सोन्याच्या गुंतवणूकीप्रमाणे चांदीच्या गुंतवणूकीला अनन्यसाधारण महत्त्व मिळत आहे. ज्याला टेक्निकल, फंडामेंटल कारणही आहेत. सध्या जागतिक परिस्थिती अस्थिरतेची व असुरक्षिततेची भावना निर्माण करणारी आहे. अगदी शेअर बाजारापासून, बाँड यिल्ड मार्केट, किंवा कमोडिटी बाजार असो गुंतवणूकदारांना अपेक्षित परतावा येत नाहीये .अशा परिस्थितीत सोन्यात का चांदीत गुंतवणूक करू असा प्रश्न मनात येणे सहाजिकच आहे.याच परिपेक्षात (Perspective) पाहिल्यास आगामी काळात चांदीत नफा बुकिंग फा यदेशीर ठरू शकते. सोने व चांदी दोन्ही अमूल्य ठेवा व गुंतवणूक म्हणून ओळखली जातात. दोन्हीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. किंबहुना या कमोडिटीतील गुंतवणूक बाजारात तरलता (Liquidity) प्रदान क रते. परंतु सोन्याच्या व चांदीच्या धातूत गुंतवणूक ही गुंतवणूकीच्या दृष्टीने एक गुंतवणूक असली तरी दोन्ही गुंतवणूकीतील उद्देश, उद्दिष्टे, परतावा हे कंगोरे खरे पाहिल्यास वेगळे आहेत.
सोने हे झटपट रिटर्न्स देणारे माध्यम असले तरी सोन्यात चांदीच्या निर्देशांकापेक्षा अधिक परतावा छोट्या कालावधीसाठी मिळू शकतो. परंतु सोन्याच्या कमोडिटीत गुंतवणूक देखील चांदीच्या तुलनेत अधिक ठरू शकते. त्या मानाने चांदीत गुंतवणूक अधिक स्थिर किंवा कमी अस्थिर असते असे म्हणता येऊ शकते.सध्या फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात होईल की नाही या आशेने गुंतवणूक रणनितीकार योग्य गुंतवणूकीची संधी शोधत आहेत.अशातच आज चार दिवसांच्या विश्रांतीनंतर चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आ हे.गेल्या आठवड्याभरात चांदीच्या दरात घसरण झाल्यानंतर या आठवड्यात मात्र ३००० रूपये वाढ झाली आहे.आजही चांदीच्या औद्योगिक मागणीत जागतिक दबावापोटी अस्थिरत असली तरी गुंतवणूकदार आता सोन्याच्या गुंतवणूकीपेक्षा चांदीच्या गुंतवणूक अ धिक प्राधान्य देत आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाचा परिणाम बाजारात झाल्याने चांदीतही फटका बसला. विशेषतः एफटीएमध्ये मागणी ढासळली.जागतिक मंदीच्या संकेतानंतरही चांदीने भारतीय बाजारातील चांगल्या अर्थव्यवस्थेतील आधारे आपली किंमत पातळी शाबूत ठेव ली आहे.असे असले तरी चांदीने गेल्या दोन दशकांत चांगली वाढ नोंदवली आहे.सध्या मंदी असली तरी आत्मनिर्भर भारतासाठी चांदीचे वाढणे स्वाभाविक आहे अशातच आता चांदीत गुंतवणूक केल्यास भविष्यातील समृद्ध कालावधीत गुंतवणूकदारांना चांगला आ धार मिळू शकतो. मागील एका वर्षात चांदीने २९.१२% परतावा दिला आहे. यावर आपले भाष्य करताना एजंल वनचे डीव्हीपी रिसर्च व नॉन अँग्रीकल्चर कमोडिटी व करन्सी प्रथमेश मल्ल्या म्हणाले की,' चांदी ही बऱ्याच काळापासून गुंतवणूकदारांसाठी एक लो कप्रिय मालमत्ता आहे. एक औद्योगिक वस्तू असण्यासोबतच जागतिक स्तरावर गुंतवणू कदार ती गुंतवणूक मालमत्ता म्हणून देखील मानतात. गेल्या वीस वर्षांपैकी बारा वर्षात चांदीने सकारात्मक दुहेरी अंकी परतावा दिला आहे. शिवाय, ऑटोमोटिव्ह उ द्योगात, विशेषतः इलेक्ट्रिक वाहनांमध्ये चांदीचा वापर ही अशी गोष्ट आहे जी येत्या वर्षात या मालमत्ता वर्गाच्या वाढीला चालना देईल. म्हणूनच दीर्घकालीन दृष्टिकोनातून चांदीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार केला पाहिजे.' असे म्हणाले आहेत.
