गृहनिर्माण क्षेत्रासाठी सणासुदीचा काळ ठरतोय वरदान

चौथ्या तिमाहीत घरांच्या मागणीचा वाटा वार्षिक विक्रीत किमान ३०% असण्याची अपेक्षा 


मुंबई: गणेशोत्सवापासून दिवाळीपर्यंतचा सणासुदीचा कालावधी भारतातील गृहनिर्माण बाजारातील मागणीस नेहमीच चालना देतो आणि वार्षिक विक्रीत जवळपास एकतृतीयांश वाटा उचलतो. २०२५ ची पहिली सहामाही तुलनेने स्थिर राहिली असली, तरी सणा सुदीच्या हंगामात बाजारपेठेत नव्या उत्साहाची लाट आहे. विकासक एकापाठोपाठ महत्त्वाचे प्रकल्प लॉन्च करत असून आकर्षक ऑफर्स सादर करत आहेत, तर खरेदीदारही आपल्या निर्णयाला पुढे नेण्यासाठी उत्सुक आहेत. मध्यम व प्रीमियम सेगमेंटमधील सा तत्यपूर्ण मागणी, ग्राहकांच्या आत्मविश्वासात झालेली लक्षणीय वाढ आणि जीवनशैलीवर आधारित निवास प्रकल्पांकडे वाढलेले आकर्षण अशा सकारात्मक घटकांचा संगम हे सणासुदीचा मोसम वरदान ठरण्याचे प्रमुख कारण आहे. २०२५ च्या चौथ्या तिमाहीत के वळ मोसमी पुनरुज्जीवन होणार नाही, तर या काळात निर्माण झालेली गती २०२६ पर्यंत गृहनिर्माण क्षेत्राच्या वाढीस चालना देईल, असा विश्वास आरईए इंडियाचे (हाऊसिंग डॉटकॉम) मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण शर्मा यांनी व्यक्त केला. भारतातील गृहनिर्मा ण बाजाराने २०२५ च्या पहिल्या सहामाहीत तुलनेने मंदी अनुभवली. सलग दोन वर्षांच्या दमदार वृद्धीनंतरचा हा दुरुस्तीचा टप्पा होता. मात्र, ऐतिहासिक प्रवाह दर्शवितो की सप्टेंबर ते डिसेंबरमधील सणासुदीची तिमाही मागणीत नेहमीच सुधारणा घडवते आणि यं दाही तोच कल कायम राहील, अशी अपेक्षा आहे.


हाऊसिंग डॉटकॉम आउटलुकनुसार गेल्या पाच वर्षांच्या आकडेवारीनुसार सप्टेंबर ते डिसेंबर हा कालावधी घरांच्या विक्रीसाठी सर्वाधिक मजबूत ठरला आहे. या काळात विकासक नवीन प्रकल्प लॉन्च करून आकर्षक ऑफर्स आणि मार्केटिंग मोहिमा राबवतात, तर खरेदीदार मोठ्या खरेदीची योजना आखतात. त्यामुळेच चौथी तिमाही वार्षिक कामगिरीच्या दृष्टीने निर्णायक मानली जाते.गेल्या पाच वर्षांत (२०२०-२४) चौथ्या तिमाहीतील विक्रीने वार्षिक एकूण विक्रीत २५ ते ३० टक्के वाटा उचलला असून, ती प्रत्येक वर्षातील सर्वात दमदार तिमाही ठरली आहे. अगदी आव्हानात्मक काळातही (उदा. २०२० – कोव्हिडनंतरचा कालावधी) चौथ्या तिमाहीत तिसऱ्या तिमाहीच्या तुलनेत ३२ % वाढ नोंदली गेली असून, हीच सणासुदीच्या मोसमाची खरी ताकद मानली जाते. बहुतांश वर्षांत स णासुदीच्या मोसमातून मिळालेल्या चालनेमुळे तिसऱ्या तिमाहीच्या तुलनेत चौथ्या तिमाहीत १० ते १५ टक्के अधिक व्यवहार नोंदले जातात.


मागील पाच वर्षांच्या आकडेवारीवरून, २०२५ च्या चौथ्या तिमाहीत घरांच्या मागणीचा वाटा वार्षिक विक्रीत किमान ३०% असेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात असून, त्यामुळे ही तिमाही पुन्हा एकदा सर्वाधिक दमदार ठरणार आहे. २०२५ ची पहिली सहामाही सं थ राहिली असली तरी चौथ्या तिमाहीत विकासक नवीन प्रकल्प लॉन्च आणि आकर्षक योजना सादर करून बाजारपेठेला नव्या गतीची अपेक्षित चालना देतील.

Comments
Add Comment

तालिबानसोबतच्या भीषण संघर्षात १२ पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू, अफगाण सैन्याने सीमेवरील अनेक चौक्यांवर केला कब्जा

कराची :अफगाणिस्तान आणि पाकिस्तान सीमेवर तालिबान आणि पाकिस्तानी सैनिकांमध्ये भीषण संघर्ष झाला आहे. ताज्या

मुंबई महापालिका प्रभाग आरक्षण सोडत चक्राकार पद्धतीनेच

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक २०२५ निवडणुकीकरता प्रभाग आरक्षण कार्य प्रणाली कशी

मुंबईत 'मेगा ब्लॉक'मुळे होणार 'या' मार्गांवरील प्रवाशांचे हाल!

मध्य आणि पश्चिम रेल्वेवर देखभाल दुरुस्तीचे काम; अनेक गाड्या रद्द, वळवण्यात आल्या किंवा अर्ध्यातच स्थगित मुंबई:

बिहारसाठी ‘एनडीए’चे जागावाटप

विधानसभेच्या २४३ जागांमध्ये १०१ जेडीयू , १०० भाजप , २९ लोजप (आर), ७ हिंदुस्तानी अवामी मोर्चा आणि ६ राष्ट्रीय लोक

फटाक्यांच्या मुद्द्यावर केंद्र सरकार ॲक्शन मोडमध्ये

नवी दिल्ली : २० ऑक्टोबर रोजी भारत आणि जगभरात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर

पंतप्रधान धन धान्य कृषी योजनेमुळे शेतकऱ्यांना विशेष फायदा

मंत्री नितेश राणे यांनी दिली माहिती मुंबई : पंतप्रधान धन धान्य कृषी योजना, राष्ट्रीय डाळी अभियान तसेच कृषी