Virat Kohli Comeback: विराट कोहली धमाकेदार पुनरागमनासाठी सज्ज! लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर सराव करताना दिसला

लॉर्ड्स : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२५ मध्ये कोहली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) साठी मैदानावर दिसला होता. त्यानंतर आरसीबीने पंजाब किंग्ज (PBKS) ला हरवून पहिल्यांदाच आयपीएलचे विजेतेपद जिंकले. आयपीएलच्या मध्यात कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. यामुळे, किंग कोहली इंग्लंड दौऱ्याचाही भाग होऊ शकला नव्हता. मात्र आता विराट कोहली या वर्षी ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय सामन्यात दमदार पुनरागमन करण्याची शक्यता आहे.  त्यासाठी कोहलीने ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या तयारीला देखील सुरूवात केल्याचे म्हंटले जात आहे. सध्या कोहली लंडनमधील लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर सरावात व्यस्त आहे.


विराट कोहलीने लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडच्या बाहेर चाहत्यांसोबत फोटो देखील काढले. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना १९ ऑक्टोबर रोजी पर्थ येथे खेळला जाईल. त्यानंतर उर्वरित दोन एकदिवसीय सामने २३ ऑक्टोबर (अ‍ॅडिलेड) आणि २५ ऑक्टोबर (सिडनी) रोजी दोन्ही संघांमध्ये खेळले जातील.



विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीबद्दल बीसीसीआयची प्रतिक्रिया


अलीकडेच, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीबद्दल अटकळ बांधली जात होती, परंतु भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) हे वृत्त फेटाळून लावले आहे. बीसीसीआयचा असा विश्वास आहे की, खेळाडूने स्वतः त्याच्या भविष्याचा निर्णय घ्यावा, बोर्ड कधीही कोणत्याही खेळाडूला जबरदस्तीने निवृत्ती घेण्यास सांगत नाही.


दरम्यान, आरसीबीचा युवा फलंदाज स्वस्तिक चिकारानेदेखील विराट कोहली लवकरच पुनरागमन करणार असल्याची शक्यता चाहत्यांसोबत शेअर केली आहे, त्यामुळे विराट कोहलीच्या चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.


२०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत विराट कोहली भारतीय संघाकडून खेळताना दिसू शकतो. या विश्वचषकासाठी अजून दोन वर्षांहून अधिक काळ शिल्लक आहे. अशा परिस्थितीत, विराट कोहलीला त्याची तंदुरुस्ती आणि फॉर्म कायम ठेवावा लागेल कारण तरुण खेळाडू सातत्याने चांगली कामगिरी करून संघात स्थान मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.

Comments
Add Comment

IND vs PAK: भारताने पाकड्यांना धुतले, ७ विकेट राखत मिळवला विजय

दुबई: आशिया कप स्पर्धेतील सहाव्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर जबरदस्त विजय मिळवला आहे. पाकिस्तानने

हॉकी आशिया कपमध्ये भारतीय महिला संघ उपविजेता

अंतिम सामन्यात चीनकडून ४-१ ने पराभव बीजिंग : महिला हॉकी आशिया कपमध्ये भारतीय संघ उपविजेता राहिला. हांगझोऊ येथे

IND vs PAK : पाकिस्तानला धूळ चारण्यासाठी भारतीय संघ सज्ज

मुंबई (प्रतिनिधी) : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटमधील संघर्ष हा जगातील सर

भारताची बॉक्सर जॅस्मिन लंबोरियाने जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये पटकावले सुवर्णपदक, रचला इतिहास

नवी दिल्ली: भारताची प्रतिभावान बॉक्सर जैस्मिन लंबोरियाने जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप २०२५

BCCI च्या कुटुंबातील कोणीही मेलं नाही, म्हणून..., शुभम द्विवेदीच्या पत्नीची प्रतिक्रिया

"सामान्य लोक माझं ऐकतील आणि सामन्यावर बहिष्कार टाकतील" ऐशन्या द्विवेदी Asia Cup 2025 India Vs Pak Match Controversy: पहलगाम हल्ल्यात

भारत-पाकिस्तान सामन्यावर बीसीसीआयचा बहिष्कार?

मॅचमध्ये दिसणार नाहीत बोर्डाचे वरिष्ठ अधिकारी नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान संघात रविवारी (१४ सप्टेंबर) दुबई