Apple Event 2026 : ॲपलचा भारतात महाधमाका! आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली 'MacBook Pro 2026' लाँच; कधी सुरु होणार प्री ऑर्डर ?

मुंबई : टेक विश्वातील दिग्गज कंपनी अ‍ॅपलने (Apple) भारतीय बाजारपेठेत आपले सर्वात शक्तिशाली लॅपटॉप MacBook Pro (2026) अधिकृतपणे लाँच केले आहेत. कंपनीच्या या फ्लॅगशिप लाइनअपमधील हे लेटेस्ट मॉडेल असून, ते आतापर्यंतचे सर्वात 'पॉवरफुल' मॅकबुक असल्याचा दावा केला जात आहे. हे नवीन लॅपटॉप दोन आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध असून, या आठवड्याच्या शेवटी ग्राहकांसाठी त्याची 'प्री-ऑर्डर' प्रक्रिया सुरू होणार आहे. या लॅपटॉपचे मुख्य आकर्षण म्हणजे यामध्ये अ‍ॅपलचे अत्यंत प्रगत M५  प्रो (M5 Pro) आणि M५ मॅक्स (M5 Max) हे नवीन प्रोसेसर देण्यात आले आहेत. वेगवान कामगिरी आणि जड सॉफ्टवेअर सहज चालवण्यासाठी यामध्ये ६४GB पर्यंत रॅमची (RAM) सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ग्राफिक्स डिझाइनिंग, व्हिडिओ एडिटिंग आणि कोडिंग करणाऱ्या प्रोफेशनल्ससाठी हे नवे मॅकबुक प्रो एक गेम-चेंजर ठरणार आहे.



भारतात नवीन MacBook Pro (2026) च्या किमती जाहीर


अ‍ॅपल प्रेमींसाठी एक मोठी बातमी समोर आली असून, कंपनीने आपल्या सर्वात प्रगत MacBook Pro (2026) ची भारतीय बाजारपेठेतील किंमत जाहीर केली आहे. ग्राहकांना १४-इंच आणि १६-इंच अशा दोन डिस्प्ले पर्यायांमध्ये हे लॅपटॉप खरेदी करता येतील. यामध्ये १४-इंच स्क्रीन असलेल्या M5 Pro (24GB RAM, 1TB स्टोरेज) मॉडेलची सुरुवातीची किंमत २,४९,९०० रुपये ठेवण्यात आली आहे. जर तुम्हाला अधिक ताकदवान M5 Max चिप असलेले व्हेरिअंट हवे असेल, तर त्याची किंमत ३,९९,९०० रुपयांपासून सुरू होते. विशेष म्हणजे, रॅम, स्टोरेज आणि CPU/GPU च्या अपडेट्सनुसार या किमतींमध्ये ४० हजार ते १ लाखांपर्यंत वाढ होऊ शकते. मोठ्या स्क्रीनची आवड असलेल्या लोकांसाठी १६-इंच मॅकबुक प्रो उपलब्ध असून, त्यातील M5 Pro चिप असलेल्या मॉडेलची किंमत २,९९,९०० रुपये आहे. तर, या लाइनअपमधील सर्वात प्रीमियम M5 Max प्रोसेसर असलेल्या १६-इंच मॉडेलची किंमत चक्क ४,२९,९०० रुपये निश्चित करण्यात आली आहे. जर ग्राहकांनी ४TB स्टोरेज आणि ६४GB रॅम सारखे टॉप-एंड फीचर्स निवडले, तर या लॅपटॉपची किंमत अधिक वाढणार आहे. हे नवीन लॅपटॉप सिल्व्हर आणि स्पेस ब्लॅक या दोन आकर्षक रंगांमध्ये लाँच करण्यात आले आहेत. भारतातील ग्राहकांसाठी ही प्री-ऑर्डर प्रक्रिया ४ मार्चपासून अ‍ॅपल इंडियाच्या अधिकृत ऑनलाइन स्टोअरवर सुरू झाली आहे. ज्यांना हे सुपरफास्ट लॅपटॉप खरेदी करायचे आहेत, ते आता आपले बुकिंग करू शकतात. वाढीव ग्राफिक परफॉर्मन्स आणि अवाढव्य बॅटरी बॅकअपमुळे हे मॉडेल टेक विश्वात चर्चेचा विषय ठरत आहेत.



