७० अंकाने घसरला

मोहित सोमण: सकाळच्या सत्रात इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात घसरण झाली आहे. प्रामुख्याने शेअर बाजारात नवा ट्रिगर

Rohit Sharma-Virat Kohli Vijay Hazare Trophy 2025-26 : रोहित-विराटचा पहिल्या सामन्यात शतकी धमाका! दुसऱ्या फेरीत कोणाशी भिडणार? जाणून घ्या वेळ, मैदान आणि लाइव्ह अपडेट्सची ए टू झेड माहिती

भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये सध्या 'विराट-रोहित' नावाच्या वादळाने चाहत्यांना भुरळ घातली असून, विजय हजारे

मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीत तिरंगी लढतीची शक्यता

मविआ घटक पक्षांना जास्त जागांची अपेक्षा भाईंदर : मीरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेना यांची

प्रकाश आंबेडकरांच्या तंबीनंतर काँग्रेस ताळ्यावर !

मुंबई : मी ज्या दिवशी तोंड उघडेन, त्यादिवशी काँग्रेसला महाराष्ट्रात नव्हे, तर देशभरात फटका बसेल, अशी तंबी प्रकाश

भाजप मुंबईत ३० टक्के नवे चेहरे देणार ?

मुख्यमंत्र्यांच्या अंतिम मंजुरीनंतर ‘एबी’ फॉर्मचे वाटप होणार मुंबई : राजकारणात प्रयोगशील पक्ष अशी ओळख असलेली