लालबागचा राजा मंडपात बसवले २५० पेक्षा जास्त CCTV कॅमेरे, AI ची पण मदत घेणार


मुंबई : गणेशोत्सवाच्या काळात कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी मुंबईतील 'लालबागचा राजा' मंडळाने मंडपात कडेकोट सुरक्षा व्यवस्था केली आहे. 'लालबागचा राजा' मंडळाच्या मंडपात २५० पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. संरक्षण व्यवस्था आणखी मजबूत करण्यासाठी AI अर्थात कृत्रिम प्रज्ञेचीही मदत घेतली जाणार आहे.


दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात मुंबईतील 'लालबागचा राजा' मंडळाच्या मंडपात दररोज लाखो भाविकांची गर्दी असते. दर्शनासाठी येणाऱ्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचीही संख्या मोठी असते. मागच्या वर्षी यूट्युबर ज्योती मल्होत्राने 'लालबागचा राजा'च्या परिसरात चित्रीकरण केले होते. आता ज्योतीला पकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेला मदत केल्याच्या आरोपात अटक करण्यात आली आहे. त्यामुळे यंदा सुरक्षा व्यवस्थेत कोणतीही त्रुटी न ठेवण्याचा निर्धार लालबागचा राजा सार्वजनिक मंडळाने केला आहे. पोलिसांच्या सुरक्षा उपाययोजनांसोबतच मंडळाने ‘एआय’सारख्या तंत्रज्ञानाच्या मदतीने सुरक्षा कवच उभे केले आहे.


'लालबागचा राजा' मंडळाच्या मंडपात फेस डिटेक्ट करणारे तसेच आयबॉल डिटेक्ट करणारे कॅमेरे बसवले आहेत. यामुळे मंडळाची संरक्षण व्यवस्था आणखी मजबूत झाली आहे. संशयास्पद असे काहीही आढळल्यास लगेच सुरक्षा यंत्रणेला माहिती मिळेल. सुरक्षा यंत्रणा सावध होऊन तातडीने उपाय करेल, अशी चोख यंत्रणा उभारण्यात आली आहे. मंडपातील निषिद्ध भागात घुसखोरीचा प्रयत्न होऊ नये यासाठी तिथे मोशन ट्रॅकिंग अलर्ट सिस्टिम बसवली आहे. मंडळाने मुंबई पोलिसांच्या सोबत साडेतीन हजार कार्यकर्त्यांची फौज सज्ज ठेवली आहे. हे कार्यकर्ते मंडळात चोख बंदोबस्त ठेवण्यास पोलिसांना सहकार्य करणार आहेत.


Comments
Add Comment

एसटीच्या धडकेने ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी

पुणे : स्वारगेट बस डेपोमध्ये (स्वारगेट बस स्थानक) एक विचित्र अपघात झाला. चालक एसटी मागे घेत होता. ही रिव्हर्सची

आयसिसच्या तीन अतिरेक्यांना अटक, गुजरात ATS ची धडक कारवाई

अहमदाबाद : गुजरात एटीएसने 'आयसिस'शी संबंधित तीन अतिरेक्यांना अटक केली आहे. हे अतिरेकी देशात मोठा घातपात करण्याची

मुंबईत एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना 'दे धक्का'

मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची

कर्नाटकमधील मच्छीमारांची महाराष्ट्रात घुसखोरी, सरकारी यंत्रणेची लगेच कारवाई

देवगड : महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत अनधिकृत मासेमारी करणाऱ्या परप्रांतीय नौकेवर मत्स्यव्यवसाय विभागाने

'हे' आहे देशातील पहिले शाकाहारी शहर! जाणून घ्या सविस्तर

गुजरात: कोरोना काळानंतर जगात मासांहार करणाऱ्यांपेक्षा शाकाहारी लोकांची संख्या वाढत चालली आहे. शाकाहारी जेवण

शिउबाठाचे कल्याण जिल्हाप्रमुख भाजपच्या वाटेवर

डोंबिवली : शिउबाठाचे कल्याण जिल्हाप्रमुख आणि डोंबिवलीतील प्रभावी नेते दीपेश म्हात्रे यांनी भाजप प्रवेशाची