नवी दिल्ली: तिहार तुरुंगाचे महासंचालक सतीश गोलचा यांची दिल्ली पोलिसांच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गोलचा यांना दिल्ली पोलिसांत कामाचा प्रदीर्घ अनुभव आहे. ते दिल्ली-केंद्रशासित प्रदेश केडरच्या १९९२ च्या तुकडीचे अधिकारी आहेत. त्यांनी यापूर्वी अरुणाचल प्रदेशचे पोलीस महासंचालक म्हणूनही काम
पाहिले आहे.
गोलचा यांची नियुक्ती अशा महत्त्वपूर्ण वेळी झाली आहे, जेव्हा एक दिवसापूर्वीच मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या सुरक्षेत त्रुटी आढळून आल्या होत्या.