मुंबई पालिका निवडणुकीच्याआधी भाजपने एक मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई अध्यक्षपदी अमित साटम यांची निवड झाली आहे. सलग तीनवेळा अंधेरी पश्चिमचे ते आमदार म्हणून त्यांनी काम केलं आहे. अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे ते आमदार आहेत.
पालिकेआधी भाजपने मोठा निर्णय घेतला आहे. भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ही घोषणा करण्यात आली. अमित साटम यांनी गेली अनेक वर्षे मुंबईच्या पश्चिम उपनगरात नगरसेवक आणि आमदार म्हणून काम केले आहे. अमित साटम हे तीनवेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत.
त्यांना मुंबईतील नागरी प्रश्नांची चांगली जाण आहे. अमित साटम यांनी विधानसभा आणि विविध व्यासपीठांवर भाजपची बाजू आक्रमकपणे मांडण्याचे काम केले आहे. आशिष शेलार यांनी मुंबई विभागाचे अध्यक्षपद याआधी सांभाळले. 2017 च्या निवडणुका असतील, आत्ताच्या निवडणुका त्यांनी उत्तम काम केलं.
मंगलप्रभात लोढा यांनी उत्तम रितीने कार्यभार सांभाळला. पुन्हा आशिष शेलार यांच्याकडे धुरा आली, विधानसभेत चांगले यश मिळाले. मुंबईतील नंबर एकचा पक्ष म्हणून सिद्ध केलं, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
अमित साटम तीन वेळा आमदार म्हणून निवडून आलेत, नगरसेवक होते. प्रदीर्घ कार्यकाळ राहिला आहे. संघटनात्मक जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. अभ्यासू आणि आक्रमक अशी अमित साटम यांची प्रतिमा आहे, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. मुंबईच्या राजकारणाची जाण आणि कल्पकता त्यांच्याकडे आहे. येत्या काळात त्यांच्या नेतृत्वाखालील भाजप मुंबईत घोडदौड राखेल, असा विश्वासही देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला.
अमित साटम हे भारतीय जनता पक्षाचे राजकारणी आहेत. ऑक्टोबर 2014 पासून ते सलग तिसऱ्या कार्यकाळात अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य आमदार म्हणून काम करत आहेत. 15 ऑगस्ट 1976 रोजी मुंबई, महाराष्ट्र येथे जन्मलेल्या साटम यांनी 1998 मध्ये मुंबई विद्यापीठाच्या मिठीबाई कॉलेज ऑफ आर्ट्समधून राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र या विषयात बॅचलर ऑफ आर्ट्स पूर्ण केले. पुढे त्यांनी महात्मा गांधी मिशन्स इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च, मुंबई विद्यापीठातून मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज कार्मिक ची पदवी घेतली, 2000 मध्ये पदवी प्राप्त केली.