‘मेड इन इंडिया’ ध्येयाला चालना; स्वतः दर ठरवणारा देश होण्याकडे भारताची वाटचाल

मुंबई : मल्टी कमॉडिटी एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेडने (एमसीएक्स) १८ ऑगस्ट २०२५ पासून निकेल फ्युचर्स करार सुरू करण्याची घोषणा केली आहे. या करारामुळे दरनिर्धारणाची प्रक्रिया अधिक प्रभावी होणार असून देशभरातील मूल्य साखळीत अधिक व्यापक सहभागाला प्रोत्साहन मिळणार आहे.


निकेल हा महत्त्वाचा औद्योगिक धातू असून स्टेनलेस स्टील उत्पादन, इलेक्ट्रोप्लेटिंग, ईव्ही बॅटऱ्या आणि इतर अभियांत्रिकी उद्योगांमध्ये कच्चा माल म्हणून निकेलचा वापर करण्यात येतो. भारत निकेल आयातीवर अवलंबून असल्यामुळे या धातूचा वापर करणाऱ्या उद्योगांना किंमतीतील चढ-उतार आणि पुरवठ्यातील अडथळे यांचा मोठा फटका बसतो, ज्यामुळे त्यांच्या व्यवसायाच्या नफ्यावर कायम दबाव असतो.


निकेल फ्युचर्स करार सुरू झाल्याने या उद्योगांना दरातील चढ-उतारांचा धोका कमी होऊन अधिक स्पर्धात्मक होण्यासाठी सक्षम साधन उपलब्ध होईल. हा करार थेट भारतीय रुपयांमध्ये असल्यामुळे, सहभागी कंपन्यांना केवळ वस्तूंच्या किंमतीतील चढउतारापासूनच नव्हे तर डॉलर-रुपया विनिमय दरातील बदलांपासूनही संरक्षण मिळेल. फिजिकल मार्केटमधील व्यावसायिक कंपन्यांसोबतच, या करारामुळे आर्थिक क्षेत्रातील सहभागी आणि गुंतवणूकदारांसाठीही पोर्टफोलिओ विविधीकरण आणि लिक्विडिटी वाढवण्यासाठी ही गुंतवणुकीची महत्त्वाची संधी ठरणार आहे.


व्यापारासाठीचे युनिट २५० किलो आणि डिलिव्हरीसाठीचे युनिट १५०० किलो असेल, आणि ही अट सप्टेंबर २०२५ पासून लागू होणाऱ्या एक्सपायरी करारापासून लागू होईल. कराराच्या एक्सपायरी महिन्यातील तिसरा बुधवार हा व्यवहाराचा शेवटचा दिवस असेल; त्या दिवशी सुट्टी असल्यास त्या आधीचा कामकाजाचा दिवस अंतिम दिवस मानला जाईल. ठाणे हे डिलिव्हरी सेंटर असेल आणि कराराच्या महिन्यातील कामकाजाचे शेवटचे 3 दिवस डिलिव्हरी कालावधी म्हणून ठरविण्यात आले आहेत. एक्स्चेंजकडून केवळ ९९. ८०% किमान शुद्धतेचे, एलएमई मान्यताप्राप्त प्रायमरी निकेल कॅथोड्सच ‘गुड डिलिव्हरी’ म्हणून स्वीकारले जातील.


या करारासाठी टिक साइज प्रति किलो ₹०. १० इतका असेल. दररोजची किंमत मर्यादा ४% ठेवली आहे, तर मार्जिन किमान १०% किंवा एसपीएएन (जे जास्त असेल ते) इतके निश्चित करण्यात आले आहे.


यावर प्रतिक्रिया देताना एमसीएक्सच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीणा राय म्हणाल्या, "बेस मेटलचे करार अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि बाजाराच्या बदलणाऱ्या गरजांशी सुसंगत असावे यासाठी एमसीएक्सतर्फे हे लिस्टिंग करण्यात आले आहे. इष्टतम ट्रेडिंग युनिट, एक्स्पायरी शेड्यूल आणि डिलिव्हरी सेंटर निश्चित करून आम्ही मार्केट पार्टिसिपंट्सना सुधारित लिक्विडिटी, माल कुठे मिळणार आहे याविषयीची स्पष्टता आणि जागतिक मापदंडांशी जुळणारी उत्पादन रचना उपलब्ध करून देत आहोत. देशाच्या सुरक्षा आणि आत्मनिर्भरतेच्या वाटचालीत आपण वापरत असलेल्या कमॉडिटीजसाठी भारच हा स्वतः दर ठरवणारा देश व्हावा, हे आमचे उद्दिष्ट आहे."


एमसीएक्सबद्दल : २००३ पासून कार्यरत असलेले एमसीएक्स हे भारतातील अग्रगण्य कमॉडिटी डेरिव्हेटिव्ह्ज एक्स्चेंज असून, २०२४ मध्ये एफआयएच्या अहवालानुसार जगातील सर्वात मोठे कमॉडिटी ऑप्शन्स एक्स्चेंज आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये कमॉडिटी फ्युचर्स करारांच्या व्यवहारमूल्यानुसार याचा बाजारातील हिस्सा सुमारे ९८% इतका होता. एमसीएक्सचे देशभरात अस्तित्व असून हे भारतीय कमॉडिटी मार्केटसाठी एक डायनामिक व्यासपीठ आहे, जे योग्य दरनिर्धारण आणि परिणामकारक जोखीम व्यवस्थापन या दुहेरी सुविधा पुरवते. येथे बुलियन, ऊर्जा, धातू, कृषी उत्पादने अशा विविध क्षेत्रांतील कमॉडिटीज तसेच सेक्टोरल कमॉडिटी निर्देशांकांमध्ये व्यवहाराची सुविधा उपलब्ध आहे. एक्स्चेंजने अनेक आंतरराष्ट्रीय एक्स्चेंजेस तसेच देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय व्यापारी संघटनांशी धोरणात्मक भागीदारी केली आहे. एमसीएक्स आणि त्याच्या उत्पादनांविषयी अधिक माहितीसाठी http://www.mcxindia.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.

Comments
Add Comment

देशातील सर्वात मोठी पीएसयु बँक एसबीआयचा तिमाही निकाल जाहीर बँकेच्या आर्थिक स्थितीत चांगली सुधारणा निव्वळ नफ्यात ४% वाढ

मोहित सोमण:देशातील सर्वात मोठी पीएसयु बँक एसबीआयने (State Bank of India SEBI) आपला तिमाही निकाल जाहीर केला आहे. बँकेच्या एकत्रित

Suzlon Energy Limited Q2FY26 Results: सुझलॉनचा तिमाही निकाल जाहीर थेट ५३९.०८% निव्वळ नफा व महसूलात ८४.६९% ईबीटात दुपटीने वाढ !

मोहित सोमण: सुझलॉन एनर्जी लिमिटेड (Suzlon Energy Limited) कंपनीचा तिमाही निकाल जाहीर झाला आहे. कंपनीला एकत्रित निव्वळ नफ्यात (Total

डॉलरच्या तुलनेत रूपयाची जबरदस्त वापसी थेट २१ पैशाने, डॉलरची मोठी घसरण 'या' कारणामुळे

प्रतिनिधी: सकाळी एकदम सुरूवातीला रुपया विक्रमी नीचांकी पातळीवरून परतला असून रूपयाने डॉलरच्या तुलनेत विक्रमी

एफ अँड ओ गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी: एनएसईकडून आता F&O ट्रेडरसाठी प्री-ओपन सत्रा खुले होणार ! जाणून घ्या सविस्तर नियमावली

मोहित सोमण: एनएसईकडून शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना दिलासाजनक बातमी आहे. आता फ्युचर अँड ऑप्शन्स (Future and Options (F&O)

जीएसटी संक्रमण, पावसाळी हंगाम असूनही ग्राहक स्टेपल उत्पादनात स्थिरता स्पष्ट

मोतीलाल ओसवाल फायनांशियल सर्विसेसच्या अहवालात स्पष्ट प्रतिनिधी:जीएसटी संक्रमण आणि वाढलेल्या पावसाळ्याच्या

Stock Market Update: सकाळच्या सत्रात शेअर बाजार घसरणीकडे 'या' कारणामुळे सेन्सेक्स १५६.६७ व निफ्टी ६६.१० अंकाने घसरला

मोहित सोमण: अस्थिरतेचे सत्र आजही कायम राहू शकते. आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळच्या सत्रात घसरण झाली