'स्मार्ट अर्नर्स' गरज नसतानाही कर्ज का घेत आहेत ?

कर्ज केवळ आपत्कालीन परिस्थितीत काढायचे या विचारात मोठा बदल होत आहे; उपभोक्ते मालमत्ता, शिक्षण, प्रवास, आरोग्याची काळजी यांपासून अगदी जीवनशैलीविषयक गरजांपर्यंत विविध कारणांसाठी व्यक्तीगत कर्जे घेत आहेत.


व्यक्तीगत कर्जे (पर्सनल लोन्स) घ्यायची ती केवळ 'आणीबाणीच्या परिस्थिती’त ही धारणा भारतात हळूहळू बदलत चालली आहे. स्थिर नोकऱ्या आणि व्यवस्थित पगार असलेल्या उपभोक्तावर्गामध्ये हे स्थित्यंतर विशेषत्वाने दिसत आहे. अनेक वर्षांपासून आर्थिक शिस्त पाळत आलेल्या, दीर्घकालीन बचत उभी करत असलेल्या आणि सातत्याने गुंतवणूक करत असलेल्या वर्गामध्ये हा बदल दिसून आला आहे.


विशेषत: कोविड साथीनंतर त्यांची गुंतवणूक करण्याच्या क्षमतेवर परिणाम झाला नसला तरी 'पैसा गुंतवण्याची’ व्याख्या मात्र खरोखर बदलली आहे. आर्थिक भवितव्यासाठी योग्य ती काळजी घेतली जात असली तरी आरोग्य, मन आणि शरीर यांच्यासाठी आवश्यक गुंतवणूकीकडे नकळतच दुर्लक्ष झाल्याचे अनेकांच्या लक्षात आले. त्यानंतरच्या काळात हे आकलन अधिक पक्के होत गेले आहे, कारण कामाच्या दृष्टीने अत्यंत व्यग्र आयुष्य आणि वेगवान दिनक्रम यांमध्‍ये स्वास्थ्य जपणे, स्वत:ची काळजी घेणे किंवा आयुष्याचा दर्जा सुधारणे यांसारख्या गोष्टींकडे लोक आता स्वत:चे लाड पुरवणे म्हणून बघत नाहीत तर आवश्यक बाबी म्हणून बघू लागले आहेत.


परिणामी आजचे कर्जदार अधिक स्पष्टतेने आणि हेतूपूर्वक खर्च करू लागले आहेत. स्वास्थ्य, शिक्षण, अर्थपूर्ण अनुभव, घराची आरामदायकता आणि व्यक्तिगत इच्छाआकांक्षा या दीर्घकाळ दुर्लक्षित राहिलेल्या उद्दिष्टांना त्यांच्याकडून आता प्राधान्य दिले जाऊ लागले आहे. मात्र कष्टाने उभ्या केलेल्या गुंतवणूका या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी वापरण्याची त्यांची इच्छा नाही. ते हप्ते भरण्यास सक्षम आहेत आणि त्यांचे एसआयपी, दीर्घकालीन पोर्टफोलिओ व निवृत्तीनंतरच्या काळासाठी केलेल्या तरतूदींना धक्का न लावता त्यांना अन्य उद्दिष्टांसाठी खर्च करायचा आहे.


या परिस्थितीत व्यक्तीगत कर्ज हा व्यवहार्य पर्याय ठरतो. हप्त्याचा (ईएमआय) आकडा माहीत असेल तर तो वजा करून दैनंदिन खर्चांचे नियोजन करता येते आणि दीर्घकालीन गुंतवणूकींना हात न लावता त्या सुरू ठेवता येतात. थोडक्यात, ‘स्वप्नपूर्ती’साठी कर्ज काढण्याबाबतची पारंपरिक कल्पना आता नव्याने केली जाऊ लागली आहे: आज कर्ज काढणाऱ्या अनेकांनी आधीच गुंतवणूका केलेल्या असतात- आपला संपदासंचयाचा प्रवास न थांबवता उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी ते सहजपणे व्यक्तीगत कर्जाचा पर्याय निवडतात.


अधिक व्यवहार्य कर्जदार मानसिकता या नवीन प्रवाहाचा गाभा आहे. तात्पुरत्या गरजा पूर्ण करण्यासाठी दीर्घकालीन गुंतवणुकांमधून पैसे काढण्याकडे बहुतेकांचा कल नसतो, कारण त्यामुळे संपदासंचयात खंड पडतो, भविष्यकाळातील लाभ कमी होऊ शकतात आणि काही वेळा तर भांडवलावरील नफ्यावर (कॅपिटल-गेन) कर वगैरे भरावा लागू शकतो. त्याऐवजी निश्चित हप्ता वजा करून अत्यावश्यक गरजा भागवण्याइतपत पैसा हातात राहतो आणि एसआयपी, इक्विटीतील गुंतवणूक आणि निवृत्तीनंतरच्या तरतूदी यांना धक्का लागत नाही.


