मुंबईत अंधेरीमध्ये पाच मजली मासळी बाजार बांधणार ?


मुंबई : मुंबईत अंधेरीमध्ये जे. बी. नगर येथे पाच मजली मासळी बाजार बांधण्याचा १३८ कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजुरी प्रक्रियेच्या अंतिम टप्प्यात असल्याचे वृत्त आहे. राज्यातील मत्स्यव्यवसायाला चालना देण्यासाठी तसेच स्थानिक मासळी बाजाराची स्थिती सुधारण्यासाठी हा नवा मासळी बाजार उभारण्याची योजना आहे. प्रस्तावीत मासळी बाजार हा देशातील सर्वाधिक आधुनिक असा आंतरराष्ट्रीय दर्जाचा पाच मजली मासळी बाजार असेल.


जे. बी. नगर येथील जवळपास सहा हजार चौरस मीटर भूखंडावर मासळी बाजार उभारण्याचे सरकारचे नियोजन आहे. या जागेवर सध्या एक स्थानिक मासळी बाजार आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळापासून अवघ्या दोन किलोमीटरवर ही जागा असून मेट्रो स्थानकही येथून जवळ आहे. या बाजाराची इमारत पर्यावरणपूरक असेल; ज्यात कमीत कमी कचऱ्याची निर्मिती होणार आहे. तसेच, पाण्याचा पुनर्वापर आणि सूर्यप्रकाशाचा अधिकाधिक वापर करण्यात येणार आहे.


प्रस्तावीत मासळी बाजारात पारंपरिक कोळी संस्कृतीची अनुभूती देणारे एक रेस्टॉरन्ट आणि एक संग्रहालय यांचेही नियोजन आहे. या मासळी बाजारात कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी 'एआय'ची मदत घेतली जाईल. भूमिगत कचराकुंड्या आणि स्मार्ट सेन्सर आदींचा वापर करण्यात येणार आहे. विजेबाबत इमारत स्वयंपूर्ण असावी यासाठी सौरऊर्जा पॅनलचा अंतर्भावही इमारतीत करण्यात येणार आहे. अंधेरीच्या पाच मजली मासळी बाजारात सुक्या माशांचा बाजार, संग्रहालय, कोल्ड स्टोरेज, कोळी भवन, समाज सभागृह रेस्टॉरन्ट, प्रशिक्षण केंद्र आणि पार्किंग स्पेस (वाहनतळ) या प्रमुख सोयीसुविधा असतील.


Comments
Add Comment

MHADA Lottery : म्हाडाच्या दोन हजार ६४० सदनिकांसाठी निघणार सोडत, ७५ हजार १२७ अर्जदारांचे लक्ष

मुंबई : म्हाडा मुंबई (MHADA Mumbai) मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील २,६४० सदनिकांच्या विक्रीसाठी संगणकीय सोडत (MHADA

Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय! पुढील ४ दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा; 'या' जिल्ह्यांना ऑरेंज-यलो अलर्ट

मुंबई : महाराष्ट्रात मान्सूनने पुन्हा जोर धरला असून पुढील चार दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर कायम

Anil Kakodkar : पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे मार्गासाठी अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती

- 'जीएमआरटी' दुर्बिणीवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणार; ६० दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश मुंबई :

Sindhu Mahakumbh : सिंधू महाकुंभाच्या राष्ट्रीय एकात्मतेच्या संदेशाचा महाराष्ट्रात गौरव; राज्यपालांच्या हस्ते इंद्रेश कुमार आणि पाल्गा रिंपोचे यांचा सन्मान

मुंबई : लडाख येथे प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या सिंधू महाकुंभ (Sindhu Mahakumbh) उपक्रमाने राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक

Analog Paneer : पनीरच्या ३२ टक्के नमुन्यांमध्ये भेसळ, 'ॲनालॉग पनीर'मध्ये वनस्पती चरबीचा वापर

मुंबई : राज्यात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) बाजारपेठेतून घेतलेल्या पनीरच्या नमुन्यांपैकी तब्बल ३२ टक्के नमुने

Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांनी घेतला करंजा मत्स्य बंदर प्रकल्पाचा आढावा

- ४ हजार ५०० मेट्रिक टन मत्स्य उत्पादन हाताळण्याची क्षमता; अत्याधुनिक यंत्रणेसह अनुभवी मनुष्यबळाचा वापर