Online Gaming Regulation Bill 2025: ऑनलाइन गेमिंगवर अखेर बंदी; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर

नवी दिल्ली: संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सरकारने ऑनलाइन मनी गेमिंगवर बंदी घालणारे विधेयक मांडले होते. लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर झाल्यानंतर या विधेयकाला आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचीही मंजुरी मिळाली आहे. म्हणजेच, आता या ऑनलाईन गेमिंगवर बंदी घालणाऱ्या या विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाले आहे.


भारत सरकारने ऑनलाइन गेमिंगवर पूर्णपणे बंदी घालणारा एक ऐतिहासिक कायदा आज केला आहे. या विधेयकाला 'ऑनलाइन गेमिंग प्रमोशन अँड रेग्युलेशन बिल २०२५' (Online Gaming Promotion and Regulation Bill 2025) असे नाव देण्यात आले आहे.

ऑनलाइन गेमिंगचे दुष्परिणाम लक्षात घेता, केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी हे विधेयक दोन्ही सभागृहात मांडले होते. जे दोन्ही सभागृहात मंजूर झाले, केवळ त्याचे कायद्यात रूपांतर होण्यासाठी राष्ट्रपतीची मोहोर बाकी होती, जी आज अखेर मिळाल्यामुळे भारतात या पुढे ऑनलाइन गेमिंगला कायदेशीररित्या बंदी घालण्यात आली आहे. ज्यामुळे आता जर कोणतीही कंपनी ऑनलाइन मनी गेमला प्रोत्साहन देत असेल किंवा त्याची जाहिरात करत असेल तर तो गुन्हा मानला जाणार आहे. तसेच या त्यांचे उल्लंघन करताना आढळल्यास किंवा पकडले गेल्यास दोषीना तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि ५० लाख रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाणार आहे.


हे विधेयक संसदेत खूप वेगाने मंजूर झाले. राज्यसभेने ते फक्त २६ मिनिटांत आणि लोकसभेने फक्त ७ मिनिटांत मंजूर केले, यावरून असे दिसून येते की या गंभीर विषयावर सर्व पक्ष एकत्र होते.



ऑनलाइन गेमिंग उद्योगाला मोठा धक्का


भारतात ऑनलाइन गेमिंगचा व्यवसाय $३.८ अब्जांचा आहे. त्यामुळे या कायद्याच्या अंमलबजावणीमुळे देशातील ऑनलाइन गेमिंग उद्योगाला त्याचा मोठा फटका बसणार आहे. हा कायदा लागू होताच, ड्रीम११ आणि विंझो सारख्या मोठ्या गेमिंग प्लॅटफॉर्मने भारतात त्यांचे फॅन्टसी गेमिंग बंद करत असल्याची घोषणा केली आहे.


केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी संसदेत सांगितले की समाजात पसरणारे हे ऑनलाइन गेमिंगचे वाईट व्यसन थांबवण्यासाठी हा कायदा आवश्यक असल्याचे सांगितले.  त्यांनी म्हंटले  की अशा हानिकारक गोष्टींपासून लोकांना वाचवणे सरकार आणि संसदेचे कर्तव्य आहे.



पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून स्वागत


पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की या कायद्याचे उद्दिष्ट ई-स्पोर्ट्सला प्रोत्साहन देणे आणि समाजाला हानी पोहोचवणाऱ्या मनी गेमिंगवर बंदी घालणे हे आहे.


एकूणच, हे पाऊल लोकांना आर्थिक नुकसान आणि मानसिक ताणापासून वाचवण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल मानले जात आहे.

Comments
Add Comment

राहुल गांधींचा 'मतदारचोरी'चा आरोप निवडणूक आयोगाने फेटाळला; 'ऑनलाइन' मतदान वगळणे शक्य नाही

नवी दिल्ली: कर्नाटकच्या आळंद मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात मतदार वगळल्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा

काँग्रेस समर्थकांची नावं मतदारयादीतून गायब केली जातात, राहुल गांधींचा नवा आरोप

नवी दिल्ली : लोकसभेच्या तसेच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी मतांची चोरी करण्यात आल्याचा आरोप राहुल

आता 'ईव्हीएम' मतपत्रिकेवर उमेदवारांचे रंगीत फोटो; बिहारमधून सुरुवात

नवी दिल्ली: निवडणुकीदरम्यान मतदारांना स्पष्टता मिळावी आणि गोंधळ कमी व्हावा या उद्देशाने 'भारतीय निवडणूक

'राहुल गांधींनी काढली घुसखोर वाचवा यात्रा'

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त राजधानी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात

लिओनेल मेस्सीने पंतप्रधान मोदींना पाठवली वाढदिवसाची 'ही' खास भेट

नवी दिल्ली: आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशभर ७५ वा वाढदिवस साजरा होत आहे. वेगवेगळ्या

केरळमध्ये 'ब्रेन-इटिंग अमीबा'चा हाहाकार; १८ जणांचा बळी, ही लक्षणे दिसल्यास तातडीने व्हा सावधान!

नवी दिल्ली : केरळमध्ये पुन्हा एकदा 'ब्रेन-इटिंग अमीबा' (Brain-Eating Amoeba) चा धोका वाढला असून, या वर्षी या जीवघेण्या संसर्गाचे