कोका-कोला इंडियाकडून विशेष मोहिमेच्‍या माध्‍यमातून पुन्‍हा ‘रिमझिम जीरा’ लाँच

नवी दिल्‍ली : भारतीयांना पुन्‍हा एकदा स्‍थानिक स्‍वादाचा अनुभव मिळणार आहे, कारण कोका-कोला पुन्‍हा एकदा आपले लोकप्रिय पेय 'रिमझिम जीरा' घेऊन येत आहे. 'जीरा में हिरा, रिमझिम जीरा' या विचारामधून प्रेरित नवीन मोहिम रिमझिमच्‍या पुनरागमनाला दर्शवते, जे आधीपासून लोकप्रिय असण्‍यासोबत प्रत्‍येक पिढीसाठी अभिमानाने ओजी एथनिक पेय आहे.

जुन्‍या आठवणींना उत्‍साही ट्विस्‍टससह उजाळा देत ही मोहिम रिमझिम जीराच्‍या रेट्रो मोहकतेला पुन्‍हा सादर करते. यामध्‍ये आर. डी. बर्मन यांचे प्रख्‍यात गाणे 'दुनिया में लोगो को..' नवीन संकल्‍पनेसह मांडण्‍यात आले आहे, जेथे गाण्‍यातील प्रचलित ओळ 'बीरा.. तरा तरा तरा...'ला अनुसरून अविस्‍मरणीय 'जीईईरा' (Jeeeeera) ओळ तयार करण्‍यात आली आहे. दैनंदिन जीवनातील प्रसंगाच्‍या पार्श्वभूमीवर आधारित ही जाहिरात रिमझिम जीराची विशिष्‍ट चव आणि या पेयाचा आस्‍वाद घेताच त्‍वरित जागृत होणाऱ्या उत्‍स्‍फूर्त प्रतिकियांना साजरे करते, जेथे रिमझिमचा एक घोट आनंद, अद्वितीय अनुभव देण्‍यासोबत ओढ निर्माण करतो, ज्‍याकडे दुर्लक्ष करता येऊ शकत नाही.

कोका-कोला इंडिया व साऊथवेस्‍ट एशियाच्या इमर्जिंग कॅटेगरीजचे सीनियर डायरेक्‍टर सोभनजीत रथ म्‍हणाले, ''७० वर्षांहून अधिक काळाचा वारसा असलेले पेय रिमझिमने धमाक्‍यात पुनरागमन केले आहे. या मोहिमेचा धमाल व उत्‍साही पैलू निर्माण करण्‍याचा मनसुबा होता, जे रिमझिमच्‍या स्‍वदेशी जीरा स्‍वादामध्‍ये सामावलेले आहे. आरडी बर्मन यांच्‍या लोकप्रिय गाण्‍याला देण्‍यात आलेला नवीन ट्विस्‍ट अत्‍यंत मधुरमय आहे. हे नवीन संकल्पित गाणे ऐकल्‍यानंतर तुम्‍हाला जीईईरा (jeeraaaa) सतत ऐकावेसे वाटेल. यामागे संकल्‍पना अगदी सोपी आहे, 'जीरा में हिरा... रिमझिम जीरा'.''

जाहिरातीचे दिग्‍दर्शक झिगझॅग फिल्‍म्‍सचे अभिजीत सुधाकर म्‍हणाले, ''तालावर रचलेले आणि रिमझिमच्‍या चटपटीत स्‍वादावर सजलेले! या प्रोजेक्टमध्‍ये प्रसिद्ध गाणे आणि मूळ पेयाचा उत्‍साहवर्धक आनंद एकत्र आणण्‍यात आला आहे. आम्‍ही या जाहिरातीचे शूटिंग करताना खूप धमाल केली आणि खऱ्या अर्थाने यामधून सामूहिक प्रयत्‍न दिसून आले. जाहिरात एजन्‍सी व क्‍लायंट या दोघांना संकल्‍पना पटली आणि आम्‍ही एकत्रित या संकल्‍पनेला जाहिरातीच्‍या रूपात सादर केले आहे. हे उत्‍साहवर्धक सेलिब्रेशन आहे आणि मला आशा आहे की, आम्‍ही ही जाहिरात बनवताना केलेल्‍या धमालीप्रमाणे प्रेक्षक पाहण्‍याचा आनंद घेतील.''