गेल्या दशकभरात विचार केल्यास सोन्याच्या गुंतवणूकीत जगभरातील गुंतवणूकदारांना १२.१६% सीएजीआर (Compound Annual Growth Rate CAGR)प्रमाणे परतावा मिळाला आहे.दुसरीकडे चांदीनेही गेल्या दशकापासून आपल्या गुंतवणूकीत ९.१% सी एजीआर परतावा दिला आहे. मात्र तेव्हा ईव्ही उत्पादन मर्यादित होते.अधिकृत आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष २०१४ साली जागतिक ईव्हीचा उत्पादन वाटा ०.३८% होता आता आर्थिक वर्ष २०२५ मध्ये उत्पादन व विक्रीत २० लक्ष युनिट्सपर्यंत वाढ झाली आहे.आ र्थिक वर्ष २०२४ मधील १७.३ दशलक्ष उत्पादनावरून आर्थिक वर्ष २५ मध्ये २० दशलक्ष ईव्ही उत्पादन पोहोचले होते. आर्थिक वर्ष २०२३ तुलनेत ईव्ही उत्पादन आकडेवारी आर्थिक वर्ष २०२४ मध्ये २५% वाढली होती. त्यामुळे ईव्ही व औद्योगिक क्षेत्रातील सतत वा ढत्या चांदीतील मागणीत वाढ होत असल्याने आगामी काळात चांदीत अधिक परतावा मिळू शकतो.
चांदीची मागणी आणि पुरवठ्याची गतिशीलता सोन्यापेक्षा खूप वेगळी आहे आणि १९७० च्या दशकाच्या सुरुवातीला सोन्याचा वापर पूर्णपणे सोडून देण्याच्या जवळजवळ एक शतक आधीपासून चांदीचा चलन म्हणून वापर कमी झाला होता. परंतु त्याने एक मजबू त मालमत्ता, मूल्याचा एक मूर्त स्वरुप साठा म्हणून आपले आकर्षण आजही कायम ठेवले आहे. सोने व चांदी यांच्यातील फरक विशेषत्वाने व्यक्त करताना पी एन गाडगीळ अँड सन्स लिमिटेडचे सीओओ व सीएफओ आदित्य मोडक म्हणाले आहेत की,'सोने आणि चांदी पारंपारिकपणे सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिले गेले आहेत आणि आजच्या सतत बदलणाऱ्या आर्थिक जगात, संतुलित गुंतवणूक पोर्टफोलिओचा भाग म्हणून ते पूर्वीपेक्षा जास्त महत्त्वाचे आहेत. सोने अजूनही महागाई आणि चलनमूल्यातील बदलांपासून संरक्षण देणारा एक कालातीत मूल्याचा साठा आहे. दागिने आणि जगभरातील राखीव मालमत्ता म्हणून त्याची नेहमीच मागणी असते म्हणून ही एक चांगली दीर्घकालीन गुंतवणूक आहे.त्याच वेळी, चांदी गुंतवणूकदारांना तितकीच आकर्षक बनत आहे. चांदी आता फक्त दागिने आणि चांदीच्या भांड्यांसाठी वापरली जात नाही; ती आता पर्यावरणीय आणि तंत्रज्ञान क्रांतीच्या आघाडीवर आहे. अधिक लोक सौर पॅनेल, इलेक्ट्रिक कार आणि इलेक्ट्रॉनिक्स वापरत असल्याने, येत्या काही वर्षांत उद्योगात चांदीची गरज नाटकीयरित्या वाढण्याची अपेक्षा आहे. चांदी वाढीसाठी एका अद्वितीय स्थितीत आहे कारण ती एक मौल्यवान धातू आणि औद्योगिक आवश्यक वस्तू दोन्ही आहे.
