Share Market Holiday: पुढील आठवड्यात केवळ चार दिवस चालणार बाजार! जाणून घ्या कोणत्या दिवशी सुट्टी असेल?

Share Market Holiday: पुढील आठवड्यात शेअर बाजार फक्त चार दिवसांसाठी खुला राहणार आहे. तर उर्वरित तीन दिवस हे सुट्टीचे असणार आहेत.

ऑगस्ट महिना संपायला आता एक आठवडाच बाकी राहिला आहे, आणि या शेवटच्या आठवड्यांपैकी केवळ चार दिवसच शेयर बाजार व्यवहारासाठी खुला असणार आहे, तर बाकीचे दिवस बाजार बंद असणार आहे. दिनांक २७ ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी असून, महाराष्ट्र सरकारने या दिवशी सक्तीची सुट्टी जाहीर केल्यामुळे, बीएसई आणि एनएसईसह भारतीय शेअर बाजार बंद राहतील.

गणेश चतुर्थीनिमित्त, बीएसई आणि एनएसईसह भारतीय शेअर बाजार पुढील आठवड्यात फक्त चार दिवस व्यवहारासाठी खुला राहणार आहे. उर्वरित तीन दिवस सुट्टी असेल. बुधवार, शनिवार आणि रविवारी म्हणजे २७, ३० आणि ३१ ऑगस्ट रोजी शेअर बाजारात कोणत्याही प्रकारचा व्यवहार होणार नाही.

शेअर बाजार कधी बंद राहील?


गणेश चतुर्थीनिमित्त बीएसई आणि एनएसईसह भारतीय शेअर बाजार बंद राहतील कारण महाराष्ट्र सरकारने गणेश चतुर्थीला सक्तीची सुट्टी जाहीर केली आहे, त्यामुळे मुंबईतील बीएसई आणि एनएसई दरवर्षी या दिवशी बंद राहतात. ऑगस्ट महिनाही पुढील आठवड्यात संपत आहे. शनिवार आणि रविवार व्यतिरिक्त, सप्टेंबर महिन्यात शेअर बाजारात इतर काही सुट्ट्या असण्याची शक्यता आहे.

तर ऑक्टोबर महिन्यात, गांधी जयंती आणि दिवाळीनिमित्त २, २१ आणि २२ ऑक्टोबर रोजी शेअर बाजार बंद राहील. २१ ऑक्टोबर रोजी मुहूर्त ट्रेडिंग होईल. दरवर्षी दिवाळीच्या दिवशी संध्याकाळी सहा ते सात या वेळेत एक तासासाठी उघडे राहते. या काळात ट्रेडिंग शुभ मानले जात असल्याने, मुहूर्त ट्रेडिंगच्या वेळी शेअर बाजारात भरपूर ट्रेडिंग होते. असे मानले जाते की या काळात व्यवसाय केल्याने वर्षभर समृद्धी येते.

पुढील आठवड्यात शेअर बाजार कसा चालेल?


एकीकडे, अमेरिकन फेड रिझर्व्हकडून व्याजदर कपातीची अपेक्षा असताना, भारतीय शेअर बाजार सकारात्मक दिशेने उघडण्याची अपेक्षा आहे. जागतिक बाजारपेठेतील वाढ आणि डॉलर निर्देशांकातील कमकुवतपणा देखील भारतीय शेअर बाजाराला आधार देईल. मात्र, या सर्वांमध्ये, अमेरिकन टॅरिफ लादण्याची अंतिम मुदत देखील जवळ येत आहे, त्यामुळे गुंतवणूकदार देखील यावर लक्ष ठेवून आहेत.
Comments
Add Comment

राज्यातील २९ महापालिकांच्या सत्तेची दारे आज उघडणार

राज्यभरात मतदारांचा संमिश्र प्रतिसाद; आज निकाल, १५ हजार ९३१ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत कैद मुंबई : राज्यातील

मुंबईत भाजप महायुतीला कौल

ठाकरेंच्या २५ वर्षांच्या सत्तेला सुरुंग; एक्झिट पोलनुसार पुणे आणि पिंपरीत भाजपची सत्ता मुंबई  : मुंबईत उबाठा

गुजराती मतदार पोहोचले गावाला

मुंबई : मकरसंक्रांत अर्थात "उत्तरायण" हा गुजरात आणि राजस्थानमधील प्रमुख सण आहे. या काळात जवळपास जागोजागी भव्य

भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट धारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या

स्वदेशी शस्त्रे ही धोरणात्मक गरज, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे प्रतिपादन

जयपूर : भारतीय सैन्य भविष्यासाठी तयार सैन्य म्हणून प्रगती करत आहे. त्यांनी स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि उपकरणे

पंतप्रधान मोदी शुक्रवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिवसानिमित्त देशवासियांना संबोधित करणार

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त देशवासियांना