बैलपोळाच्या दिवशी नदीमध्ये वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह गवसला

अकोला: मूर्तिजापूर तालुक्यातील एक युवक बैलपोळा सणाच्या दिवशी बैलांना धुण्यासाठी पेढी नदीवर गेला असता, अचानक पाय घसरून वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली. ज्याचा मृतदेह आज दुपारी बचाव पथकाच्या हाती लागला. शंतनू अविनाश मानकर (२५) असे मृत झालेल्या युवकाचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे,


मूर्तिजापूर येथील माना पोलीस ठाण्यांतर्गत खोळद गावाजवळ पोळा सणानिमित्त बैलांना धुण्यासाठी शंतनू पहाटेच्या दरम्यान पेढी नदीवर गेला होता. तेव्हा हा दुर्दैवी अपघात घडला.  या घटनेनंतर मुर्तीजापुर तहसीलदारांच्या सूचनेवरून शोध व बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आणि शोधकार्याला तात्काळ सुरुवात करण्यात आली. मात्र नदीचा प्रवाह अधिक असल्यामुळे संबंधित युवकाचा शोध त्वरित लागू शकला नाही. त्यामुळे, दुसऱ्या दिवशी बोटीच्या सहाय्याने शंतनूचा शोध घेणे चालू ठेवले होते. अखेरीस आज दुपारी १२  वा, दरम्यान बचाव पथकाच्या सदस्यांना शंतनूचा मृतदेह नदीपात्रात आढळून आला.


शंतनूचा मृतदेह बाहेर काढून त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. शंतनू हा अविनाश मानकर यांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या मृत्यूने मानकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


 
Comments
Add Comment

नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी जर्मनीत प्रशिक्षण व करिअरची संधी

वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची माहिती महाराष्ट्र-बाडेन वुटेमबर्ग राज्यांदरम्यान संयुक्त

बहुपत्नीत्वामुळे महिला संकटात

पुणे: देशभरातील मुस्लीम महिलांच्या जीवनात अस्थिरता निर्माण करणाऱ्या बहुपत्नीत्व प्रथेला तातडीने कायदेशीर

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ७५ हजार २८६ कोटींच्या पुरवणी मागण्या सादर

नागपूर : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अर्थमंत्री अजित पवार यांनी एकूण ७५ हजार २८६ कोटी

महाराष्ट्र विधान परिषदेचे हिवाळी अधिवेशन सुरू, वंदे मातरमच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त विशेष गायन

नागपूर : राज्याचे हिवाळी अधिवेशन सोमवार ८ डिसेंबरपासून म्हणजेच आजपासून नागपूर येथे सुरू झाले. या अधिवेशनाची

अधिवेशनाचा कालावधी वाढवण्यावरून गदारोळ;महाविकास आघाडीच्या काळात अधिवेशन फक्त पाच दिवसाचं होतं !!तेही मुंबईतच

नागपूर: नागपूर येथे सुरू झालेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात अधिवेशनाचा कालावधी

तुकडा बंदी कायद्यातील सुधारणेसाठी विधेयक विधानसभेत सादर

नागपूर: आजपासून सुरू झालेल्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्याच्या राजकारणात एक