सणासुदीला पेटीएमवर ५१ रुपयांपासून डिजिटल सोने खरेदी करता येणार

मुंबई: सोनं हे पारंपरिकरित्या भारतीय घरांमध्ये बचतीचे आवडते साधन मानले जाते जे सणासुदीला खरेदी केले जाते आणि पिढ्यान्‌पिढ्या पुढे दिले जाते. ओणम हा केरळमधील सर्वाधिक साजरा होणारा आणि उत्सुकतेने वाट पाहिला जाणारा सण आहे. तो सोनं खरेदी करण्यासाठी शुभ मानला जातो, जो समृद्धी, भरभराट आणि नव्या सुरुवातीचं प्रतीक आहे. या ओणमला कुटुंबं पेटीएमवर फक्त ५१ रुपयांपासून आपली डिजिटल सोन्याची बचत सुरू करू शकतात. सोनं विमा घेतलेल्या व ऑडिटेड व्हॉल्ट्समध्ये सुरक्षित ठेवले जाते, त्यामुळे भौतिक स्टोरेज किंवा लॉकरची गरज लागत नाही. कंपनीने या ऑफर बाबत बोलताना म्हटले आहे की,भारतातील सर्वाधिक विश्वासार्ह पेमेंट अँप म्हणून पेटीएम गोल्ड शुद्धता, सुरक्षा आणि पारंपरिक सोनं खरेदीशी संबंधित लपलेल्या खर्चासा रख्या चिंता दूर करते. हे २४के (24 Carrot) शुद्ध सोनं त्वरित खरेदीसाठी उपलब्ध करून देते. दीर्घकालीन बचतीसाठी पेटीएम दैनंदिन, साप्ताहिक किंवा मासिक योगदान असे लवचिक गुंतवणूक पर्याय देते. किंमती लाईव्ह मार्केट रेट्सप्रमाणे असतात आणि प्र त्येक व्यवहार डिजिटल लॉकरमध्ये नोंदवला जातो. जमा झालेलं सोनं भौतिक नाण्यांमध्ये रिडीम करता येतं किंवा पुन्हा प्लॅटफॉर्मवर विकता येतं. रिडेम्प्शन दरम्यान बीआयएस -प्रमाणित, हॉलमार्क सोन्याची डिलिव्हरी जागतिक दर्जा पूर्ण करते.

पेटीएम गोल्डमध्ये गुंतवणुकीसाठी सर्वप्रथम सर्च बारमध्ये ‘पेटीएम गोल्ड’ किंवा ‘डेली गोल्ड एसआयपी’ पर्याय शोधा.यानंतर ‘बाय मोर’ वर टॅप करून गुंतवणुकीची रक्कम टाका ज्याची ५१ रुपयांपासून सुरुवात होते, याशिवाय जीएसटीसहित लाईव्ह सोन्याचा भा व पहा आणि एकरकमी खरेदी किंवा एसआयपी (दैनिक/साप्ताहिक/मासिक) पर्याय निवडा. यानंतर पेमेंट मोड निवडा (युपीआय, नेट बँकिंग किंवा डेबिट कार्ड) आणि खरेदी पूर्ण करा. तुमच्या यशस्वी व्यवहारानंतर सोनं सुरक्षित व्हॉल्ट्समध्ये ठेवले जाईल आ णि एमएसएस व ईमेलद्वारे याची पुष्टी मिळेल असेही कंपनीने यावेळी म्हटले. डेली गोल्ड एसआयपी लोकांना लहान-लहान नियमित गुंतवणूक करण्याची संधी देते, ज्यामुळे कालांतराने सोप्या पद्धतीने सोनं जमा होतं. हा पद्धतशीर दृष्टिकोन शिस्तबद्ध बचतीला प्रो त्साहन देतो आणि एकरकमी खरेदी न करता किंमत सरासरीचा लाभ मिळवून देतो.
Comments
Add Comment

IND vs PAK: भारताने पाकड्यांना धुतले, ७ विकेट राखत मिळवला विजय

दुबई: आशिया कप स्पर्धेतील सहाव्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर जबरदस्त विजय मिळवला आहे. पाकिस्तानने

अचानक येऊन पाहणी करा, पुणेकर महिलेची अजित पवारांकडे मागणी

पुणे : वाहनांची वाढती संख्या विचारात घेता रस्ते रुंद करण्यावर शासनाचा भर आहे, वाढत्या वाहनामुळे वाहतूक कोंडी

आचार्य देवव्रत यांचे मुंबईत आगमन, सोमवारी घेणार राज्यपालपदाची शपथ

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे पत्नी दर्शना देवी यांच्यासह रविवारी मुंबई

भारत - पाकिस्तान सामन्यावरुन मविआत बेबनाव

नाशिक : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दुबईत आमनेसामने असतील. हा सामना

बिहारमध्ये राजदने राहुल गांधींना बनवलं उल्लू

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. पण बिहारसाठी राजकीय पक्षांचा प्रचार हळू

गावची जमीन गावातच, मोरवणे ग्रामसभेच्या ठरावाची सर्वत्र चर्चा

रत्नागिरी : कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळुण तालुक्यातील मोरवणे गावाच्या ग्रामसभेने एक ठराव केला आहे.