मराठी आणि कुणबी एकच आहेत असा जीआर काढा आणि त्याची अंमलबजावणी करा, त्याच्याशिवाय मी एकही मागणी मागे करणार नाही. मराठ्यांनी काम-धंदे बंद करा, आता मुंबईला जायची तयार करा, असा उठाव पुन्हा होणार नाही, एकजुटीचा असा सोहळा पुन्हा होणे नाही.
म्हणून या लढाईत मराठ्यांनी सहभागी व्हा असं आवाहन जरांगे पाटील यांनी केलाय. मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठी 27 ऑगस्टला अंतरवाली सराटीमधून सकाळी 10 वाजता निघणार, 27 तारखेला जुन्नरमध्ये शिवनेरीवर मुक्काम करणार, चाकण, खेड पुढे वाशी आणि चेंबूरमार्गे मुंबईत आंदोलनासाठी पोहोचणार असल्याचं जरांगे पाटील यांनी सांगितलं. ४ महिन्यांपूर्वी आम्ही मुंबईत आंदोलनात घोषणा केली होती. पण चार महिने सरकारने कोणताही निर्णय घेतला नाही.
अंतरवालीत या असं फडणवीसांना सांगितलं होतं. फडणवीसांनी आडमुठेपणा करू नये असा इशारा जरांगे पाटील यांनी दिलाय. मुंबईत २९ ऑगस्टपासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणार आहेत. जरांगेच्या चलो मुंबई आंदोलनाला सुरुवात झाली आहे.