सोने आणि चांदीचे एक सुज्ञ संतुलन हा गुंतवणूकदारांसाठी भविष्यातील क्षेत्रांमध्ये सहभागी होताना अनिश्चिततेपासून स्वतःचे संरक्षण करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. तसेच, प्रत्येक देशाच्या मध्यवर्ती बँका सोने आणि चांदीच्या ठेवींना गुंतवणूक पोर्टफोलिओचा भाग म्हणून प्रोत्साहन देतात, त्यांची वैधता सिद्ध करतात. पी एन गाडगीळ अँड सन्स येथे आम्हाला वाटते की हे धातू आता खरेदी करणे हा केवळ तुमच्या संपत्तीचे रक्षण करण्याचा एक मार्ग नाही तर दीर्घकालीन वाढीच्या क्षमतेचा फायदा घेण्याचा एक मार्ग देखील आहे.'
चांदीच्या वाढत्या महत्वावर आपले मत व्यक्त करताना इनक्रेड मनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय कुप्पा म्हणाले आहेत की,' चांदी नेहमीच सोन्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर राहिली आहे, परंतु आता चांदीलाही महत्त्व प्राप्त होत आहे. सोने, जे मुख्य त्वे शुद्ध सुरक्षित संपत्ती आहे, त्याच्या विपरीत, चांदीची दुहेरी ओळख आहे; ती एक मौल्यवान धातू आणि एक औद्योगिक कामाचा घोडा दोन्ही आहे. आज आपण संरचनात्मक (Structural) ट्रेंड पाहत आहोत जे चांदीला विशेषतः आकर्षक बनवतात. औद्योगिक मागणी, विशेषतः सौर पॅनेल आणि इलेक्ट्रॉनिक्समधून, गेल्या दशकात ५०% पेक्षा जास्त वाढली आहे आणि जागतिक स्वच्छ ऊर्जा आणि ईव्ही पुशसह ही वाढ अपेक्षित आहे.त्याच वेळी, पुरवठा टिकून राहिला नाही, चांदीच्या बाजारपेठेत सलग चार वर्षे तूट आहे.
ही मागणी-पुरवठा असंतुलन चांदीच्या दीर्घकालीन वाढीसाठी एक मजबूत आधार तयार करत आहे. गुंतवणूकदारांसाठी, चांदी आता फक्त एक अलंकार किंवा हेज राहिलेली नाही; ती तेजीत असलेल्या सौर आणि ईव्ही क्षेत्रांवर एक प्रॉक्सी प्ले देखील आहे. खरं त र, ऑगस्ट २०२२ मध्ये एमसीएक्स (MCX) वर चांदीच्या भविष्यातील किमती सुमारे ५३००० रूपये होत्या आणि ऑगस्ट २०२५ मध्ये ११४००० रूपयांच्या उच्चांकावर पोहोचल्या आहेत. शिवाय, चांदीमध्ये गुंतवणूक करणे आता केवळ दागिने किंवा बार खरेदी कर ण्यापुरते मर्यादित राहिलेले नाही, तर आज, InCred Money सारखे डिजिटल प्लॅटफॉर्म लोकांना खूप कमी रकमेसह सहभागी होण्याची परवानगी देतात, कधीकधी १० रूपयापासून सुरुवात करतात. सोने संपत्ती जतन करण्यासाठी धोरणात्मक धातू राहिले अस ले तरी, चांदी लक्षणीय वाढीच्या क्षमतेसह रणनीतिक पैज (Tactical Bet) बनत आहे.'
