सिंधुदुर्ग जिल्ह्यात मत्स्यव्यवसाय महाविद्यालय उभारण्याची योजना

  26



मुंबई : मत्स्यव्यवसायाला चालना देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड, मौजे सौंदाळे, जामसंडे येथे शासकीय जमिनीवर मत्स्यव्यवसाय महाविद्यालय स्थापन करण्यासाठी १६१ कोटींच्या निधी मान्यतेसाठीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याची कार्यवाही गतीने करावी, असे निर्देश कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड तालुक्यात शासकीस मत्स्य महाविद्यालय सुरू करण्याबाबत मंत्रालयात आयोजित बैठकीत कृषी मंत्री भरणे बोलत होते. यावेळी मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे, कृषी विभागाचे प्रधानसचिव विकास चंद्र रस्तोगी, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या वर्षा लड्डा-उंटवाल, दापोली कृषी विद्यापीठाचे कुलगुरू संजय भावे, सहसंशोधक कल्पेश शिंदे कृषी विभागाच्या उपसचिव प्रतिभा पाटील यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. मंत्री भरणे म्हणाले की, मत्स्यव्यवसायाला चालना देण्यासाठी या भागात शासकीस मत्स्य महाविद्यालय सुरू करण्याची सूचना मंत्री राणे यांनी मांडली आहे. या महाविद्यालयाच्या बांधकाम तसेच इतर अनुषंगिक बाबींसाठी १६१ कोटी रूपयांच्या निधीचा प्रस्ताव शासनाकडे मान्यतेसाठी सादर करावा. शासनाच्या सर्व मान्यता घेवून इमारत बांधकाम, मत्स्यव्यवसाय महाविद्यालयाच्या कामांना गती देण्यात यावी असे निर्देश त्यांनी दिले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मत्स्य व्यवसाय महाविद्यालय आवश्यक मंत्री नितेश राणे

मंत्री नितेश राणे म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्हा हा सागर तटीय जिल्हा असून येथे मत्स्‍य व्यवसाय क्षेत्रात प्रशिक्षीत आणि कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी तांत्रिक दृष्टया प्रशिक्षीत आणि व्यावसायिक पदवीधरांसाठी महाविद्यालय होणे अत्यंत गरजेचे आहे. कृषी विभागाने तांत्रिक बाबींची पूर्तता करून या विद्यापीठाची इमारत बांधकाम, विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया, अधिकारी व कर्मचारी भरती प्रक्रिया तसेच इतर अनुषंगिक बाबींचा प्रस्ताव शासनाकडे सादर करून जिल्ह्यात मत्स्य व्यवसाय महाविद्यालय सुरू करण्यासंदर्भातील कार्यवाही करावी.

Comments
Add Comment

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचे ९ महत्वाचे निर्णय !

विमुक्त जाती व भटक्या जमातीतील लाभार्थ्यांसाठी विविध योजनांची कार्यपद्धती प्रभावीरित्या

न्यायमूर्ती शिंदे समितीला मुदतवाढ, जरांगे मुंबईत येणार की नाही येणार लवकरच ठरणार

मुंबई : फडणवीस सरकारच्या निर्देशानुसार मराठा आरक्षण उपसमितीची महत्त्वपूर्ण बैठक मंत्रालयात झाली. उपसमितीचे

'अंबाजोगाई येथे १ हजार १५० खाटांचे रुग्णालय उभारावे'

मुंबई : मराठवाड्यातील ग्रामीण भागासाठी वैद्यकीय शिक्षण व आरोग्यसेवा अधिक सक्षम व्हावी, यासाठी बीड जिल्ह्यातील

'दिवेआगरच्या सुपारी संशोधन केंद्राची कामे लवकर सुरू करा'

मुंबई : रायगड जिल्ह्यातील दिवेआगर येथील प्रस्तावित १४ कोटी रु.ची तरतुद असलेल्या सुपारी संशोधन केंद्राचे काम

'नांदेड-मुंबई ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ ने उघडले मराठवाड्याच्या समृद्धीचे द्वार'

मुंबई : मराठवाड्याच्या विकासासाठी शासन दळणवळण सुविधांवर भर देत आहे. ‘वंदे भारत एक्स्प्रेस’मुळे नांदेड शहर

मुंबई - कोकण रो रो सेवा एक सप्टेंबर पासून सुरू

दक्षिण आशियातील सर्वांत जलद रो-रो सेवा मुंबई : गणेशोत्सव, होळी अशा विविध सणांनिमित्त कोकणवासीय कोकणात मुक्कामी