बाप्पाच्या आगमनापूर्वी सोने स्वस्त पण चांदी महाग झाली 'ही' आहेत कारणे जाणून घ्या आजचे दर

  35

मोहित सोमण:आज जागतिक अस्थिरतेच्या तोंडावर आज व गणपती बाप्पाच्या आगमनापूर्वी पुन्हा सोन्यात घसरण झाली आहे. शुक्रवारी सोन्याच्या व चांदीच्या दरात तुफान वाढ झाल्यानंतर आज मात्र सोन्याने मात्र 'युटर्न' घेतला. परिणामी आज सोने स्वस्त झाले आहे. ' गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ११ रूपयांनी, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात १० रुपयांनी, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ७.४० रूपयांनी घसरण झाली आहे. त्यामुळे प्रति ग्रॅम सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी १०१५१ रूपये, २२ कॅरेटसाठी ९३०५ रूपये, १८ कॅरेटसाठी ७६१४ रुपयांवर पोहोचले आहेत.संकेतस्थळावरील माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत ११० रुपयांनी, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत १०० रूपयांनी, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत ७४ रुपयांनी घसरण झाली आहे. त्यामुळे प्रति तोळा सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी १०१५१० रूपये, २२ कॅरेटसाठी ९३०५० रूपये, १८ कॅरेटसाठी ७६१४० रूपयांवर पोहोचले आहेत.


मुंबईसह भारतातील प्रमुख शहरातील सोन्याचे प्रति ग्रॅम दर २४ कॅरेटसाठी १०१५१ रूपये, २२ कॅरेटसाठी ९३०५ रूपये, १८ कॅरेटसाठी, ७७०० रूपये आहे. आज सकाळीच जागतिक सोन्याच्या निर्देशांकात घसरण झाली होती ती संध्याकाळपर्यंत कायम राहिली आहे. संध्याकाळी सोन्याच्या जागतिक गोल्ड फ्युचर निर्देशांकात ०.१४% घसरण झाली आहे. जागतिक सोन्याच्या मानक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या युएस गोल्ड स्पॉट दरात संध्याकाळपर्यंत ०.१३% घसरण झाल्याने प्रति डॉलर दरपातळी ३३६९.१२ प्रति औंसवर गेली आहे. भारतातील कमोडिटी बाजार एमसीएक्समध्येही (Multi Commodity Exchange MCX) मध्ये सोन्याच्या निर्देशांकात संध्याकाळपर्यंत ०.१५% वाढ झाली आहे त्यामुळे दरपातळी १००५३९.०० रूपयांवर गेली.


आज जागतिक सोन्याच्या निर्देशांकात सकाळी दबाव पातळी निर्माण झाली होती. आज डॉलरमध्ये झालेल्या घसरणीचा फायदा सोन्याच्या निर्देशांकात झाला. ज्यामुळे दरपातळी केवळ आटोक्यात नाही तर घसरली आहे. भारतीय कमोडिटी सराफा बाजारातही सोन्याच्या किंमतीत घसरण झाली. रूपयांची किंमत डॉलरच्या तुलनेत वधारल्याने सोन्याला आज सपोर्ट लेवल मिळाली आहे. याखेरीज आगामी युएस बाजारातील जीडीपी, पीएसई (Personal Consumption Expenditure PCE) आकडेवारी अपेक्षित अस ल्याने युएससह जागतिक बाजारपेठेत गुंतवणूकदारांनी सोन्याच्या गुंतवणूकीत सावधगिरी बाळगली आहे. तसेच फेड व्याजदरात कपात होण्याची आशा सप्टेंबर महिन्यात झाल्याने सोन्याच्या मागणीतही घसरण झाली परिणामी सोने आज स्वस्त झाले.


चांदीत मात्र वाढ !


जागतिक पातळीवरील चांदीच्या औद्योगिक मागणीत वाढ झाल्याने चांदी किरकोळ महागली. सोन्याला पर्याय म्हणून चांदीकडे गुंतवणूकदारांचा कल झुकल्यानेही चांदीच्या मागणीत वाढ झाली आहे. याशिवाय गणपती उत्सवासह आगामी सणासुदीच्या काळात चांदी मात्र महागली आहे. 'गुड रिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार चांदीच्या प्रति ग्रॅम दरात आज १ रूपयाने वाढ झाली आहे. तर प्रति किलो दरात १००० रूपयांनी वाढ झाल्याने चांदीचा प्रति किलो दर १२१००० रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या पाच दिवसांपा सू न चांदीत ५००० रुपयांनी वाढ झाली आहे. संध्याकाळपर्यंत चांदीच्या जागतिक सिल्वर फ्युचर निर्देशांकात ०.९०% घसरण झाली होती. तर भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्स बाजारात चांदीच्या निर्देशांकात ०.१९% घसरण झाल्याने चांदीची दरपातळी ११६०१३.०० पातळीवर गेली आहे.


भारतीय सराफा बाजारातील मुंबईसह प्रमुख शहरातील चांदीचे सरासरी प्रति १० ग्रॅम १३१० रूपये, तर प्रति किलो दर १२१००० रूपयांवर पोहोचले आहेत. भारतात चांदीच्या किमतींमध्ये तीव्र वाढ होत आहे, तज्ञांचा अंदाज आहे की लवकरच त्या प्रति किलोग्रॅम २ लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकतात. चांदीच्या किमतीत सुरू असलेल्या तेजी आणि औद्योगिक मागणीतील वाढीचा फायदा घेण्यासाठी गुंतवणूकदार नाणी, बार, ईटीएफ आणि कमोडिटी मार्केटसह चांदीच्या गुंतवणूक पर्यायांवर लक्ष केंद्रित करत आहेत.

Comments
Add Comment

मुंबईत अंधेरीमध्ये पाच मजली मासळी बाजार बांधणार ?

मुंबई : मुंबईत अंधेरीमध्ये जे. बी. नगर येथे पाच मजली मासळी बाजार बांधण्याचा १३८ कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजुरी

आरक्षणाची लढाई लढावी, पण... नितेश राणेंचा जरांगेंना इशारा

मुंबई : जे रक्ताने मराठे असतात ते कधीही आईविषयी अपशब्द वापरणार नाही. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण आदर्श

मुख्यमंत्र्यांच्या आईबाबत मनोज जरांगेंचे वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात

मुंबई : मराठा समाजाला सरसकट कुणबी दर्जा आणि आरक्षण द्या, अशी मागणी करत मनोज जरांगे यांनी समाजबांधवांना

'प्रहार' शेअर बाजार विश्लेषण: सेन्सेक्स व निफ्टीत वाढ शेअर बाजाराची गाडी पुन्हा रुळावर 'या' कारणामुळे वाढ जाणून घ्या आजचे विश्लेषण

मोहित सोमण : आज अखेरचा सत्राच्या अखेरीस इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात वाढ झाली आहे. सेन्सेक्स ३२९.०६ अंकाने

अंतरवाली सराटीमधून 27 ऑगस्टला मुंबईसाठी निघणार, जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा

मराठा आरक्षण चळवळीचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टला सकाळी १० वाजल्यापासून मुंबईच्या आझाद मैदानावर

Dream11 OUT Team India Sponsorship : ऑनलाइन गेमिंग कायद्याचा फटका; BCCI ला तब्बल ११९ कोटींचा दणका, सरकारच्या निर्णयामुळे Dream११ मागे

मुंबई : भारत सरकारने अलीकडेच ऑनलाइन गेमिंग कायदा लागू केला आहे. या कायद्यानुसार पैशांच्या आधारे खेळल्या