असे असले तरीही, चांदीत चढउतार (Volatility) कायम राहिली आहे. नुकत्याच युएस फेड गव्हर्नर जेरोमी पॉवेल यांनी व्याजदरात कपात करण्याचे संकेत दिले आहेत.पण त्या पूर्वसंध्येला सोन्याच्या व चांदीच्या दरात घसरणही झाली. हा आधार पकडला अस ता, चांदी ही सामान्यतः सोन्यापेक्षा अस्थिर (Volatile) आहे. मूळात चांदीच्या बाजाराची घनता कमी आहे. तसेच मानवी व औद्योगिक क्षेत्रातील चढ उतार बाजारातील बदललेल्या परिस्थितीवर अवलंबून असते. याशिवाय बाजारपेठेतील तरलता (Liquidity) कमी आहे आणि औद्योगिक आणि मूल्य वापराच्या साठवणुकीमधील (Storage Value) मागणीतील चढउतार आहेत. अशी आव्हाने असताना काळाच्या ओघातही धातूच्या किमतीतील चढउतार कमी होत असल्याचे दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय घटनांबद्दल सोन्या च्या तुलनेत चांदी अधिक संवेदनशील असते. म्हणूनच, जेव्हा जेव्हा कोणताही मोठा आंतरराष्ट्रीय कार्यक्रम असतो तेव्हा गुंतवणूकदारांनी चांदीकडे त्यांच्या गुंतवणूक दृष्टिकोनाचा पुनर्विचार करावा असे तज्ज्ञ सांगतात. शिवाय शेअर बाजारातील हालचालींमुळे चां दीच्या दरात परिणाम होतो. चांदीच्या व्यापारातून जास्तीत जास्त परतावा मिळविण्यासाठी गुंतवणूक धोरणात्मक सक्रिय असणे आवश्यक आहे असेही तज्ञ सांगतात. त्यामुळे परिस्थितीतील पाऊलखुणा ओळखून चांदीत गुंतवणूक करणे आवश्यक असते. सध्या च्या जागतिक अस्थिरतेत चांदीच्या आगामी दिवसात घसरण अपेक्षित आहे मात्र ती कायमस्वरूपी नसेल. मात्र जीएसटी दरकपात, आगामी आरबीआयच्या व्याजदरातील कपातीची शक्यता, तसेच ईटीएफ (Exchange Traded Fund) गुंतवणूकीमधील चढउता र अशा अनेक मुद्यांचा पार्श्वभूमीवर चांदीत गुंतवणूक करणे महत्वाचे ठरू शकते. मात्र चांदीच्या मूल्याचे स्वरूप दिर्घकालीन गुंतवणूकीसाठी राखल्यास मोठे रिटर्न गुंतवणूकदारांना मिळू शकतात. आगामी काळात प्रत्यक्ष सोने व चांदीपेक्षा डिजिटल बाँड,डिजिटल ईटीएफ मधील डिजिटल गोल्ड सिल्वर यामधील गुंतवणूक वाढणे अपेक्षित आहे.
गुंतवणूकदार सोन्याला पर्याय शोधत असताना आणि अमेरिकन डॉलरच्या तुलनेत हेज करत असल्याने चांदी आणि प्लॅटिनममध्ये गुंतवणूक करत आहेत ज्यामुळे दोन्ही धातूंच्या किमती वाढल्या आहेत असे तज्ज्ञ सांगतात. भारतीय बाजारात चांदीच्या बाबतीत बो लायचे झाल्यास आर्थिक वर्ष २०१५ मध्ये चांदी ३७८२५ रुपये प्रति किलो होती.आज आर्थिक वर्ष २०२५ मध्ये चांदीची किंमत प्रति किलो १०७७०० रूपयांवर पोहोचली आहे. त्यामुळे चांदीत चढ उतार व चांगला परतावा या दोन्ही गोष्टीत संयम आवश्यक ठरू शक तो. त्यामुळे चांदीत गुंतवणूक तज्ञांच्या मते सगळ्यांनाच ती फलदायक अथवा मानसिक स्थिरता देईल अशातला भाग नाही. उदाहरणार्थ ,जरी बाजारात चांदी चांगली कामगिरी करत असली तरी, तज्ञांचा असा इशारा आहे की मौल्यवान धातूची अस्थिरता अत्यंत जा स्त असल्याने,ही किंमत पातळी सावध खरेदीदारांसाठी योग्य नसू शकते, जी सोन्यापेक्षा दुप्पट आहे. जर आपण मानक विचलन (Standard Deviation) पाहिले तर, जे किमतीतील चढ-उतारांचा धोका दर्शवते, कारण चांदी २७ ते २८ टक्यादरम्यान चढउतारास पात्र ठरू शकते .परंतु सोन्यासाठी ती १२ पातळी तज्ञांच्या मते असते. म्हणूनच, जे लोक गुंतवणूक करताना खरोखर सावध असतात, त्यांच्यासाठी चांदी ही चांगली जागा नाही असे तज्ज्ञ सांगतात.
