अनिल अंबानी यांना धक्क्यावर धक्का! आज घरावर छापा व शुक्रवारी आई कोकिलाबेन रुग्णालयात दाखल !

प्रतिनिधी:५ ऑगस्टला उद्योगपती अनिल अंबानी व यांच्या विविध ठिकाणी सीबीआय व ईडीने एकत्रितपणे छापे टाकले होते. त्याचाच भाग दोन म्हणून अनिल अंबानी यांच्या घरावरही छापे टाकले गेल्याचे वृत्त एका वृत्तसंस्थेने दिले आहे. १७००० कोटींच्या कर्ज क थित घोटाळा प्रकरणात १० तासाहून कसून चौकशी अनिल अंबानीची करण्यात आली आहे.मनी लाँड्रिंग प्रकरणात नियामक मंडळांनी (Regulatory Authority) यांनी अनिल अंबानी यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला होता.एसबीआय व येस बँक या दोन्ही बँ केकडून मिळालेल्या कर्जांचा गैरवापर करत दुसऱ्या कारणांसाठी पैसे वळवल्याचे आरोप अनिल अंबानी यांच्यावर करण्यात आले होते. सुत्रांनुसार अनिल अंबानींना आवश्यक ती सर्व कागदपत्रे पुढील १० तासात पाठवण्यासाठी नियामकांनी सांगितले आहे.


नियामक मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या मते,अंबानी यांच्या नेतृत्वाखाली रिलायन्स समुहाच्या रिलायन्स कम्युनिकेशन लिमिटेडने हे कर्जाचे पैसे वळते करून शेल कंपनीत टाकले होते. ज्याचा कुठलाही ठोस लेखाजोखा कंपनीकडे नाही. सुत्रांच्या माहितीनुसार,याप्रक रणी अधिक चौकशी सुरू आहे. आवश्यक ती कागदपत्रे तपासून व अंबानी व त्यांच्या दोन बड्या अधिकारी वर्गाचीही चौकशी सुरू असल्याचे म्हटले आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या व उपलब्ध माहितीनुसार,रिलायन्स कम्युनिकेशनचा सहा ठिकाणांवर व घरावर ही सीबीआय या केंद्रीय यंत्रणेने छापे टाकले आहेत.एसबीआयकडून घेतलेल्या २००० कोटी कर्जनिधीचा गैरवापर केल्याचा आरोप अंबानी यांच्यावर आहे. जून १३ ला अंबानी यांना आपल्या माहितीपत्रकात 'Fraud' संबोधले होते. त्यानंतर अर्थ विश्वात मोठा गदारो ळ झाला होता. त्यानंतर अनिल अंबानी यांच्या शिष्टमंडळाने उच्च न्यायालयात धाव घेत आपल्याला एसबीआयने म्हणणे ऐकून घेण्यासाठी पुरेसा वेळ दिला नसल्याचा आरोप त्यांनी केला होता. एसबीआयने आरकॉमला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, कर्जाच्या वापरात विचलन आढळले आहे, ज्यामध्ये अनेक गट संस्थांमध्ये निधी हालचालींचा (Complex fund movments) एक जटिल साठा समाविष्ट आहे.


'आम्ही आमच्या कारणे दाखवा सूचनेच्या उत्तरांची दखल घेतली आहे आणि त्याची योग्य तपासणी केल्यानंतर,असा निष्कर्ष काढला आहे की कर्जाच्या कागदपत्रांच्या मान्य अटी आणि शर्तींचे पालन न करणे किंवा आरसीएलच्या खात्याच्या व्यवहारात बँकेच्या समा धानासाठी आढळलेल्या अनियमिततेचे स्पष्टीकरण देण्यासाठी प्रतिवादीने पुरेशी कारणे दिली नाहीत' असे त्यात म्हटले आहे. नियामक मंडळांनी चौकशीनंतर अंबानी यांच्या विविध ठिकाणी ऑगस्टला छापे टाकले होते. त्यानंतर दोन एफआयआर देखील अंबानी यांच्या आरकॉमवर दाखल केले गेले होते.आर्थिक वर्ष २०१७ ते २०१९ या कालावधीत अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन (RCom) कडून येस बँकेने दिलेले ३००० कोटींचे कर्ज जाणूनबुजून भलत्या खात्यात ट्रान्स्फर करण्यात आले असे आरोप अंबानींवर झाले याशिवाय रिलायन्स कम्युनिकेशन्सचा उच्चपदस्थांकडून १४००० कोटींचा घोटाळा करण्यात आला असा आरोप नियामकांनी केला आहे.


नियामकांनी बेकायदेशीर 'क्विड प्रो क्वो' (Quid pro quo) व्यवस्था असल्याचा आरोप केला आहे  ज्यामध्ये येस बँकेच्या प्रवर्तकांना कर्ज मंजूर करण्यापूर्वी खाजगी मालकीच्या कंपन्यांमध्ये पैसे मिळाल्याचा आरोप आहे. एसबीआयकडून २००० कोटी रकमेचे नुक सान झाल्याचे बँकेने म्हटले होते. त्यानंतर एसबीआयने कर्जाचे वर्गीकरण घोटाळ्यात २४ जूनपर्यंत करण्यात आले होते. सध्या रिलायन्स आयबीसीकडून बुडित खाते संरचनेतून जात आहेत. आयबीसी (Insolvency and Bankruptcy Code IBC) कडुन कंपनी रिझोलुशन प्रकियेतून जात आहे. सध्या एनसीएलटी (NCLT) कडून या प्रकरणी निकालाला विलंब झाला आहे.


कोकिलाबेन अंबानी रूग्णालयात दाखल !


उद्योगपती अनिल अंबानी यांची आई व रिलायन्स इंडस्ट्रीजचे संस्थापक अध्यक्ष धीरुभाई अंबानी यांच्या पत्नी कोकिलाबेन अंबानी यांना कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ९१ वर्षीय कोकिलाबेन आप ल्या दोन्ही पुत्र अनिल व मुकेश अंबानी काल शुक्रवारी रूग्णालयात दाखल झाल्या आहेत.

Comments
Add Comment

अचानक येऊन पाहणी करा, पुणेकर महिलेची अजित पवारांकडे मागणी

पुणे : वाहनांची वाढती संख्या विचारात घेता रस्ते रुंद करण्यावर शासनाचा भर आहे, वाढत्या वाहनामुळे वाहतूक कोंडी

आचार्य देवव्रत यांचे मुंबईत आगमन, सोमवारी घेणार राज्यपालपदाची शपथ

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे पत्नी दर्शना देवी यांच्यासह रविवारी मुंबई

भारत - पाकिस्तान सामन्यावरुन मविआत बेबनाव

नाशिक : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दुबईत आमनेसामने असतील. हा सामना

बिहारमध्ये राजदने राहुल गांधींना बनवलं उल्लू

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. पण बिहारसाठी राजकीय पक्षांचा प्रचार हळू

गावची जमीन गावातच, मोरवणे ग्रामसभेच्या ठरावाची सर्वत्र चर्चा

रत्नागिरी : कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळुण तालुक्यातील मोरवणे गावाच्या ग्रामसभेने एक ठराव केला आहे.

मुंबईत मद्यपी तरुणीमुळे अपघात, फुटपाथवर गेली कार आणि...

मुंबई : मद्यपी तरुणीने बेदरकारपणे कार चालवली आणि अपघात झाला. दुभाजकाचा कठडा तोडून कार फुटपाथवर (पदपथ) झोपलेल्या