Pune Metro: गणेश भक्तांसाठी स्वारगेट ते सिव्हिल कोर्ट दर तीन मिनिटांला धावणार मेट्रो

पुणे: गणेशोत्सव काळात देखावे पाहण्यासाठी पुणे शहराच्या मध्य भागांत भाविकांची मोठी गर्दी होते. यामुळे भाविकांना ये-जा करण्यासाठी, तसेच गर्दीवर नियंत्रणासाठी महामेट्रोने गणेशोत्सवात स्वारगेट ते सिव्हिल कोर्ट यादरम्यान दर तीन मिनिटांला मेट्रो सोडण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी दोन दिवसांपासून चाचणी घेतली जात आहे. यामुळे मंडई, कसबा पेठ येथील गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे, अशी माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी दिली.

पुण्यातील गणेशोत्सव जगप्रसिद्ध आहे. यामुळे देखावे पाहण्यासाठी राज्य, राज्याबाहेरील तसेच परदेशातील गणेशभक्त पुण्यात येतात. यंदा मध्य शहरातील कसबा आणि मंडई हे दोन मेट्रोस्थानक सुरू झाल्यामुळे भाविकांना मुख्य देखावे पाहण्यासाठी सोयीचे होणार आहे. गणेशोत्सवात रात्री उशिरापर्यंत सेवा देण्याचे नियोजन केले आहे. जिल्हा न्यायालय ते स्वारगेट मार्गावर मेट्रो सुरू असणार आहे.


या मार्गावरील कसबा, मंडई, स्वारगेट ही मेट्रो स्थानके सुरू झाली आहे. ही स्थानके नागरिकांना थेट मानाच्या गणपतीच्या जवळपास आहे. शिवाय, मध्यवर्ती भागात गर्दी जास्त होते. त्यामुळे मेट्रोच्या फेऱ्या वाढविण्यात येणार आहेत. तसेच, मध्य वस्तीमधील मंडई, कसबा येथे गर्दी होऊ नये म्हणून नियोजन करण्यात आले आहे. मंडई येथे एका बाजूला प्रवेश आणि दुसऱ्या बाजूने बाहेर पडण्याची सोय करण्याचे नियोजन आहे.

Comments
Add Comment

सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर; ‘मेस्मा’लागू ; संपकाळातील सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज

मुंबई : महावितरणमधील सात वीज कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीने ९ ते ११ ऑक्टोबरपर्यंत संप पुकारला आहे. या

पुणे मेट्रो ‘कॅशलेस’ व्यवहारांमुळे राज्यात अव्वल

पुणे : केंद्र सरकारच्या ‘डिजिटल इंडिया’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला प्राधान्य दिल्याने ‘कॅशलेस’ व्यवहारात

पुण्याला पावसाने झोडपले

पुणे : गेले काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने बुधवारी दुपारी तीनपासून पुन्हा एकदा पुण्याला अक्षरश: झोडपले.

आरोग्य विभाग करणार १७०० रुग्णवाहिकांची खरेदी!

राज्यातील सर्व रुग्णवाहिकांचे होणार एकत्रित नेटवर्क व संचलन मुंबई : आरोग्य विभागाअंतर्गत रुग्णवाहिका सेवा

लातूर जिल्ह्यात भीषण अपघातात वाघोली येथील बहिण-भावाचा जागीच मृत्यू

लातूर : लातूर जिल्ह्यातील राष्ट्रिय महामार्गावर भीषण अपघातात बहिण-भावाचा जागीच मृत्यू झाला आहे.औसा–निलंगा

पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत विमानतळाचे होणार उद्घाटन; नवी मुंबईत वाहतुकीत बदल

रायगड : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नवी मुंबई