इतर कोणतेही गुंतवणूकदार ज्यांना रस आहे ते चांदीमध्ये गुंतवणूक करू शकतात, कारण ती गुंतवणूक करण्यासाठी मंद पण सुरक्षित बाजारपेठ आहे. चांदीमध्ये गुंतवणूक केल्याने गुंतवणूकदाराच्या पोर्टफोलिओमध्ये विविधता येण्यास मदत होईल ज्यांना के व ळ चांदीत गुंतवणूक करायची नाही त्यांना आपल्या पोर्टफोलिओचा भाग म्हणून चांदी दीर्घकालीन फलदायी ठरू शकते.विशेषतः चांदीतील नफ्यातील कामगिरीवर भाष्य करताना, 'भारतात सोन्याच्या गुंतवणुकीला अधिक महत्व दिले जाते. परंतु सोन्यासोबतच दी र्घकाळ गुंतवणूकीसाठी चांदी देखील उत्तम असा पर्याय मानला जात आहे. सोन्यापेक्षा परवडणारा असा मौल्यवान आणि सुरक्षित धातू म्हणून चांदीची बाजारात ओळख आहे, ज्यामुळे गुंतवणूकदारांना नफ्याची संधी मिळते. सोन्याचे भाव गगनाला भिडलेले असता ना ग्राहकांना चांदी हा गुंतवणुकीसाठी उत्तम पर्याय आहे.चांदीचे दागिने आपल्या सौंदर्याने प्रत्येक प्रसंग खास बनवतात. नवीन पिढी देखील चांदीच्या दागिन्यांना प्राधान्य देताना दिसून येत आहे. केवळ दागिने निर्मितीच न्हवे तर आधुनिक तंत्रज्ञानात देखील चांदीचा उपयोग केला जातो. म्हणूनच भविष्यात वाढीची क्षमता शोधणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी चांदी गुंतवणुकीच उत्तम माध्यम होऊ शकते.' असे पीएनजी ज्वेलर्सचे विक्री उपाध्यक्ष सुरेश कृष्णन म्हणाले आहेत.
आर्थिक वर्ष २०२५ मध्ये विचार केल्यास माहितीनुसार, चांदीने ३०% परतावा दिला आहे. तर २०२५ मधील पहिल्या सहामाहीत चांदीने ३२% परतावा दिला आहे. जागतिक विश्लेषकांचा अंदाज आहे की भारतात १.२३-१.२५ लाख/किलो आणि जागतिक स्तरावर $ ३५-$३६/औंसपेक्षा जास्त संभाव्य लक्ष्यांसह आणखी वाढ होऊ शकते. जरी हे बाजारातील चढउतार आणि भविष्यातील घडामोडींवर अवलंबून असेल. त्यामुळे आगामी काळात चांदीत गुंतवणूक का महत्वाची ठरते यावर बोलताना चांदी ही एक संकरित वस्तू आ हे ज्यामध्ये मौल्यवान आणि मूलभूत धातू दोन्हीचे गुणधर्म आहेत. २०२५ ची सुरुवात पांढऱ्या धातूसाठी बरीच स्थिर होती; तथापि, २०२५ च्या मध्यात ती चांगली वाढली, गेल्या आठवड्यात ती केंद्रस्थानी आली आणि ११५००० पेक्षा जास्त देशांतर्गत उच्चांक गाठला आणि २०१२ नंतरच्या सर्वोच्च COMEX पातळीला $४० च्या आसपास स्पर्श केला, त्यानंतर काही नफा बुकिंग झाली. मजबूत औद्योगिक मागणी, मजबूत ईटीपी (ETP) प्रवाह आणि सोने आणि औद्योगिक धातूंच्या तुलनेत चांदीची सतत वाढ यामुळे ही तेजी वाढ ली. सौर पॅनेल, इलेक्ट्रॉनिक्स आणि ईव्ही (EV) मध्ये एक प्रमुख इनपुट म्हणून, चांदीला हिरव्या तंत्रज्ञानातील संरचनात्मक वाढीचा फायदा होत आहे. यामुळे तिला सोन्यापेक्षा आघाडी मिळते, ज्यामध्ये समान औद्योगिक उपयुक्तता नाही.