MacBook Pro (2026) मध्ये १६०० निट्स ब्राइटनेस आणि २४ तासांचा बॅटरी बॅकअप


अ‍ॅपलने लाँच केलेल्या MacBook Pro (2026) मध्ये स्क्रीनपासून ते प्रोसेसरपर्यंत सर्वच बाबतीत मोठी प्रगती पाहायला मिळत आहे. या लॅपटॉपमध्ये १६.२ इंचाचा भव्य लिक्विड रेटिना XDR डिस्प्ले देण्यात आला आहे, जो १,६०० निट्सच्या पीक ब्राइटनेससह येतो. विशेष म्हणजे, यामध्ये १२०Hz रिफ्रेश रेट आणि 'नॅनो-टेक्सचर' स्क्रीनचा पर्याय असल्याने वापरकर्त्यांना एक वेगळाच व्हिज्युअल अनुभव मिळणार आहे. व्हिडीओ कॉलिंगसाठी यामध्ये १२-मेगापिक्सेलचा प्रगत वेबकॅम असून, तो 'सेंटर स्टेज' आणि 'डेस्क व्ह्यू'ला सपोर्ट करतो, ज्यामुळे प्रोफेशनल कामांसाठी हा लॅपटॉप अधिक उपयुक्त ठरतो. या डिव्हाइसच्या अंतर्गत ताकदीबद्दल बोलायचे झाले तर, यामध्ये अ‍ॅपलच्या M5 प्रो आणि M5 मॅक्स चिप्सचा वापर करण्यात आला आहे. M5 प्रो मॉडेलमध्ये १८-कोर CPU आणि २०-कोर GPU आहे, तर M5 मॅक्समध्ये ४०-कोर पर्यंतचा शक्तिशाली GPU देण्यात आला आहे. भारी ग्राफिक टास्क आणि AI कामांसाठी यात १६-कोरचे न्यूरल इंजिन आणि हार्डवेअर-एक्सेलरेटेड रे ट्रेसिंगची सुविधा आहे. वापरकर्ते त्यांच्या गरजेनुसार यात १२८GB पर्यंत रॅम आणि ८TB पर्यंत अवाढव्य स्टोरेज (SSD) वाढवू शकतात. कनेक्टिव्हिटीसाठी यात वाय-फाय ७, ब्लूटूथ ६ आणि अ‍ॅपलची विशेष N1 नेटवर्किंग चिप देण्यात आली आहे. बॅटरीच्या बाबतीत अ‍ॅपलने मोठा दावा केला आहे. या मॅकबुकमध्ये १००Wh ची बॅटरी असून ती सलग २४ तास व्हिडिओ प्लेबॅक देऊ शकते. १४०W फास्ट चार्जिंगच्या मदतीने हा लॅपटॉप अत्यंत वेगाने चार्ज होतो. याशिवाय, प्रोफेशनल युजर्ससाठी SDXC कार्ड स्लॉट, HDMI पोर्ट आणि दोन थंडरबोल्ट ५ पोर्ट्स देण्यात आले आहेत. सुरक्षिततेसाठी टच आयडी (Touch ID) आणि टाईपिंगसाठी बॅकलिट मॅजिक कीबोर्ड यांसारखी प्रीमिअम फीचर्स या लॅपटॉपला परिपूर्ण बनवतात.

Comments
Add Comment

Assam Crime News : आसाम हादरले! १६ वर्षीय विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार; विटांनी ठेचून अत्यंत निघृण हत्या

हैलाकांडी : ईशान्य भारतातील आसाम (Assam) राज्यामधून एका अत्यंत भयानक आणि सुन्न करणाऱ्या घटनेने संपूर्ण परिसर हादरून

AAI Apprentice Recruitment 2026: विमानतळावर नोकरीचं स्वप्न पूर्ण होणार! भारतीय विमानतळ प्राधिकरणात अप्रेंटिस भरती जाहीर; 'या' तारखेपूर्वी करा अर्ज

मुंबई : विमान वाहतूक क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) ने

Visa Layoffs: AI मुळे Visa मध्ये 2,600 कर्मचाऱ्यांची कपात; भारतातील शेकडो कर्मचाऱ्यांवर परिणामाची शक्यता

मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानामुळे जागतिक स्तरावर नोकरी कपातीचे प्रमाण वाढत असताना आता पेमेंट

Agni- 4 : ओडिशात अग्नी-4 क्षेपणास्त्राची यशस्वी रात्रीची चाचणी; भारताच्या संरक्षण क्षमतेत महत्त्वाची भर

ओडिशा : ओडिशातील चांदीपूर किनारपट्टीवर भारताने अग्नी-4 या मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची रात्री

National Handloom Day : राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे तरुणांना आवाहन; 'GRWM' व्हिडिओतून हातमाग उत्पादनांना द्या प्रोत्साहन

राष्ट्रीय हातमाग दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देशातील तरुणांना हातमाग

Amazon Flipkart Sale Discount Reality : Amazon-Flipkart च्या सेलमध्ये ७०% डिस्काउंटचा झगमगाट! पण ऑर्डर करण्यापूर्वी 'हा' फंडा समजून घ्या, अन्यथा खिसा होईल खाली!

नवी दिल्ली : स्वातंत्र्य दिनाचे (Independence Day) औचित्य साधून Amazon, Flipkart आणि Myntra यांसारख्या नामांकित ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवर