MLA Crime news : आमदारपुत्राच्या बंगल्यातून २० वर्षीय तरुणीचा झाडाला लटकलेला मृतदेह; हत्या की आत्महत्या?

मध्य प्रदेश : मध्य प्रदेशातील टीकमगढ जिल्ह्यातील खरगापूर विधानसभा मतदारसंघाच्या काँग्रेस आमदार चंदा सिंह गौर (Chanda Singh Gaur) यांच्या कुटुंबाशी संबंधित धक्कादायक घटना घडली आहे. आमदार गौर यांचा मुलगा अभियंत सिंह गौर यांच्या छतरपूर येथील बंगल्यात एका २० वर्षीय तरुणीचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला. या तरुणीवर घरकामाची जबाबदारी होती. मात्र, ती मृत अवस्थेत आढळल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. सध्या पोलिसांकडून या मृत्यूचं नेमकं कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे. आत्महत्या की हत्या, याबाबत स्पष्ट निष्कर्ष अद्याप समोर आलेला नाही. पोस्टमार्टम अहवाल आल्यानंतर या प्रकरणावर अधिक प्रकाश पडण्याची शक्यता आहे.



तरुणीच्या मृत्यूची माहिती दाबण्याचा प्रयत्न?


छतरपूर येथील काँग्रेस आमदार चंदा सिंह गौर यांच्या मुलगा अभियंत सिंह गौर यांच्या बंगल्यात मृत अवस्थेत सापडलेल्या तरुणीची ओळख पटली आहे. मृत तरुणीचं नाव सपना रैकवार (वय २०) असं असून, तिच्या मृत्यूभोवती आता नवीन वाद निर्माण झाला आहे. ही घटना सोमवारी (२५ ऑगस्ट) सकाळी उघडकीस आली होती. मात्र, या प्रकरणाबद्दलची माहिती जाणीवपूर्वक दडपण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. घटनेनंतर पोलिसांनी तातडीने सपनाचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आणि प्रक्रिया पूर्ण होताच तिच्या कुटुंबीयांकडे सोपवला. विशेष म्हणजे, सुरुवातीला या घटनेची माहिती बाहेर आली नाही. पण, बंगल्यात काम करणाऱ्या इतर महिलांमध्ये झालेल्या चर्चेतून आणि त्यांनी एकमेकींना सांगितल्यानंतरच सपनाच्या मृत्यूचे प्रकरण बाहेर आले. यामुळे या घटनेच्या पार्श्वभूमीवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.



काय म्हणाले अभियंत सिंह गौर?


छतरपूरमधील बंगल्यात २० वर्षीय तरुणीचा मृतदेह सापडल्यानंतर वाद निर्माण झाला असताना, काँग्रेस आमदार चंदा सिंह गौर यांचे पुत्र अभियंत सिंह गौर यांनी या प्रकरणावर भूमिका स्पष्ट केली आहे. घटनेच्या वेळी आपण उपस्थित नसल्याचं सांगत गौर म्हणाले, “ही घटना घडली त्यावेळी मी दिल्लीमध्ये होतो. घरी केवळ माझी पत्नी आणि १७ वर्षांचा मुलगा होता. त्यांनीच मला फोन करून याबाबतची माहिती दिली. त्यानंतर मी दुसऱ्या दिवशी घरी पोहोचलो,” असं गौर यांनी सांगितलं. त्यांच्या या विधानानंतर घटनेचा तपास नवा वळण घेऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त होत आहे.



“सपना मुलीसारखीच होती, तिच्या लग्नाची तयारी सुरू होती”


“सपनाने असं टोकाचं पाऊल का उचललं, याची मला अजिबात कल्पना नाही. ती मोबाईल वापरत नव्हती आणि कधीही चिंतेत असल्याचं आम्हाला जाणवलं नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, ती माझी नोकर नव्हती, तर आम्हा कुटुंबासाठी मुलीसारखीच होती. वयाच्या पाचव्या वर्षापासून ती आमच्यासोबत राहत होती. तिच्या आयुष्याचा विचार करून आम्ही तिच्या लग्नासाठी योग्य स्थळ शोधण्याचं कामही सुरू केलं होतं,” असं गौर यांनी सांगितलं. गौर यांच्या या वक्तव्यामुळे प्रकरणाला नवा भावनिक पैलू लाभला असून, सपनाचा मृत्यू हा आत्महत्या की काहीतरी वेगळं याबाबतचा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे.



पोलिसांचा तपास सुरू; सीसीटीव्ही फुटेज जप्त


घटनेनंतर पोलिसांनी सर्वप्रथम बंगल्याच्या परिसरात लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. यावेळी संपूर्ण नोंदी असलेला डीव्हीआर पोलिसांनी जप्त केला आहे.
दरम्यान, सपनाच्या मृत्यूनंतर तिची आई घटनास्थळी आली होती. मात्र, त्यांनी पोलिसांकडे कोणतीही औपचारिक तक्रार नोंदवलेली नाही. त्यामुळे प्रकरण अधिक गुंतागुंतीचे बनले आहे. प्रथमदर्शनी पाहता ही आत्महत्या असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. तरीदेखील, संशयास्पद परिस्थिती आणि मृतदेहावरील खुणा लक्षात घेता पोलिस सर्व शक्य त्या बाजूंनी तपास करत आहेत. पोस्टमार्टम अहवाल आल्यानंतर या प्रकरणातील अनेक गोष्टी स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

रोखीपेक्षा डिजिटलला पसंती

एका वर्षात २,३६० एटीएमना टाळे एटीएम बंद करण्यात खासगी बँका आघाडीवर नवी दिल्ली : डिजिटल पेमेंटच्या वाढत्या

सीमा सुरक्षा दल राबवणार 'ऑपरेशन सर्द हवा', घुसखोरांना दिसताक्षणी ठार करणार

श्रीनगर : सीमा सुरक्षा दल (Border Security Force / BSF) सीमेवर जम्मू काश्मीरमध्ये 'ऑपरेशन सर्द हवा' आणि राजस्थानमध्ये 'ऑपरेशन कोल्ड

आता शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी

दिल्लीमधील सरकारने दिले आदेश नवी दिल्ली : भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवामुळे देशातील अनेक शहरांमधील लोक त्रस्त

काश्मिर खोरं गोठलं! तापमानात विक्रमी घसरण

श्रीनगर: हिवाळ्यात अनेकजण थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जातात. गुलाबी थंडीचा अनुभव घेण्यासाठी डिसेंबर

गुजरात एटीएसची छापेमारी! राजस्थानातून जप्त केले २२ किलो ड्रग्ज

राजस्थान: राजस्थानमधून ड्रग्ज तस्करीबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राजस्थानमधील भिवाडी इथे गुजरात

नववर्षाच्या स्वागतासाठी सुरक्षा दलांचे 'कवच' तैनात!

काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट' घाटीत थरकाप उडवणारी थंडी, पण सुरक्षा यंत्रणा अलर्ट जम्मू-कश्मीर : नववर्षाच्या