संघाची जोधपूरमध्ये ५ ते ७ सप्टेंबरदरम्यान बैठक

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वार्षिक अखिल भारतीय समन्वय बैठक यंदा ५ ते ७ सप्टेंबर या कालावधीत राजस्थानमधील जोधपूर येथे आयोजित केली जाणार आहे. संघ व संघाशी संबंधित वैचारिक संस्थांमध्ये समन्वय साधण्यासाठी ही बैठक दरवर्षी आयोजित केली जाते.


मागील वर्षी ही बैठक केरळमधील पालक्काड येथे झाली होती. या बैठकीत भाजप, विश्व हिंदू परिषद, भारतीय मजदूर संघ, राष्ट्र सेविका समिती, वनवासी कल्याण आश्रम, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भारतीय किसान संघ, विद्या भारती यांसह संघ प्रेरित ३२ संघटनांचे राष्ट्रीय अध्यक्ष, संघटनमंत्री व प्रमुख पदाधिकारी सहभागी होणार आहेत.


या बैठकीला सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे, तसेच सर्व सह सरकार्यवाह व अन्य वरिष्ठ पदाधिकारी यांचीही विशेष उपस्थिती राहणार आहे. संघाच्या अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार,या बैठकीत सहभागी संघटना त्यांच्या कार्यक्षेत्रातील अनुभवांच्या आधारे विविध घडामोडींचे मूल्यांकन सादर करतात.

Comments
Add Comment

Narendra Modi : पंतप्रधान मोदी शुक्रवारी देशातील पहिल्या हायड्रोजन ट्रेनला दाखवणार हिरवा झेंडा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी हरियाणातील जिंद रेल्वे स्थानकावरून जिंद आणि सोनीपत दरम्यान

Solar Eclipse : ऑगस्टमध्ये खग्रास सूर्यग्रहण; भारतातून दिसणार की नाही ? युरोपमधून दिसेल दुर्मिळ खगोलीय दृश्य !

नवी दिल्ली : तब्बल दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा खग्रास सूर्यग्रहणाचे साक्षीदार होण्याची संधी जगाला मिळणार आहे.

NEVA : महाराष्ट्र विधिमंडळाचे कागदविरहित कामकाजाच्या दिशेने पाऊल

- 'नेव्हा' प्रणालीचा स्वीकार; तीन महिन्यांत अंमलबजावणी; ८० कोटींचा निधी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi)

Karnatak Doctor Murder : धक्कादायक! मृतदेहाच्या शेजारी बसून मोबाईल बघत होती पत्नी; डॉक्टराची घरातच निर्घृण हत्या; 8 वर्षीय मुलगा गंभीर जखमी

कर्नाटकमध्ये डॉक्टर पतीची हत्या, कौटुंबिक कारणावरून खून झाल्याचा संशय धारवाड : कर्नाटकातील धारवाड येथे एका 45

Rajasthan Teacher Suspended : संतापजनक कृत्य..! ५०० रुपये चोरीच्या संशयावरून विद्यार्थिनींना केलं विवस्त्र; VIDEO

सवाई माधोपूर : राजस्थानातील सवाई माधोपूर जिल्ह्यातील एका सरकारी शाळेत संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. ५०० रुपये

Krishna controversy : 'श्रीकृष्ण मुस्लिम होता', मौलानाचा दावा; व्हायरल व्हिडिओवरून नवा वाद, हिंदू संघटनांकडून कारवाईची मागणी

श्रीकृष्णावरून वाद; हिंदू संघटना संतापली मथुरा : श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण न्यायालयात प्रलंबित असतानाच एका