आशिया कप २०२५ पूर्वी बीसीसीआयमध्ये मोठे बदल, राजीव शुक्ला बनले हंगामी अध्यक्ष

मुंबई : एशिया कप 2025 मध्ये भारताचा पहिला सामना 10 सप्टेंबर रोजी यूएई विरुद्ध होणार आहे,त्याला सुरू होण्यास आता दोन आठवड्यांपेक्षा कमी वेळ उरला आहे. याच दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजीव शुक्ला यांना बीसीसीआयचा कार्यवाहक अध्यक्ष नेमण्यात आलं आहे. रॉजर बिन्नी लवकरच अधिकृतपणे आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात.


२७ ऑगस्ट रोजी राजीव शुक्ला यांच्या नेतृत्वाखाली बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांची एक बैठक झाली होती. या बैठकीत भारतीय संघाच्या टायटल स्पॉन्सरशी असलेल्या ड्रीम11 च्या कराराच्या समाप्तीवर आणि नवीन करार शोधण्यावर चर्चा झाली. सांगायचं झालं तर, २०२२ मध्ये सौरव गांगुली अध्यक्ष पदावरून हटल्यानंतर रॉजर बिन्नी यांनी अध्यक्षपद स्वीकारले होते. आता ते ७० वर्षांहून अधिक वयाचे झाले असल्याने ते लवकरच आपला राजीनामा जाहीर करू शकतात.


राजीव शुक्ला यांचा जन्म १३ सप्टेंबर १९५९ रोजी झाला होता. सध्या त्यांचे वय ६६ वर्षे आहे. ते आधी पत्रकार होते, त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि नंतर भारतीय क्रिकेटमध्ये एक खास स्थान निर्माण केलं. २०१५ मध्ये त्यांची आयपीएलचे चेअरमन म्हणून नियुक्ती झाली. १८ डिसेंबर २०२० रोजी त्यांना बीसीसीआयचे उपाध्यक्ष बनवण्यात आलं. सध्या ते छत्तीसगडमधील राज्यसभा खासदारांपैकी एक आहेत.


नियमांनुसार, कोणत्याही बीसीसीआय पदाधिकाऱ्याचे कमाल वय ७० वर्षे आहे. रॉजर बिन्नी यांचा जन्म १९ जुलै १९५५ रोजी झाला असून, ते आता ७० वर्षांचे झाले आहेत. त्यामुळे ते अध्यक्षपदावर राहण्यास अयोग्य ठरतात. नवीन अध्यक्ष निवड होईपर्यंत राजीव शुक्ला हे कार्यवाहक अध्यक्ष म्हणून काम पाहतील. बीसीसीआय सध्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर लोढा समितीच्या शिफारसींवर आधारित संविधानानुसार चालते.


रॉजर बिन्नी हे १९८३ च्या वर्ल्ड कप विजेता संघाचे सदस्य होते. त्यांनी भारतासाठी २७ कसोटी आणि ७२ एकदिवसीय सामने खेळले असून, अनुक्रमे ४७ आणि ७७ विकेट्स घेतल्या आहेत.बीसीसीआय सध्या भारतीय क्रिकेट संघासाठी नवीन टायटल स्पॉन्सर शोधत आहे. कारण ऑनलाइन गेमिंगसंबंधी नवीन कायदा आल्यामुळे ड्रीम11 सोबतचा करार नियोजित कालावधीपूर्वीच संपुष्टात आला आहे. एशिया कप ९ सप्टेंबरपासून सुरू होत आहे, आणि त्याआधी नवीन टायटल स्पॉन्सर मिळवणं आव्हानात्मक वाटतंय. बीसीसीआय काही दिवसांत नवीन प्रायोजकासाठी जाहिरात जारी करू शकतो.


Comments
Add Comment

श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात न्यूझीलंडचा विजय

कोलंबो : आर. प्रेमदासा स्टेडियम येथे आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमधील सुपर ८ फेरीतल्या श्रीलंका विरुद्ध

न्यूझीलंडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेची निराशाजनक सुरुवात

कोलंबो : आर. प्रेमदासा स्टेडियम येथे आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमधील सुपर ८ फेरीतला श्रीलंका विरुद्ध

...तरच भारत सेमी फायनल खेळू शकेल

मुंबई : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये सुपर ८ फेरीचे सामने सुरू आहेत. ग्रुप एक मध्ये वेस्ट इंडिज (धावगती

फिटनेस स्टार मयांक पवार याचे ३७ व्या वर्षी आकस्मिक निधन

मुंबई : रिअ‍ॅलिटी शोच्या दुनियेतून प्रसिद्धी मिळवलेले आणि फिटनेस क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण करणारे

ICC Women's T20 World Cup : आयसीसी महिला टी२० विश्वचषकाचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या भारताचा सामना कधी ?

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आयसीसी महिला टी२० विश्वचषक २०२६ चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले. ही

विंडीजचा झिम्बाब्वे विरुद्ध मोठा विजय

मुंबई : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर ८ फेरीत वेस्ट इंडिज विरुद्ध झिम्बाब्वे हा सामना