याशिवाय चांदीला भारतीय संस्कृतीत मोठे महत्व आहे. सणातील वाढत्या मागणीमुळे चांदीला अधिक 'ऐज' देखील मिळू शकते ज्यामुळे मर्यादेपेक्षा कमी दर पातळी चांदीत सहसा जाऊ शकत नाही. चांदीचे सांस्कृतिक महत्व सांगताना चांदीला नेहमीच सांस्कृति क महत्त्व लाभले आहे,परंतु आज तिची गुंतवणूक म्हणून आकर्षकता सातत्याने वाढताना दिसत आहे. सौर ऊर्जा आणि इलेक्ट्रॉनिक्ससारख्या क्षेत्रांमध्ये वाढत्या मागणीमुळे ग्राहक चांदीकडे एका नव्या दृष्टिकोनातून पाहत आहेत. ती परवडणारी, सहज उपलब्ध आणि तरुण गुंतवणूकदारांसाठी अधिकाधिक महत्त्वाची ठरत आहे. आमच्या स्टोअर्समध्ये आम्ही एक बदल पाहिला आहे. लोक आता चांदीची निवड केवळ डिझाइनसाठीच नव्हे तर दीर्घकालीन क्षमतेसाठीही करत आहेत. हा एक असा धातू आहे जो परंपरा आ णि संधी यांचा उत्तम समतोल साधतो.' असे रांका ज्वेलर्स पुणेचे संचालक वस्तुपाल रांका म्हणाले आहेत.
चीनमधील सुलभ धोरणे, फेड दर कपात अपेक्षा, टॅरिफ अनिश्चितता आणि जागतिक पुरवठ्यातील घट्टपणा यासह - सहाय्यक मॅक्रो ट्रेंडसह सुरक्षित-आश्रय (Safe Heaven) खरेदी आणि आर्थिक पुनर्प्राप्ती थीम दोन्हीचा फायदा घेण्यासाठी चांदी अद्वितीयपणे स्थि तीत आहे. २०२५ हे वर्ष सलग पाचवे वर्ष आहे जेव्हा चांदीचा पुरवठा तूट वाढत आहे, म्हणजेच मागणी पुरवठ्यापेक्षा जास्त आहे, सिल्व्हर इन्स्टिट्यूटच्या मते, त्या मागणीपैकी ५०% पेक्षा जास्त मागणी औद्योगिक वापरातून येत आहे. सोन्याच्या तुलनेत चांदीची दुहे री भूमिका आणि सापेक्ष अवमूल्यन लक्षात घेता, गुंतागुंतीच्या मॅक्रो वातावरणात चांदी गुंतवणूकदारांना आगामी वाढ आणि पोर्टफोलिओ विविधीकरणासाठी एक मजबूत केस देते. बाजारातील क्षमता आणि अस्थिरता पाहता, सोन्यासोबतच, जोखीम प्रोफाइलच्या आधारे चांदी देखील एखाद्याच्या पोर्टफोलिओचा भाग असावी.' असे मोतीलाल ओसवाल फायनांशियल सर्व्हिसेसचे मौल्यवान धातू रिसर्च विश्लेषक मानव मोदी म्हणाले आहेत.
यामुळे बाजारातील आकडेवारी पाहता आगामी दहा वर्षांत सोन्याप्रमाणेच चांदीच्या मूल्यांकनात मोठी वाढ अपेक्षित आहे. अधिकची चढ उतार व इतर जागतिक आव्हाने कायम असली तरी सोन्यापेक्षा चांदीत वाढत्या व्यक्तिगत मागणीमुळे तसेच वाढत्या औद्योगि क उत्पादनातील मागणीत वाढ, ईपीएफ गुंतवणूकीत वाढ अशा विविध कारणांमुळे मोठा परतावा अपेक्षित आहे. तुलनेने चांदीच्या किंमतीही सोन्यापेक्षा कमी असल्याने त्या तुलनेत गुंतवणूकदारांना चांगला अथवा आकर्षित परतावा मिळू शकतो. जर सध्याची परि स्थिती पाहता घसरलेल्या चांदीत नफा बुकिंग केल्यास व दीर्घकालीन काळासाठी संयम बाळगल्यास चांदीत चांगले भवितव्य आहे. परंतु तज्ञांच्या मते जागतिक वातावरणाचा चांदीवरील प्रभाव अधिक असल्याने चांदीत नुकसान होऊ शकते. दरम्यान चांदीत योग्य वेळी योग्य गुंतवणूक करताना रणनीती राखणे महत्वाचे ठरेल यात शंका नाही.