विरार इमारत दुर्घटना, मृतांचा आकडा १५ वर

वसई: वसई तालुक्याच्या विरार येथील नारंगी रोडवरील रमाबाई अपार्टमेंट इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा १२ वर पोहोचला आहे. बुधवारी सकाळी ही इमारत कोसळून मोठी दुर्घटना झाली होती. यात आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाला आहे.


अडकलेल्या लोकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी, वसई विरार महानगर पालिका अग्निशामक दल आणि एनडीआरएफचे दोन टीम सकाळपासून काम करत होते. या संदर्भात मिळालेल्या महितीनुसार, आज (२७ ऑगस्ट) संध्याकाळी ६ वाजेपर्यंत १४ जणांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले. त्यापैकी ७ जणांचा मृत्यू झाला असून त्यामधील ३ जणांची ओळख पटली आहे,


या दुर्घटनेला २० तास उलटून गेले आहेत. इमारत कोसळल्याची दुर्घटनेची माहिती मिळताच या इमारतीतील रहिवाशांच्या नातेवाईकांनी तातडीने येथे धाव घेतली होती. अनेकांवर तर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.



मृतांची नावे


लक्ष्मण सिंग (२६ वर्ष), आरोही ओंकार जोवील (२४ वर्षे), उत्कर्षा जोवील (१ वर्षे), दिनेश सकपाळ (४३ वर्ष), सुप्रिया निवळकर (३८ वर्ष), अर्णव निवळकर (११ वर्ष), सचिन निवळकर(४० वर्षे), सोनाली तेजाम(४१ वर्षे), दीपक सिंग बोहरा(२५ वर्षे), कशिश पव सहेनी(३५ वर्षे), शुभांगी पवन सहेनी(४० वर्षे), गोविंद सिंग रावत(२८ वर्षे), पार्वती सकपाळ(६० वर्षे)



जखमींची नावे


जखमींमध्ये प्रभावकर (५७), प्रमिला प्रभाकर शिंदे (५०), प्रेरणा शिंदे (२०), प्रदीप कदम (४०), जयश्री कदम (३३), मिताली परमार (२८), संजय स्वपंत सिंग (२४), मंथन शिंदे (१९), विशाखा जोवील (२४)



बेकायदेशीर बांधकामांवर प्रश्नचिन्ह


या दुर्घटनेने वसई-विरार परिसरातील बेकायदेशीर बांधकामांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गेल्या काही दिवसांपासून या शहरांमधील अनेक अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू आहे.


या पार्श्वभूमीवर, "रमाबाई अपार्टमेंट" सारख्या धोकादायक इमारतींमध्ये लोक का राहत होते आणि प्रशासनाने वेळोवेळी नोटीस देऊनही यावर कारवाई का केली नाही, असे गंभीर प्रश्न आता उपस्थित होत आहेत. ही दुर्घटना केवळ नैसर्गिक आपत्ती नसून, मानवनिर्मित चुका आणि प्रशासकीय दुर्लक्षामुळे घडलेली असल्याचे आरोप होत आहेत. प्रशासनाकडून या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.


सध्या बचावकार्य सुरू असून, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी श्वानपथकाचीही मदत घेतली जात आहे. जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

Comments
Add Comment

जळगावकर म्हणतायत.. तुमची आमची भाजपा सर्वांची! भाजपचा हा नेता ठरला धुरंधर

जळगाव : जळगाव महापालिका निवडणुकीत भाजपने अभूतपूर्व यश मिळवत शहराच्या राजकारणात शतप्रतिशत विजय मिळवला आहे.

Solapur election result : सोलापुरात काँग्रेसचा सुफडा साफ; खासदार प्रणिती शिंदेंच्या प्रभागात भाजपचा दणदणीत विजय

सोलापूर : सोलापूर महानगरपालिका निवडणूक निकालात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या खासदार प्रणिती

निवडणुकीच्या धामधुमीत जळगावात गोळीबार!

निवडणुकीशी संबंध नसल्याचे पोलिसांचे स्पष्टीकरण जळगाव : जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरात असलेल्या आनंद मंगल

जालन्यात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला

जालना : जालना शहरात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक

मतदानानंतर सुबोध भावेंची स्पष्ट भूमिका अन् पुण्यात रंगली 'ती' एकच चर्चा

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता

Latur : महिन्याभरापूर्वी निवडणूक जिंकली आणि उपचारांअभावी गेली

लातूर : लातूर जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. अहमदपूर शहरातून ही घटना समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या