सर्व शहरांमध्ये वास्तव आयुष्यातील गरजांकडे लक्ष देण्याची मानसिकता दिसून येत आहे- काही जण स्वास्थ्यावर लक्ष केंद्रित करतात, तर काही आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्यांना महत्त्व देतात. दीर्घकाळापासूनच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मालमत्ता उभी करण्याचे प्रमाणही वाढत आहे. उपभोक्ते व्यक्तीगत कर्जाचा वापर त्या वेळी आवश्यक असलेल्या गोष्टी पार पाडून आयुष्यात पुढे जाण्यासाठी करत आहेत आणि दीर्घकालीन आर्थिक नियोजनात काहीच बदल न करता हे शक्य होत आहे.


*उपभोक्ते व्यक्तीगत कर्जांचा वापर आज कशासाठी करत आहेत ?


कर्ज घेण्याच्या नमुन्यांमधून नियोजित वापराचे विस्तृत प्रकार दिसून येतात. ते पुढीलप्रमाणे: ग्राहकांमध्ये विस्तृत 'जीवनविषयक गुंतवणुकीं’साठी व्यक्तीगत कर्जांचा वापर करण्याचे प्रचलन वाढत आहे, यात आकांक्षा आणि स्वास्थ्य यांचा मेळ साधलेला दिसतो: केवळ प्रेक्षणीय स्थळांचे दर्शन घेण्याच्या पलीकडील उपक्रमाभिमुख अनुभवाधारित प्रवासासाठी व्यक्तीगत कर्जे घेतली जात आहेत; निसर्गाचे सान्निध्य, शांतता, ध्यानधारणा व डिजिटल साधनांपासून दूर राहणे अशा पद्धतीने विकसित केलेल्या 'वेलनेस रिट्रीट्स’चा अनुभव घेण्यासाठी व्यक्तीगत कर्जे घेतली जात आहेत; त्वचेवरील उपचार, केसाचे प्रत्यारोपण व निवडक सौंदर्योपचार प्रक्रिया यांसारख्या आत्मविश्वास वाढवणाऱ्या पण अनेक वर्षांपासून पुढे ढकलल्या जाणाऱ्या स्वत:ची काळजी घेण्याच्या पद्धतींसाठी व्यक्तीगत कर्जे घेतली जात आहे. याशिवाय शिक्षण व कौशल्यविकास तसेच घराचे आरामदायीत्व वाढवणे, घरातील दुरुस्त्या यांवर हेतूपूर्वक केल्या जाणाऱ्या खर्चात स्पष्ट वाढ दिसून येत आहे. ज्यात वेळ अत्यंत महत्त्वाची असते अशा आयुष्यांतील महत्त्वाच्या क्षणांवर, मग ते लग्नसोहळे असोत, कौटुंबिक सोहळे असोत किंवा महत्त्वाचे उत्सव असोत, खर्च करण्यासाठी व्यक्तीगत कर्ज काढण्याचे प्रमाण वाढले आहे.


व्यक्तीगत कर्जांचा उपयोग व्यवहार्य, दैनंदिन आर्थिक नियोजनासाठीही केला जात आहे. अनेक ग्राहक या कर्जांचा वापर सर्व देय रकमा एका ठिकाणी आणण्यासाठीही (डेट कन्सॉलिडेशन) करत आहेत, त्यामुळे सर्व निश्चित खर्च एका हप्त्यामध्ये सामावले जातात, आर्थिक बाबींवर आपले नियंत्रण वाढते आणि मन:शांतीही मिळते. काही जण व्यक्तीगत कर्जाचा वापर वाहनाशी निगडित पैशाची तफावत भरून काढण्यासाठी तसेच पुढे न ढकलता येणाऱ्या अत्यावश्यक सुधारणांसाठी करतात. आपली पत रूपरेखा (क्रेडिट प्रोफाइल) सुधारण्याही जाणूनबुजून व्यक्तीगत कर्ज काढणाऱ्यांच्या संख्येतही वाढ होत आहे. व्यक्तीगत कर्जे घेऊन ती शिस्तबद्ध, वक्तशीर हप्त्यांद्वारे फेडल्यास कर्जदाराची क्रेडिट प्रोफाइल चांगली होते, भक्कम होते. क्रेडिट प्रोफाइल निकोप असेल भविष्यकाळातील कर्ज मिळवण्याची पात्रता वाढते तसेच भविष्यकाळात कर्जदाराला अनुकूल अटींवर कर्ज घेता येते. महत्त्वाचे निर्णय लांबणीवर टाकल्यास त्याची काय किंमत मोजावी लागू शकते हेही कर्जदारांना पुरते लक्षात आले आहे. मग तो निर्णय दैनंदिन राहणीमानाचा दर्जा सुधारणारी घरातील दुरुस्तीची कामे करण्याचा असो किंवा अत्यंत तणावाच्या दिनक्रमात स्वत:ची काळजी घेण्याचा असो. अनेकांच्या मते व्यक्तीगत कर्ज घेणे म्हणजे आजच्या गरजांचा व उद्याच्या उद्दिष्टांचा तोल जबाबदारीने सांभाळणे होय.


आत्मविश्वास वाढण्यामागील कारणे : व्यक्तीगत कर्ज समजून घेण्यासाठी व नियोजनासाठी अधिक सोपे असते.


• कर्जाच्या अटी व शुल्के अधिक स्पष्ट व पारदर्शक असतात.
• वितरण अधिक वेगाने होते, हे कर्ज उपलब्ध होण्यासाठी अधिक सोपे असते.
• हप्त्यांची रचना सुलभ असल्याने त्यानुसार आर्थिक नियोजन करणे सोपे जाते.
• डिजिटल प्रवासामुळे ग्राहकांना स्वत:च्या सोयीने प्रक्रिया पूर्ण करण्याची मुभा मिळते.


"आम्हाला आत्मविश्वासपूर्ण स्थित्यंतर दिसत आहे: उत्तम उत्पन्न आणि शिस्तबद्ध गुंतवणूक सवयी असलेले ग्राहक स्वास्थ्य, आयुष्यातील अनुभव व दीर्घकाळापासून पूर्ण न झालेल्या आकांक्षा आदी अर्थपूर्ण उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी दीर्घकालीन गुंतवणूक न मोडता, व्यक्तीगत कर्जाचा उपयोग करत आहेत. कोविड साथीनंतर अनेक जण स्वत:ची काळजी घेणे व दीर्घकाळ बाळगलेली स्वप्ने पूर्ण करणे या गोष्टींना प्राधान्य देऊ लागले आहेत, या गोष्टींकडे आता चैन म्हणून बघितले जात नाही. अशा ग्राहकांसाठी कोटक पर्सनल लोन्स हा सहज पर्याय ठरत आहे. शिस्तीने उभ्या केलेल्या दीर्घकालीन गुंतवणूका थांबवणे किंवा मोडणे टाळण्यासाठी ते कर्ज काढत आहेत. व्यक्तीगत कर्जामुळे त्यांना वर्तमानकाळ भरभरून जगण्यात आणि त्याच वेळी भविष्यकाळातील नियोजन सुरक्षित राखण्यात मदत होत आहे,” असे कोटक महिंद्रा बँकेच्या पर्सनल लोन्स विभागाचे व्यवसाय प्रमुख अमित पाठक म्हणाले.

Comments
Add Comment

Jalgaon Gold Rate : एकाच दिवसात सोनं-चांदीच्या दराचा भडका ! जळगावच्या सुवर्णनगरीत मोठी उलथापालथ

Jalgaon Gold Rate : जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत (Gold Market) गेल्या काही दिवसांपासून सोने, चांदीच्या दरात कमी-अधिक फरकाने

RBI policy : आरबीआयची 'वेट अँड वॉच' भूमिका! महागाईचा दबाव असूनही रेपो दरात बदल नाही; EMI जैसे थे राहणार!

मुंबई : भारतीय मध्यवर्ती बँक अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) ५ ऑगस्ट २०२६ रोजी आपल्या पतधोरणाची (Monetary Policy) घोषणा

Manipal health share price : मणिपाल हेल्थचे शेअर बाजारात धमाकेदार पदार्पण! IPO च्या किमतीपेक्षा ११% प्रिमियमवर लिस्टिंग

बंगळुरू : प्रायमरी मार्केटमध्ये चांगला प्रतिसाद मिळवल्यानंतर 'मणिपाल हेल्थ एंटरप्रायझेस' (Manipal Health Enterprises) या

UPI : आता UPI सशुल्क होणार ? लोकसभेत सादर झालेल्या विधेयकातील तरतुदी समजून घ्या

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मंगळवार ४ ऑगस्ट २०२६ रोजी लोकसभेत एक विधेयक सादर केले. या

Consumer Court Case : माहिती न देता डेबिट कार्ड ब्लॉक करणे फेडरल बँकेला पडले महागात; ग्राहक न्यायालयाने ठोठावला १.२५ लाखांचा दंड

नवी दिल्ली: जर एखाद्या बँकेने आपल्या ग्राहकाला कोणतीही पूर्वसूचना किंवा माहिती न देता त्याचे डेबिट कार्ड ब्लॉक

Crude Oil Import : रशियन तेलावर भारताचा वाढता विश्वास! जुलैमध्ये विक्रमी आयात, अमेरिकेकडूनही LPGची मोठी खरेदी

नवी दिल्ली : भारताने जुलै महिन्यात रशियाकडून कच्च्या तेलाची विक्रमी आयात करत ऊर्जा क्षेत्रात महत्त्वाचा टप्पा