मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातून आगीची बातमी आली आहे. मालाड पूर्व येथे राणी सती मार्गावर असलेल्या वैष्णवी हाइट्स इमारतीला आग लागली आहे.
वैष्णवी हाइट्स इमारतीमधील ११ व्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये आग भडकली. ही आग हळू हळू पसरत आहे. आग लागल्याचे वृत्त कळताच अग्निशमन दलाच्या पाच बंबगाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आग पूर्ण नियंत्रणात आल्यानंतर चौकशी केली जाईल. इमारतीत आग लागण्याचे कारण चौकशी करुन शोधून काढले जाईल. दोषींवर नियमानुसार कारवाई होईल, असे अग्निशमन दलाच्यावतीने सांगण्यात आले.
गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरले आहेत. यामुळे मुंबईत लगबग आहे. अशा उत्साही वातावरणात मालाडमध्ये आग लागण्याची घटना घडली आहे. निवासी इमारतीत नेमकी कोणत्या कारणामुळे आग लागली याची माहिती चौकशी करुन शोधून काढू, असे अग्निशमन दलाच्यावतीने सांगण्यात आले.