जागतिक सोन्यात घसरण भारतीय सोन्यात वाढ ! 'या' कारणांमुळे बाप्पाच्या दुसऱ्या दिवशीच सोने महाग

मोहित सोमण: आज भारतात सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. युएस राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकारी अध्यादेशाचे पालन आजपासून होणार असल्याने युएसमध्ये भारताकडून आयात केलेल्या वस्तूंवर आता ५०% टॅरिफ शुल्क निश्चित करण्यात आले आहे. तसेच इतर देशांवरील शुक्लवाढीवर ट्रम्प यांचा आदेश लागू झाल्यानंतर आज जागतिक सोन्याच्या बाजारात दबाव वाढला होता. तसेच आगामी युएसमधील महागाई आकडेवारीची गुंतवणूकदार वाट पाहत असल्याने आज जागतिक सोन्यात घसरण झाली असे असले तरी भारतीय बाजारपेठेत मात्र सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. सकाळपर्यंत डॉलरच्या तुलनेत रुपया घसरला होता. तसेच भारतीय बाजारातील दबावासह सोन्याची मागणीही वाढल्याने दरवाढ झाली आहे. मात्र ओपन मार्केट ऑपरेशनने आरबीआ यकडून डॉलरची खरेदी वाढल्याने रूपया दुपारपर्यंत रिकव्हर झाला होता. त्यामुळे सोन्याची भारतीय सराफा बाजारातील वाढ मर्यादित राहिली.


'गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार,२४ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात १६ रूपये, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात १५ रूपये, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात १२ रूपये वाढ झाली आहे. त्यामुळे प्रति ग्रॅम दर २४ कॅरेटसाठी १०२६० रूपयांवर, २२ कॅरेटसाठी ९४०५ रूपयांवर, १८ कॅरेट सोन्यासाठी ७६९५ रूपयांवर गेले आहेत. संकेतस्थळावरील माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत १६० रूपयांनी, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत १५० रूपयांनी, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत १२० रूपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे प्रति तोळा दर २४ कॅरेटसाठी १०२६०० रूपये, २२ कॅरेटसाठी ९४०५० रूपये, १८ कॅरेटसाठी ७६९५० रुपयांवर पोहोचले आहेत. मुंबईसह भारतातील प्रमुख शहरातील सोन्याचे सरासरी प्रति ग्रॅम दर २४ कॅरेट सा ठी १०२६० रूपये, २२ कॅरेटसाठी ९४०५, १८ कॅरेटसाठी ७६९५ रूपयांवर पोहोचले आहेत.


जागतिक पातळीवरील गोल्ड फ्युचर निर्देशांकात संध्याकाळपर्यंत ०.१४% वाढ झाली आहे. जागतिक मानक (Standard) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या युएस गोल्ड स्पॉट दरात संध्याकाळपर्यंत ०.०२% घसरण झाली आहे. भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीए क्समध्ये (Multi Commodity Exchange MCX) मध्ये संध्याकाळपर्यंत सोन्याच्या निर्देशांकात ०.१३% वाढ झाल्याने एमसीएक्सवरील दरपातळी १०१६६९.०० रूपयांवर पोहोचले आहेत.

Comments
Add Comment

IND vs PAK: भारताने पाकिस्तानला पुन्हा लोळवले, आशिया कपमध्ये दुसऱ्यांदा केला पराभव

दुबई: आशिया कप २०२५च्या सुपर ४मध्ये भारताने पाकिस्तानवर जबरदस्त विजय मिळवला आहे. पाकिस्तानने पहिल्यांदा

पूनम पांडे होणार मंदोदरी, दिल्लीत रामलीला सुरू होण्याआधी भडकलं महाभारत

नवी दिल्ली : देशात ठिकठिकाणी रामलीला कार्यक्रम सोमवार २२ सप्टेंबरच्या संध्याकाळपासून सुरू होत आहे. पण हा

नवरात्रोत्सवासाठी मुंबादेवी मंदिर सज्ज

मुंबई : मुंबईचे नाव ज्या मुंबादेवीमुळे पडले, त्या मुंबादेवी मातेचे दर्शन घेण्यासाठी मुंबईसह इतर राज्यांतूनही

अकरावी प्रवेशाची शेवटची संधी

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पण राज्यातील अकरावीची अर्थात FYJC ची

'घटस्थापनेच्या दिवसापासून सुरू होणार GST उत्सव'

नवी दिल्ली : घटस्थापनेच्या दिवसापासून अर्थात सोमवार २२ सप्टेंबर २०२५ पासून देशात GST उत्सव सुरू होत आहे. यामुळे

घटस्थापनेच्या दिवशी पंतप्रधान मोदी अरुणाचल प्रदेशचा दौरा करणार

नवी दिल्ली : घटस्थापनेच्या दिवशी अर्थात सोमवारी २२ सप्टेंबर २०२५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी अरुणाचल प्रदेश