भगूर : नाशिक जवळील शिंगवे बहुला गावातील घरावर लष्कराचे पॅराशुट ( ग्लायडर ) कोसळले. सुदैवाने यात कुठलीही जीवित हानी झाली नसून लष्कर जवानास दुखापत झाली आहे. त्यास पुढील उपचारासाठी ताबडतोब देवळाली कॅम्प येथील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. शिगवे बहुला येथील ज्या घराचे नुकसान झाले आहे. लष्कराच्या नाईस राईट्स युनिटच्या वतीने लष्करी जवान पॅरा शुट (ग्लायडर) प्रशिक्षण घेत असतात नेहमी प्रमाणे गुरुवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास प्रशिक्षण घेत असताना पॅराशुटमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने पॅराशुट सह जवान शिंगवे बहुला गावातील राहणाऱ्या कौसाबाई चव्हाण यांच्या घरावर कोसळले. त्वरित लष्करी जवान अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि जवानास उपचारासाठी मिलीटरी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, इतर कुठलीही जीवीत हानी झाली नाही. कौसबाई चव्हाण यांच्या घराचे जे नुकसान झाले आहे, ते लष्करी अधिकाऱ्यांनी त्यांचा खर्च भरुन दिला. देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनचे पोलीस ही घटनास्थळी दाखल झाले होते.