'क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, अलिबागमध्ये चित्रीकरणाला सुरुवात

अलिबाग: दिग्दर्शक हेमंत ढोमे यांचा मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व सांगणारा नवा चित्रपट 'क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा मुहूर्त सोहळा अलिबाग येथे महिला व बालविकास मंत्री आदिती सुनील तटकरे यांच्या हस्ते नुकताच पार पडला. यावेळी दिग्दर्शक हेमंत ढोमे आणि निर्माती क्षिती जोग उपस्थित होते. हा चित्रपट शिक्षणातील बदल, मराठी शाळांची कमी होणारी संख्या आणि मातृभाषेतून होणाऱ्या जडणघडणीवर भाष्य करणार आहे.


मातृभाषेतून शिक्षण संस्कारांवर परिणाम करतं


"आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात शाळेचं मोठं योगदान असतं. मातृभाषेतून मिळणारं शिक्षण विद्यार्थ्यांच्या संस्कारांवर खोलवर परिणाम करतं. 'क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम' हा चित्रपट समाजाला योग्य संदेश देईल आणि तो विचार करायला लावणारा ठरेल. रायगड जिल्ह्यात या चित्रपटाचा मुहूर्त झाल्याचा मला अभिमान आहे. दिग्दर्शक हेमंत ढोमे आणि निर्माती क्षिती जोग नेहमीच समाजाला आरसा दाखवणारे आशयसंपन्न चित्रपट सादर करतात"; असे आदिती तटकरे या प्रसंगी म्हणाल्या,


मराठी शाळांविषयीची चिंता व्यक्त


दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी आपल्या मराठी शाळेतील आठवणींना उजाळा दिला. "आज मी जे काही आहे ते माझ्या मराठी शाळांमुळेच आहे. मातृभाषेतून शिकताना मला माझी संस्कृती, परंपरा आणि माणसं समजली. पण आज मराठी शाळा कमी होत चालल्या आहेत, ही चिंतेची बाब आहे. या चित्रपटातून मातृभाषेतून होणारे शिक्षण कमीपणाचं नसून खरं तर ते समृद्ध करणारं आहे, हे सांगण्याचा प्रयत्न असेल." असं ते म्हणाले.

Comments
Add Comment

Girija Oak Godbole : निळ्या साडीतील गिरिजा ओक बनली 'नॅशनल क्रश'! सोशल मीडियावर तुफान व्हायरल

मुंबई : सोशल मीडियाच्या जगात कधी काय व्हायरल होईल, हे सांगता येत नाही. गेल्या काही दिवसांपासून जर तुम्ही एक्स (X),

धर्मेंद्र यांची कोट्यावधींची मालमत्ता! कोण होणार 'वारसदार'?

मुंबई: अभिनेते धर्मेंद्र यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. आज सकाळी त्यांना डिस्चार्ज

बॉलीवूड अभिनेता गोविंदाची प्रकृती स्थिर

मुंबई: गेल्या काही महिन्यांपासून अभिनेता गोविंदा त्याच्या खासगी आयुष्यामुळेही सतत चर्चेत आहे. मात्र यावेळी

धर्मेंद्र यांची प्रकृती सुधारली, रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला

मुंबई : बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्याबाबत एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुंबईतील ब्रीच कँडी

Gautami Patil : नृत्य नाही, आता शौर्य! गौतमी पाटीलचं 'नऊवारी' गाणं रेकॉर्ड ब्रेक, चाहत्यांकडून तुफान लाईक्स

मुंबई : आपल्या दमदार नृत्यकौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील

'ऊत' चित्रपटाचा शानदार ट्रेलर प्रकाशित

जिद्दी युवकाच्या संघर्षाची कथा २१ नोव्हेंबरला चित्रपटगृहात समाजातील दाहक वास्तवावर प्रकाशझोत टाकणाऱ्या