लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन, सुवर्ण गजानन महालात शाही थाटात आगमन !

मुंबई: मुंबईत गणेशोत्सवाची सुरुवात होते ती लालबागच्या राजाच्या आगमनाने. यंदाही गणेशोत्सवापूर्वी लालबागच्या राजाचं पारंपरिक फोटो सेशन थाटात पार पडलं, ज्यामुळे भक्तांना त्यांच्या लाडक्या राजाचं पहिलं दर्शन झालं.



यावर्षी लालबागच्या राजाचा दरबार एका वेगळ्याच वैभवाने नटलेला आहे. यंदाचा गणपती बाप्पा तिरुपती बालाजीच्या सुवर्ण राजमुकुटात विराजमान झाला आहे. त्यासाठी खास 'सुवर्ण गजानन महाल' साकारण्यात आला आहे. राजाची वात्सल्यमूर्ती सोन्याच्या अलंकारांनी सजवली आहे. सुवर्ण पाऊलांपासून ते सुवर्ण राजमुकुटापर्यंत राजाचा हा राजेशाही थाट खरंच डोळ्यांचे पारणे फेडणारा आहे.

मंडळाने यंदा एक नवा विक्रम केला आहे. प्रथमच, लालबागच्या राजाच्या दरबाराची उंची तब्बल ५० फुटांपर्यंत वाढवण्यात आली आहे, ज्यामुळे राजाचं रूप अधिकच भव्य आणि विलोभनीय वाटत आहे. लेझर लाईट्सच्या रोषणाईने हे पहिलं दर्शन अधिकच आकर्षक झालं आहे. गणेशोत्सवाच्या काळात राजाच्या दर्शनासाठी २४ तास भक्तांची अफाट गर्दी असते, म्हणूनच मीडिया प्रतिनिधींसाठी हे खास फोटो शूट आयोजित करण्यात आलं होतं. या पहिल्या दर्शनानेच गणेशोत्सवाच्या उत्साहाला सुरुवात झाली आहे.
Comments
Add Comment

सागराचे आव्हान आणि करिअर संधी

सुरेश वांदिले मुंबईमध्ये २७ ते ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ‘मेरीटाइम वीक’ ही आतंरराष्ट्रीय परिषद पार पडली.

मुंबई झाली पूर्णपणे बॅनर,फलकमुक्त, दहा दिवसांमध्ये ७६५१ जाहिरातींवर कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :  मुंबई महापालिकेची निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यांनतर मुंबईला विद्रुप करणाऱ्या

बिनधास्त करा नववर्षाचे सेलिब्रेशन, मध्य रेल्वे मध्यरात्री सोडणार विशेष लोकल

मुंबई : नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईत ठिकठिकाणी रात्री उशिरापर्यंत कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. रात्री

ठाकरे बंधूंची युती, पण उबाठा आणि मनसैनिकांची दिलजमाई कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची जाहीर घोषण

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी