Asia Cup 2025 च्या सामन्यांच्या वेळेत बदल! भारत-पाकिस्तान सामना आता कधी सुरू होणार?

नवी दिल्ली: आगामी आशिया कप २०२५ सुरू होण्याआधीच क्रिकेटप्रेमींसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. या स्पर्धेतील काही सामन्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. आता भारत आणि पाकिस्तानसह इतर संघांचे सामने नियोजित वेळेपेक्षा अर्धा तास उशिरा सुरू होणार आहेत.



हे आहे नवीन वेळापत्रक


आशिया कप २०२५ चे सर्व सामने भारतीय वेळेनुसार (IST) संध्याकाळी ७:३० वाजता सुरू होणार होते. परंतु, आता स्पर्धेतील १९ पैकी १८ सामने स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी ६:३० वाजता सुरू होतील, ज्याचा अर्थ भारतीय वेळेनुसार रात्री ८:०० वाजता हे सामने सुरू होतील.



भारत-पाकिस्तान महामुकाबला


भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय-व्होल्टेज मुकाबला १४ सप्टेंबर रोजी दुबईमध्ये होणार आहे. नवीन नियमांनुसार, हा सामना आता रात्री ७:३० ऐवजी रात्री ८:०० वाजता सुरू होईल. याशिवाय, टीम इंडिया आपला पहिला सामना १० सप्टेंबर रोजी यूएईविरुद्ध खेळेल आणि तो देखील रात्री ८:०० वाजता सुरू होईल.



बदलाचे कारण


स्थानिक वेळेनुसार उन्हाळ्यातील वातावरण आणि खेळाडूंच्या सोयीसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.


आशिया कप २०२५:


स्पर्धेचा कालावधी: ९ ते २८ सप्टेंबर २०२५


स्थळ: दुबई आणि अबू धाबी, यूएई


फॉरमॅट: टी-२०


एकूण संघ: ८ (भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान, यूएई, ओमान, हाँगकाँग)




भारताचे सामने (ग्रुप स्टेज):


१० सप्टेंबर: भारत विरुद्ध यूएई (दुबई)


१४ सप्टेंबर: भारत विरुद्ध पाकिस्तान (दुबई)


१९ सप्टेंबर: भारत विरुद्ध ओमान (अबू धाबी)

Comments
Add Comment

FIFA world Cup 2026 : फिफा वर्ल्ड कप २०२६ च्या राऊंड ऑफ १६ चे वेळापत्रक जाहीर! जाणून घ्या मेस्सी-रोनाल्डो कधी उतरणार मैदानात?

अमेरिका: फिफा विश्वचषक २०२६ आता आपल्या अत्यंत रोमांचक टप्प्यावर पोहोचला आहे. काल पार पडलेल्या 'राऊंड ऑफ ३२'च्या

Vladimir Kramnik :बुद्धिबळाच्या बादशहाला फिडेचा झटका! व्लादिमीर क्रॅम्निकवर दोन वर्षांची बंदी; सोशल मीडियावरील आरोप पडले महागात

नवी दिल्ली : जागतिक बुद्धिबळ महासंघाच्या (फिडे) नीती आणि शिस्तपालन आयोगाने (ईडीसी) माजी विश्वविजेता व्लादिमीर

Wimbledon 2026 : नोव्हाक जोकोविकने केली रॉजर फेडररच्याविक्रमाची बरोबरी; रिंडकरनेचला हरवत केले चौथ्या फेरीत प्रवेश

लंडन: विम्बल्डनमध्ये सर्बियाचा दिग्गज टेनिसपटू नोव्हाक जोकोविच आणि गतविजेता यानिक सिनर यांनी प्रभावी कामगिरी

Vaibhav Sooryvanshi : वैभवची इन्स्टा पोस्ट व्हायरल! दुसऱ्या सामन्यात पदर्पण होणार ? चर्चांना उधाण

Manchester : भारत आणि इंग्लंड मधील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना आज (जुलै) रोजी मॅंचेस्टर येथे खेळला जाणार

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडच्या सामन्यावर पावसाचे संकट! पावसामुळे सामना रद्द होणार?

मँचेस्टर : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना आज (४ जुलै) मँचेस्टरमध्ये

FIFA WORLDCUP 2026 : मेस्सीला कडवी झुंज देत केप व्हर्डेचा विश्वचषक प्रवास संपला; वोझिन्हाच्या कामगिरीने जग जिंकले