टॅलेंण्‍टेडमधील क्रिएटिव्‍ह तनिमा कोहली म्‍हणाल्‍या, ''रिमझिम जीराचे रीलाँच जुन्‍या आठवणींना दिलेला धमाकेदार उजाळा आहे. आम्‍ही याच दृष्टिकोनाला प्राधान्‍य दिले. बाजारपेठेत एकसारखे पेय आढळून येत असताना आम्‍ही रिमझिमच्‍या वेगळ्या स्‍वादाला आणि विशिष्‍टतेला महत्त्व दिले. संगीत निवडीपासून एडिटिंग आणि तालापर्यंत लक्षवेधक जाहिरात तयार करण्‍यासाठी प्रत्‍येक निर्णय काळजीपूर्वक घेण्‍यात आला. ही जाहिरात शेवटपर्यंत तुमचे लक्ष वेधून घेईल आणि तुम्‍हाला रिमझिम जीईईरा (Rimzim Jeeeeeeeera) म्‍हणण्‍यास भाग पाडेल.''

रिमझिम रेडी-टू-ड्रिंक स्‍वरूपातील भारतामधील पहिले एथनिक फ्लेवर्ड पेय म्‍हणून लोकप्रिय आहे. भारतातील किचन्‍स व स्‍ट्रीट-फूड आणि रिफ्रेशमेंट संस्‍कृतीमध्‍ये खोलवर सामावलेला स्‍वाद जीरामधून प्रेरित हा ब्रँड आपल्या ताजेतवाने करणाऱ्या चवीसाठी गेल्या अनेक काळापासून प्रसिद्ध आहे. हे उत्पादन २५० मिलीच्या पॅकमध्ये फक्‍त १० रुपयांत उपलब्ध आहे, ज्यामुळे ते ग्राहकांसाठी दररोज किफायतशीर व सहज उपलब्‍ध होणारा पर्याय ठरले आहे.
Comments
Add Comment

'Strawberry Moon' : आज दिसणार वर्षातील सर्वात देखणा 'स्ट्रॉबेरी मून'; संध्याकाळी चुकवू नका हे आकाशातील अद्भुत दृश्य

'Strawberry Moon' : आजची संध्याकाळ आकाश निरीक्षकांसाठी आणि खगोलप्रेमींसाठी खास ठरणार आहे. आज आकाशात 'स्ट्रॉबेरी मून'

Maharashtra Monsoon Trip : मान्सून ट्रिप करायची? महाराष्ट्रातील या ८ निसर्गरम्य ठिकाणांना नक्की भेट द्या!

पावसाळ्याची पहिली सर, सर्वत्र मातीचा सुगंध आणि हिरवागार निसर्गाच्या सानिध्यात पावसाळ्यात एक वेगळीच मजा

Kidambi Srikanth : किदांबी श्रीकांतच्या खिलाडूवृत्तीने जिंकली प्रेक्षकांची मने

कॅलिफोर्निया(California) : भारताचा माजी जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकाचा बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांतने(Kidambi Srikanth)

Voter List Update : मतदारयादी पुनरीक्षणाला वेग; ३० जूनपासून बीएलओंची घरभेट

रायगड : भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार रायगड जिल्ह्यात 'विशेष सखोल पुनरीक्षण २०२६' (SIR) मोहीम

Vat Purnima 2026 : वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्या राशीनुसार नेसा 'या' शुभ रंगांची साडी

मुंबई : विवाहित महिलांसाठी अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा मानला जाणारा वटपौर्णिमेचा सण आता अवघ्या काही तासांवर

Vat Purnima 2026: यंदाची वटपौर्णिमा ठरणार खास; सोमवारी दुर्मिळ शुभ संयोग, जाणून घ्या पूजेचा मुहूर्त

यंदा वटपौर्णिमा (Vat Purnima 2026) २९ जून २०२६ रोजी साजरी केली जाणार असून या वर्षीचा सण धार्मिकदृष्ट्या विशेष मानला जात आहे.