अभियांत्रिकी आणि वैद्यकीय प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास ६ महिन्यांची मुदतवाढ

मुंबई: सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये (अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर) प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या एसईबीसी आणि ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. त्यांना आता जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. या निर्णयाची घोषणा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केली.


प्रवेशाच्या सहा महिन्यांत प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक


मंत्री पाटील यांनी सांगितले की, या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या ज्या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळवण्यात अडचणी येत आहेत, त्यांना प्रवेशाच्या तारखेपासून सहा महिन्यांच्या आत हे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. जर या कालावधीत विद्यार्थ्यांनी प्रमाणपत्र सादर केले नाही, तर त्यांचा प्रवेश रद्द केला जाईल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित विद्यार्थ्यांची राहील.


मुदतवाढीचे कारण


सरकारने २६ फेब्रुवारी २०२४ पासून एसईबीसी आरक्षण अधिनियम, २०२४ लागू केला आहे, ज्यामुळे या प्रवर्गाला शैक्षणिक प्रवेशांमध्ये १०% आरक्षण मिळाले आहे. याशिवाय, मा. न्या. शिंदे समितीच्या शिफारशीनुसार, मराठा समाजातील काही विद्यार्थ्यांना कुणबी, कुणबी-मराठा किंवा मराठा-कुणबी जातीचे (ओबीसी) प्रमाणपत्र मिळाले आहे. या दोन्ही प्रवर्गातील अनेक विद्यार्थ्यांना अद्याप जात वैधता प्रमाणपत्र मिळालेले नाही.


या विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन आणि त्यांचे प्रवेश जात वैधता प्रमाणपत्राअभावी अवैध ठरू नयेत, यासाठीच हा सहा महिन्यांच्या मुदतवाढीचा निर्णय घेण्यात आल्याचे मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.


या निर्णयाचा शासन निर्णय महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावर (www.maharashtra.gov.in) उपलब्ध आहे.

Comments
Add Comment

गोरेगाव-सांताक्रूझ दरम्यान आज रात्रकालीन ब्लॉक

मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक नाही मुंबई : पश्चिम रेल्वेवर ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या

वांद्रे-वर्सोवा सी लिंकवरील जोड मार्गाच्या कामाला गती

आतापर्यंत २२ टक्के काम पू्र्ण मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरांतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य

Mahaparinirvan Din: भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशाच्या विविधतेला एकत्र बांधणारे संविधान दिले - राज्यपाल आचार्य देवव्रत

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या दूरदृष्टीमुळे भारत जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था -- मुख्यमंत्री

चैत्यभूमीवर गर्दी टाळण्यासाठी दादरमधील वाहतुकीत बदल

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर गर्दी लक्षात घेता वाहतूक

प्रभादेवीतील साई सुंदरनगर, कामगारनगरमधील नाल्यांचे बांधकाम होणार

नाल्याच्या रुंदीकरण कामासाठी कंत्राटदाराची नियुक्ती मुंबई : मुंबईतील प्रभादेवी येथील साई सुंदरनगर,

महापािलका, जि.प. निवडणुका ३१ जानेवारीपूर्वी घ्या : सर्वोच्च न्यायालय

नगरपंचायत व नगरपंचायतींचा निकाल २१ डिसेंबरलाच नवी दिल्ली : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या