खळबळजनक! शेअर बाजारातील बडे नाव अवधूत साठे यांच्या ठिकाणावर सेबीच्या धाडी !

प्रतिनिधी:शेअर बाजारातील बडे नाव अवधूत साठे यांच्या अडचणीत भर पडली आहे.कर्जत येथील सह्याद्री हिल्स येथे अवधूत साठे यांच्या ठिकाणावर सेबी (Security Exchange Board of India) कडून धाड टाकण्यात आली आहे. शेअर बाजारातील तज्ञफि न इन्फ्लुएऐंसर म्हणून ओळख असणाऱ्या अवधूत साठे यांच्या ठिकाणावर सेबीने छापेमारी करण्यात आली आहे. २० ऑगस्टला ही घटना घडली. सेबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या अटकेची पुष्टी देखील केली आहे. गेलेले अनेक महिने अवधूत साठे हे सेबीच्या रडार वर होते. नियोजनबद्ध व न्यायालयाची परवानगी (समन्स) घेऊनच साठे यांच्या ठिकाणावर सेबीने धाड टाकली आहे. २१ ऑगस्टला उशीरापर्यंत ही कारवाई सुरु होती.


अवधूत साठे हे कर्जत ट्रेनिंग अकॅडमी चालवतात. त्यांच्या युट्यूब चॅनेलवर त्यांचे भरपूर फॉलोअर्स आहेत जे ९.३६ लाखांच्या घरात आहेत. सेबीकडे अवधूत साठे यांच्या ट्रेनिंग अकॅडमीसह इतर अकॅडमीची तक्रार आली होती. पेनी स्टॉक खरेदी करण्याचा प्रभाव (Manipulation) टाकणे, याशिवाय शेअर्सच्या किंमतीत कृत्रीम फुगवटा (Stocks Manipulation) करणे, तसेच क्लासमध्ये लाईव्ह डेटाचा वापर करत विद्यार्थ्यांना शेअर खरेदी करण्यास सांगणे अशा प्रकारचा ठपका सेबीने साठेंवर ठेवण्यात आला आहे.शेअ र्सच्या फुगवटा अथवा अफरातफर अशा अनेक प्रकरणांत सेबीने गेल्या दोन महिन्यांपासून अत्यंत कडक पाऊले उचलली होती. याआधी पंप अँड डंप घोटाळा, जेन स्ट्रीट प्रकरणांचा खुलासा सेबीने केला होता. आता अवधूत साठे यांच्यावरील कारवाई हा त्याचाच पुढील भाग असल्याचे म्हटले जात आहे. याशिवाय गुंतवणूकदारांना आमिष दाखवून आणि जलद नफ्याचे आश्वासन देऊन, परवाना नसलेल्या सोशल मीडिया व्यक्तिमत्त्वे आणि बाजार शिक्षकांवरील नियम कडक करत आहे.


यावर काही प्रसारमाध्यमांनी ही समन्वित कारवाई २० ऑगस्ट २०२५ रोजी सुरू झाली आणि २१ ऑगस्ट २०२५ पर्यंत चालू राहिली असे म्हटले आहे. सेबीच्या अंमलबजावणी पथकाने, एका उपमहाव्यवस्थापकाच्या नेतृत्वाखाली,अकादमीमध्ये शोध आणि जप्तीची कारवाई केली. डिजिटल उपकरणे, ट्रेडिंग डेटा आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आणि आता त्यांची (अकॅडमीची) फॉरेन्सिक तपासणी देखील सुरू झाली आहे.आपल्या शिकवणी क्लासेस दरम्यान विशेषतः वर्गांदरम्यान लाईव्ह ट्रेडिंग सत्रांमध्ये किंवा चा र्ट विश्लेषणामध्ये अशा स्टॉकचा समावेश करून, या अकादमी योग्य नोंदणी (Registration) किंवा प्रकटीकरणाशिवाय (Disclosure) किंमतींच्या हालचालींवर परिणाम करू शकतात,जे सेबीच्या नियमांचे उल्लंघन आहे असेही सेबीने यावेळी स्पष्ट केले.सेबीचे पूर्णवेळ सदस्य कमलेश चंद्र वार्ष्णेय यांनी एका सार्वजनिक व्यासपीठावर बोलताना इशारा दिला की शिक्षणाच्या नावाखाली तरुणांची दिशाभूल केल्यास कठोर नियामक कारवाई होईल. यावर्षी सेबीने नोंदणीकृत नसलेल्या फिन इन्फ्लुएऐंसर (Fininfluencers) म्ह णजेच वित्तीय प्रभावकांना कमिशन-आधारित मॉडेल्सवर काम करताना पक्षपाती किंवा दिशाभूल करणारा सल्ला देण्याच्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर नियंत्रण आणण्यासाठी नवीन नियमांना मान्यता दिली होती.

Comments
Add Comment

नाशिक: महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; छेडछाड व विनयभंग प्रकरणी ६ आरोपी गजाआड, SIT कडून तपास सुरू

नाशिक : नाशिक शहरात गेल्या काही दिवसांत महिलांचा विनयभंग, छेडछाड आणि धार्मिक भावना दुखावल्याच्या गंभीर घटना

Png And Lpg Gas Cylinder : PNG असेल तर LPG होणार बंद? 1 जुलैपासून या नव्या नियमांची होणार अंमलबजावणी

मुंबई : घरगुती गॅस वापराबाबत केंद्र सरकारकडून महत्त्वाचे बदल लागू करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती समोर येत

IPL 2026 Sunil Gavaskar : सुनील गावस्करांची अनफिट क्रिकेटपटूंवर टीका

मुंबई : भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी पुन्

Amazon Layoffs : ॲमेझॉनमध्ये पुन्हा नोकर कपातीची टांगती तलवार; १४,००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात?

नवी दिल्ली : जागतिक स्तरावर ई-कॉमर्स आणि क्लाउड कॉम्प्युटिंगमध्ये मक्तेदारी निर्माण करणारी कंपनी ॲमेझॉन (Amazon)

Deputy Chief Minister Eknath Shinde : एकनाथ शिंदे शिवसेनेत ‘भाकरी’ फिरवणार?

अकार्यक्षम नेत्यांना दाखवणार घरचा रस्ता; मंत्र्यांपासून शाखाप्रमुखांचे ‘रिपोर्ट कार्ड’ तयार होणार मुंबई :

Ajit Pawar : अजित पवारांच्या निधनावर 'या' प्रसिद्ध युट्युबरने केले असे काही की थेट झाली जेल वारी

मुंबई : २८ जानेवारी २०२६ महाराष्ट्रासाठी काळा दिवस ठरला. बारामतीमध्ये एका विमानाचा अपघात झाला आणि संपूर्ण