संसदेचे पावसाळी अधिवेशन संस्थगित, दोन्ही सभागृहात १५ विधेयकांना मंजुरी

  27


नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन गुरुवार २१ ऑगस्ट २०२५ रोजी संस्थगित करण्यात आले. हे अधिवेशन सोमवार २१ जुलै २०२५ रोजी सुरू झाले होते. यंदाच्या अधिवेशनात ३२ दिवसांत २१ बैठका झाल्या. पावसाळी अधिवेशनात लोकसभेत १४ विधेयके सादर करण्यात आली. यंदाच्या पावसाळी अधिवेशनात लोकसभेत १२ आणि राज्यसभेत १५ विधेयकांना मंजुरी देण्यात आली.


पहलगाम येथील अतिरेकी हल्ल्याला ठोस उत्तर म्हणून भारताने 'ऑपरेशन सिंदूर' केले. भारताच्या या यशस्वी कारवाईनंतर लोकसभेत २८ आणि २९ जुलै रोजी तर राज्यसभेत २९ आणि ३० जुलै रोजी 'ऑपरेशन सिंदूर'बाबत चर्चा झाली. लोकसभेत १८ तास ४१ मिनिटे तर राज्यसभेत १६ तास २५ मिनिटे 'ऑपरेशन सिंदूर' संदर्भात चर्चा झाली. लोकसभेतील चर्चेत ७३ सदस्यांनी आणि राज्यसभेतील चर्चेमध्ये ६५ सदस्यांनी भाग घेतला. लोकसभेत पंतप्रधान मोदींनी आणि राज्यसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 'ऑपरेशन सिंदूर' संदर्भातल्या चर्चेला उत्तर दिले.


लोकसभेत १८ ऑगस्ट रोजी विकसित भारत २०४७ साठी अंतराळ कार्यक्रम आणि आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर गेलेला पहिला भारतीय अंतराळवीर या विषयावर चर्चेचे आयोजन करण्यात आले होते. पण विरोधकांनी सतत गोंधळ घातल्यामुळे ही चर्चा अपूर्णच राहिली. विरोधकांनी यंदाच्या पावसाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहात चर्चा करण्याऐवजी गोंधळ घालण्यावर जास्त भर दिला. यामुळे कामकाजाचा बराचसा वेळ वाया गेला. संसदेच्या पावसाळी अधिवेशन २०२५ मध्ये लोकसभेत ३१ टक्के आणि राज्यसभेत ३९ टक्केच कामकाज झाले.


Comments
Add Comment

ISRO News : गगनयान अंतराळात झेपावणार, ISRO कडून तारीख जाहीर, काय आहे नवीन अपडेट?

नवी दिल्ली : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने गुरुवारी देशवासीयांसाठी एक मोठी आनंदवार्ता दिली आहे. भारताच्या

संसदेत घुसखोरीचा प्रयत्न, भिंत ओलांडून गरुडद्वारापर्यंत पोहोचलेल्याला अटक

नवी दिल्ली : नव्या संसदेत घुसखोरीचा प्रयत्न झाला. एक व्यक्ती भिंत ओलाडून गरुडद्वारापर्यंत पोहोचली. अखेर सुरक्षा

SC on Stray Dogs : श्वानप्रेमींचा विजय! भटक्या कुत्र्यांना कैदेतून सुटका पण कडक अटींसह...काय आहे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय?

नवी दिल्ली : देशभरात चर्चेचा विषय ठरलेल्या भटक्या कुत्र्यांच्या (Stray Dogs) मुद्यावर सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा

आयपीएस सतीश गोलचा यांच्याकडे दिल्लीची जबाबदारी

नवी दिल्ली: तिहार तुरुंगाचे महासंचालक सतीश गोलचा यांची दिल्ली पोलिसांच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

जीएसटीच्या ५ टक्के, १८ टक्के स्लॅबना मान्यता

जीएसटी परिषद मंत्री गटाचा सर्वसामान्यांना दिलासा आता ४ ऐवजी २ स्लॅब नव्या कर स्लॅबला मंत्रीगटाची मान्यता

एलविश यादवच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपीला एन्काउंटरनंतर अटक

फरीदाबाद: यूट्यूबर आणि 'बिग बॉस ओटीटी २' विजेता एलविश यादवच्या गुरुग्राममधील