मुंबई: गणेशोत्सवाच्या सुट्टीतही 'जिजामाता उद्यान' बुधवारी पर्यटकांसाठी खुले राहणार आहे. मात्र २८ ऑगस्ट या दिवशी हे उद्यान चंद राहणार आहे, अशी माहिती महानगरपालिकेकडून देण्यात आली आहे.
भायखळा येथील वोरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात पर्यटकांची नेहमीच मोती गदर्दी असते. शनिवार, रविवार या सुट्टीच्या दिवसांसह इतर सुट्टीच्या कालावधीत या राणीच्या चागेत अनेक पर्यटकांची हजेरी लागते. २७ ऑगस्टपासून गणेशोत्सव सुरू होत असून तसेच अनेक शाळांना गणपती उत्सवनिमित्त ५ ते ७ दिवसांच्या सुट्या जाहीर झाल्या आहेत.
हे उद्यान आणि प्राणिसंग्रहालय बुधवार, २७ ऑगस्ट २०२५ रोजी जनतेसाठी खुले राहणार आहे. मात्र त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवार, २८ ऑगस्ट रोजी हे उद्यान व प्राणिसंग्रहालय बंद असेल, अशी माहिती महानगरपालिकेकडून देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकर आणि पर्यटकांना २७ ऑगस्ट रोजी गणेशोत्सवाच्या सुटीत प्राणिसंग्रहालय व उद्यान पाहण्याची संधी मिळणार आहे.